Join us  

मोगऱ्याच्या रोपाला फुलंच येत नाही? मातीत १ गोष्ट मिसळा-सुगंधित फुलांनी बहरेल घर; फुलंच फुलं येतील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 1:47 PM

How To Increase Flowing In Jasmine Plant (Mogryala Ful Yenyasathi upay sanga): मोगऱ्याचं रोप घरात असेल तर तुम्हाला रूम फ्रेशनरचा वापर करण्याची गरजच लागणार नाही.

लोकांना आपलं गार्डन, बाल्कनी फुलांनी सजवायला खूप आवडते. अशावेळी लोक आपल्या गार्डनमध्ये रंगेबिरेंगी फुलं लावतात. यात मोगरा सगळ्यात महत्वाचे आहे. (Gardening Tips) कारण मोगरा एक असं झाड आहे जे घरात लावल्यानं संपूर्ण घरात चांगला सुगंध दरवळतो. मोगऱ्याचं रोप घरात असेल तर तुम्हाला रूम फ्रेशनरचा वापर करण्याची गरजच लागणार नाही. (How To Increase Flowing In Jasmine Plant)

मोगऱ्याच्या रोपाला फुलंच येत नाहीत अशी अनेकांची तक्रार असते. कोणते उपाय केल्यानं मोगऱ्याच्या झाडाला भरपूर फुलं येतील हेच कळत नाही. मोगऱ्याला बहर येण्यासाठी सोप्या गार्डनिंग टिप्स पाहूया. (How To Ge Maxium Flowers In Mogra Plant)

या गोष्टींची काळजी घ्या

जर तुम्ही गार्डनमध्ये मोगऱ्याचे रोप लावले असेल तर त्याची खास काळजी घ्यायला हवी.  रोप जास्त सावलीत असेल तर फुलं येणार नाही. मोगऱ्याला उन्हाचीही आवश्यकता असते. जर तुम्ही १ ते २ तासांसाठी हे रोप उन्हात ठेवलं तर चांगली फुलं येतील. जर ऊन्हात ठेवले तर रोपं सुकू लागतील.

दातांच्या मध्यभागी किड-वरून पिळवे झाले? किचनमधल्या ३ वस्तू लावा, किड निघेल-स्वच्छ होतील दात

1) पाण्याची काळजी घ्या

अनेकजण माती सुकलेली दिसताच कुंडीत पाणी भरतात. गरजेपेक्षा जास्त पाणी घालणं रोपासााठी नुकसानकारक ठरू शकत. यासाठी कुंडीत थोडं थोडं पाणी घालत राहा जेणेकरून  माती पाणी शोषून घेईल. . माती पाणी शोषून घेत नसेल तर कुंडीच्या वरच्या भागात पाणी दिसून येईल. असं समजून घ्या की रोपाला पूर्णपणे पाणी मिळाले आहे.

रोज चालणं होतं तरी वजन घटत नाही? तज्ज्ञ सांगतात वॉकिंगची योग्य पद्धत, आठवड्याभरात व्हाल स्लिम

2) ऑर्गेनिक खताचा वापर करा

रोपाला फुलं येण्यासाठी तुम्ही यात खताचा वापर करू शकता. यामुळे फुलं चांगली येतील. काही दिवसांतच मोगऱ्याचे रोप कोमेजू लागत असेल तर ऑर्गेनिक खत तयार करण्यासाठी मातीत गाईचे शेणं घालू शकता. यात तुम्ही एप्सम सॉल्टचा वापर करू शकता. 

हाडांना भरपूर फॉस्फरस देणारे ५ पदार्थ खा; कॅल्शियमही मिळेल-शरीर पोलादी, हाडं मजबूत होतील

3) पानांवर लक्ष द्या

जर पानांवर धूळ किंवा माती बसत असेल तर हे फुलं न येण्याचे कारण ठरू शकते. पावसाच्या दिवसांत रोपं हिरवीगार राहतात. ज्यामुळे धूळ माती साफ होते. पानं स्वच्छ करण्यासठी तुम्ही स्प्रे बॉटलचा वापर करू शकता. दिवसभरातून २ ते ३ वेळा पाणी मारल्याने पानं हिरवीगार राहतील.

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स