Join us

बाजारात अतिशय महाग मिळणारं NPK खत फक्त १० रुपयांत घरीच बनवा, रोपं नेहमीच बहरत राहतील... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2024 14:52 IST

How To Make Best Fertilizer For Plants At Home: रोपांसाठी अतिशय पोषक असणारं NPK खत म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियमयुक्त खत घरच्याघरी कसं तयार करायचं ते पाहा....(best home remedies for flowering plants)

ठळक मुद्देसाधारण १४ इंचाची कुंडी असेल तर त्यासाठी वरील पद्धतीने तयार केलेलं खत एक चमचा या प्रमाणात टाकावं.

खरं पाहिलं तर बागेतल्या रोपांची काळजी घेण्यासाठी विकत मिळणाऱ्या महागड्या खतांची काहीच गरज नसते. कारण ज्याप्रमाणे आपल्या बऱ्याचशा दुखण्याखुपण्यांवर स्वयंपाक घरातच काही ना काही उपाय नक्कीच सापडतात, तसंच काहीसं रोपांचंही आहे. आपल्या स्वयंपाक घरात बरेच असे पदार्थ आहेत जे रोपांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतात. त्या पदार्थांचा वापर करून अगदी घरच्याघरी खूपच स्वस्तात आपण रोपांसाठी NPK खत सुद्धा तयार करू शकतो. हे खत बाजारात विकत घ्यायला गेलं तर त्यासाठी बरेच पैसे मोजावे लागतात (best home remedies for flowering plants). बघा हे खत नेमकं कसं करायचं आणि ते झाडांना कोणत्या प्रमाणात द्यायचं...(how to make best fertilizer for plants at home?)

 

रोपांसाठी घरच्याघरी उत्तम खत कसं तयार करावं?

रोपांसाठी घरचेच काही पदार्थ वापरून अतिशय उत्तम परिणाम देणारं खत कसं तयार करायचं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ getmyharvest या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

तुम्हाला माहिती आहे फिटनेससाठी महत्त्वाचा '9-1 Rule'? वजन तर उतरेलच पण आजारही दूर पळतील

यानुसार खत तयार करण्यासाठी आपल्याला जी सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे खडू. ज्या घरात लहान मुलं आहेत, त्या घरात खडूचे तुकडे अगदी सहज सापडतील. साधारण ४ ते ५ खडू घ्या. त्यामधून रोपांना कॅल्शियम क्लोराईड मिळते.

त्यानंतर साधारण २ ते ३ चमचे चहा पावडर घ्या. त्यातून रोपांना भरपूर प्रमाणात नायट्रोजन मिळेल.

साधारण १ ग्लास एवढी कांद्याची टरफलं घ्या आणि ६ ते ७ केळींची पुर्णपणे वाळलेली सालं घ्या.

 

हे ४ पदार्थ  एकत्रितपणे मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पावडर करून घ्या.

चेहऱ्याला मध लावण्याच्या ३ पद्धती! ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स, पिगमेंटेशन घालविण्याचा सगळ्यात सोपा उपाय

महिन्यातून एकदा ही पावडर थोडी थोडी करून प्रत्येक कुंडीतल्या मातीमध्ये टाका. साधारण १४ इंचाची कुंडी असेल तर त्यासाठी वरील पद्धतीने तयार केलेलं खत एक चमचा या प्रमाणात टाकावं.

कुंडीच्या आकारमानानुसार खताचे प्रमाण कमी जास्त करावे. काही दिवसांतच रोपांमध्ये खूप छान फरक जाणवेल.

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सखतेहोम रेमेडी