काही रोपं किंवा वेली अशा असतात की त्यांना खूप कमी मेंटेनन्सची गरज असते. त्यांची विशेष काळजी घेतली नाही तरी ते बहरत जातात. छान फुलून येतात. अशा वनस्पतींपैकीच एक आहे गोकर्णाचा वेल. गाेकर्णाच्या वेलीची खूप काळजी घेण्याची गरज नसते. विशेषत: आता सध्याचा जुन- जुलैचा काळ म्हणजे गोकर्णाला बहर येण्याचा काळ (How to increase flowering in aparajita or gokarn plant). पण तरीही या दिवसांतही तुमच्या गोकर्णाच्या वेलीला फुलंच येत नसतील किंवा खूपच कमी फुलं येत असतील तर हे २ उपाय करून पाहा. लवकरच निळ्याशार फुलांनी तुमची वेल बहरून येईल. एवढी जास्त फुलं येतील की वेचूनच तुम्ही दमाल... (remedies for getting maximum flowers from gokarn or aparajita plants)
गोकर्णाच्या वेलीला भरपूर फुलं येण्यासाठी उपाय
१. एप्सम सॉल्ट
गोकर्णाच्या वेलीला फुलंच येत नसतील किंवा खूपच कमी फुलं येत असतील तर हा एक एप्सम सॉल्टचा हा एक उपाय करून पाहू शकता.
नारळ जास्तीतजास्त दिवस फ्रेश राहावं, सुकून त्याचं खोबरं होऊ नये म्हणून १ सोपी ट्रिक...
यासाठी १ लीटर पाण्यात एखादा चमचा एप्सम साल्ट टाकून ते पाण्यात व्यवस्थित विरघळून घ्या. आणि त्यानंतर ते पाणी वेलीला घाला. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करा. वेलीला भरपूर फुलं येतील.
२. फुलं तोडणे गोकर्णाच्या वेलीला थोडी जरी फुलं येत असतील तरी ती कोमेजल्यानंतर लगेच तोडून घ्या. कारण जर फुलं तोडली नाहीत तर त्याच्या शेंगा तयार होतात.
स्मृती इराणींना आवडतं आईस्क्रिम घालून केलेलं अहमदाबादचं प्रसिद्ध पायनॅपल सॅण्डविच, बघा खास रेसिपी
शेंगा तयार झाल्या की वेलीची वाढ खुंटते आणि फुलं येण्याचं प्रमाण खूपच कमी होऊन जातं. त्यामुळे वेलीला जेवढी फुलं आलेली असतील तेवढी दिवसाच्या शेवटी आठवणीने ताेडून घ्या असं uniqfarming या इन्स्टाग्राम पेजवर सुचविण्यात आलं आहे.