घर सजविण्यासाठी अनेक जण घरात वेगवेगळ्या आकर्षक फुलांनी फ्लॉवरपॉट सजवून ठेवतात. बऱ्याचदा काही कारणानिमित्त घरात फुलांचा बुके येतो. त्यातली फुलं सुकू नयेत म्हणून आपण ती फ्लॉवरपॉटमध्ये घालून ठेवतो. पण त्याची व्यवस्थित काळजी घेतली नाही, तर अगदी १- २ दिवसांतच ती सुकून जातात. फुलं सुकलेली पाहून मग आपणही हिरमुसून जातो. म्हणूनच फ्लॉवरपॉटमध्ये ठेवलेली फुलं पुढचे काही दिवस तशीच टवटवीत- फ्रेश राहावीत, यासाठी या काही टिप्स बघा (How to keep flowers in a vase fresh for longer time?).. अशी काळजी घेतली तर आठवडाभर तरी फुलांना काहीच होणार नाही.
फ्लॉवरपॉटमधली फुलं सुकू नयेत म्हणून उपाय
१. मीठ आणि साखर
फ्लॉवरपॉटमधल्या फुलांसाठी हे दोन पदार्थ म्हणजे टॉनिक आहेत. पण त्यांचा अतिरेकही व्हायला नको याची मात्र काळजी घ्या.
स्वयंपाक घरातले कळकट- तेलकट नॅपकीन होतील स्वच्छ, फक्त २ पदार्थ वापरा- नॅपकीन चमकतील नव्यासारखे
फ्लॉवर पाॅटमधलं पाणी दर २ दिवसांनी बदला. आणि बदललेल्या स्वच्छ पाण्यात १ टीस्पून साखर आणि १ टीस्पून मीठ टाका. पाण्यात साखर आणि मीठ दोन्ही व्यवस्थित विरघळल्यानंतरच त्यात फुलं टाकून ठेवा.
२. पाणी किती टाकायचं?
फ्लॉवरपॉटमध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी टाकलं तर फुलांच्या काड्या सडायला सुरुवात होते.
कुंडीतल्या झाडांना किती आणि कसे खत घालावे? २ टिप्स, झाडं वाढतील भरभर- फुलं येतील भरपूर
त्यामुळे मग लवकरच फुलंही सुकायला लागतात. त्यामुळे फुलांच्या दांड्यांचे खालचे दिड ते दोन इंचाचे टोक पाण्यात बुडेल, एवढेच पाणी फ्लॉवरपॉटमध्ये टाका. तेवढेच पाणी त्या फुलांसाठी पुरेसे आहे.
३. सुकलेली पानं काढा
फ्लॉवरपॉटमधली सगळीच पानं- फुलं एकसारखी नसतात. त्यांच्यातली काही पानं किंवा फुलं लवकर सुकतात.
ऑक्टोबर हिटमुळे घरात खूप मुंग्या झाल्या? ४ सोपे उपाय- लाल मुंग्या घरात दिसणार नाहीत
अशी सुकलेली पानं- फुलं दिसली की ती लगेच काढून टाका. कारण ती जर काढली नाहीत, तर त्याच्या आजुबाजुची पानं- फुलंही खराब व्हायला, सुकायला सुरूवात होते.
४. फ्लॉवरपॉटची जागा
फ्लॉवरपॉटमधल्या फुलांना किंवा पानांना आपण पाणी देत असलो तरी त्यांनाही सुर्यप्रकाशाची आवश्यकता असतेच.
रात्री अंथरुणावर पडताच टाचा ठणकतात? ५ मिनिटांचा १ सोपा उपाय अंथरुणावर बसूनच करा- टाचदुखी कमी
त्यामुळे घरात फ्लॉवर पॉट अशा ठिकाणी ठेवा, जिथे त्यांना स्वच्छ सुर्यप्रकाश मिळेल. अशा ठिकाणी ठेवलेली फुलं नक्कीच अधिक दिवस टिकतात.