Join us  

चिमण्यांसाठी खास बाग, आपल्या अंगणात ऐकू येईल चिमण्यांचा चिवचिवाट! करा ३ सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 7:30 PM

Gardening Tips: गप्पागोष्टी करण्यासाठी चिमण्यांना अंगणात बोलवायचंय? मग अंगणातला एक कोपरा (birds in garden) खास त्यांच्यासाठीच राखून ठेवा आणि करा तिथे छानसं चिमण्यांचं मिनी गार्डन... 

ठळक मुद्देआज तुम्ही धान्य ठेवलं आणि लगेच उद्या चिमण्या आल्या, असं होणार नाही. यासाठी थोडे दिवस नक्कीच वाट पहावी लागणार..

सकाळी- सकाळी चिमण्यांचा किलबिलाट ऐकू आला की सगळंच कसं लाईव्ह आणि फ्रेश वाटू लागतं.... नेहमीचीच सकाळ पण ती ही अतिशय चैतन्यमय होऊन जाते.. पुर्वी अगदी सहज चिमण्या अंगणात येऊन बसायच्या.. पण आता मात्र त्यांचा चिवचिवाट कुठेतरी हरवल्यासारखा झाला आहे.. चिमण्यांना जर पुन्हा तुमच्या अंगणात बोलवायचं असेल... आणि मुख्य म्हणजे नुसतंच बोलवायचं नाही तर त्यांना तिथे काही काळ रमवायचं असेल, त्यांनी आपल्या अंगणात भरपूर वेळ घालवावा, असं वाटत असेल तर हे काही सोपे उपाय करून बघा..(simple remedies for attracting birds in your garden)

 

अंगणात चिमण्या याव्या यासाठी....१. चिमण्यांसाठी मिनी गार्डन..(mini garden for birds)आपल्या अंगणातल्या एका कोपऱ्यात चिमण्यांसाठी मिनी गार्डन तयार करणं ही गोष्टच खूप छान आहे.. चिमण्यांसाठी गार्डन तयार करणं अतिशय सोपं आहे.. यासाठी मोठ्या आकाराची पसरट कुंडी घ्या. या कुंडीतली मधली जागा मोकळी सोडा आणि कडेकडेने सदाफुली, ऑफिस टाईम, चिनी गुलाब, जेड प्लान्ट, स्नेक प्लान्ट यांची एकेक रोपं लावा.. मध्यभागी आपल्याला चिमण्यांसाठी पाण्याने भरलेलं भांडंठेवायचं आहे. चिमण्यांसाठी पाण्याचं भांडं निवडताना ते शक्यतो मातीचं असावं. भांडं खूप खोलगट नको. ते भांडं कुंडीमध्ये मध्यभागी ठेवा. त्यात नेहमी पाणी टाकत जा.. चिमण्यांचं मिनी गार्डन झालं तयार.. आजुबाजुला छोटी छोटी रोपटी आणि मध्यभागी पाण्याचं भांडं हे सगळं चिमण्यांना सुरक्षित वाटतं आणि हळूहळू मग तिथे चिवचिवाट ऐकू येऊ लागतो. फक्त हे छोटंसं गार्डन खूप कडक उन्हात ठेवू नका..हा उपाय यु ट्यूबच्या Voice of plant या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

 

२. जिथे दाणा- पाण्याची सोय होते तिथे चिमण्या येतात. त्यामुळे या मिनी गार्डनच्या बाजूला थोडासा उंच भाग करा आणि त्यात उरलेला भात, पोळीचे तुकडे, थोडंसं धान्य असं काही काही टाका.. आज तुम्ही धान्य ठेवलं आणि लगेच उद्या चिमण्या आल्या, असं होणार नाही. यासाठी थोडे दिवस नक्कीच वाट पहावी लागणार..

 

३. चिमण्यांना सुरक्षित वाटेल, अशाच ठिकाणी त्या येतात आणि रमतात. त्यामुळे तुमच्या अंगणातल्या एखाद्या शांत आणि सावली असणाऱ्या कोपऱ्यात नियमितपणे पाणी आणि दाणे टाकले तरी हळूहळू चिमण्यांचा चिवचिवाट दररोजच सुरू होतो.  

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीगच्चीतली बाग