Join us  

जास्वंदाला फुलंच येत नाही- मुंग्या लागतात? मातीत १ चमचा हे घरगुती खत घाला; फुलंच फुलं येतील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 1:07 PM

How To Make Hibiscus Plant Bloom :

जास्वंद (Hibiscus) खूपच गुणकारी रोपांपैकी एक आहे.  जास्वंदाचे फुल देवालाही प्रिय असते. जास्वंदाचे रोप घरी लावल्यास त्याच्या वाढीशी संबंधित अनेक तक्रारी लोकांच्या असतात. (Gardening Tips) जास्वंदाचं रोप घरी आणणं सोपं असलं तरी त्याची काळजी घेणं कठीण काम कारण जास्वंदाला फुलच येत नाही पानंच खूप येतात अशी अनेकांची तक्रार असते. (How To Get Maximum Flowing In Hibiscus) एकदा फुलं आल्यानंतर पुन्हा फुलं न येणं, पानं पिवळी पडणं, फुलांचा रंग फिकट होण,  मुंग्या लागणं,कळ्या पडणं, कळ्या सुकणं अशा समस्या उद्भवतात. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही काही घरगुती फर्टिलायजर्सचा वापर करू शकता. ज्यामुळे किड पडण्यापासून वाचवता येईल. (How To Make Hibiscus Plant Bloom)

जास्वंदाच्या फुलाला ऊन गरजेचं असतं. रोपाला नियमित पाणी द्या,  कुंडीचा आकार ८ ते १२ इंच असायला हवा. रोपात जास्त पाणी साचणार नाही याची खात्री करा. जास्वंदात तुम्ही एपीके १९१९१९ (NPK-191919) हे खत घालू शकता. एक दिवसाआड झाडावर पाण्याचा स्प्रे करा. १ चमचा द्रावण तयार करून घ्या. ४ ते ५ कुंड्यांमध्ये घालू  शकता. कळ्या न पडता रोपांची चांगली वाढ होईल. ज्यामुळे मिलिबग्स आणि मुंग्यांपासून सुटका मिळेल.

हिनड व्हॅली हिबिस्कसच्या रिपोर्टनुसार वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. पण जास्त प्रमाणात नायट्रोजन पानं जाळू शकतात.  ज्यामुळे पानांच्या कळा गडद तपकिरी होतात.  पण कमी नायट्रोजनमुळे झाडांची वाढ खुंटू शकते. म्हणून जास्वंदासाठी मध्यम श्रेणी नायट्रोजन असलेलेच खत वापरा. तुम्ही वापरत असलेल्या खतात फॉस्फरस, पोटॅशियमही काही प्रमाणात असायला हवे.

मोगऱ्याचं रोप वाढलंय-फुलांचा पत्ता नाही? पावसाळ्यात १ मूठ 'हा' पदार्थ मातीत घाला; नंतर बहरेल रोप

जास्वंदाला मोठी फुलं येण्यासाठी काय करावे?

प्रत्येकालच वाटतं की आपल्या रोपाला भरपर फुलं यावीत. जास्वंदाची मोठी फुलं खूपच मनमोहक दिसतात.  यासाठी रोपाला पोटॅशियम, फॉस्फरस द्या. एका रोपासाठी ४ केळ्याची सालं घ्या. ही सालं कुडींत पेरून घ्या. तुम्ही लिक्विड खताचाही वापर करू शकता.

वजन वाढत चाल्लंय-कपडे घट्ट होतात? रात्रीच्यावेळी 'हे' ७ पदार्थ खा, परफेक्ट फिगर-स्लिम दिसाल

याव्यतिरिक्त तुम्ही केळ्याचे साल सुकवून याची पावडर बनवून वापरू शकता. पाऊस भरपूर असेल तर तुम्ही थेट मातीत सालं घालणं टाळा.  माती सुकी असल्यास केळ्याच्या सालीची पावडर घालू शकता. याशिवाय कडूलिंबाची काडीही घालू शकता. 

पानं पिवळी झाल्यानंतर गळून पडतात. अशावेळी रोपात एप्सम सॉल्सचा चा स्प्रे करा, यामुळे पानं चमकदार आणि हेल्दी राहीतल. १ चमचा एप्सम सॉल्स १ लिटर पाण्यात मिसळून स्प्रे तयार करा. १५ दिवसांच्या अंतरांनी एप्सम सॉल्टचा  स्प्रे रोपावर करा. यामुळे मुंग्या येणार नाहीत आणि रोपाची वाढ चांगली होईल.

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स