Lokmat Sakhi >Gardening > रोप लावताना कुंडीतल्या मातीत 'हे' पदार्थ टाका, भराभर वाढतील झाडं, फुलं- फळं येतील भरपूर

रोप लावताना कुंडीतल्या मातीत 'हे' पदार्थ टाका, भराभर वाढतील झाडं, फुलं- फळं येतील भरपूर

How To Make Perfect Soil Mix For Plants: कोणत्याही फळझाडांसाठी किंवा फुलझाडांसाठी परफेक्ट soil mix कसं तयार करायचं याची ही खास माहिती....(Gardening tips for plantation)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2023 12:04 PM2023-12-25T12:04:30+5:302023-12-25T12:05:02+5:30

How To Make Perfect Soil Mix For Plants: कोणत्याही फळझाडांसाठी किंवा फुलझाडांसाठी परफेक्ट soil mix कसं तयार करायचं याची ही खास माहिती....(Gardening tips for plantation)

How to make perfect soil mix for plants in Marathi, Gardening tips for plantation, Ingredients that helps for the fast growth of plants | रोप लावताना कुंडीतल्या मातीत 'हे' पदार्थ टाका, भराभर वाढतील झाडं, फुलं- फळं येतील भरपूर

रोप लावताना कुंडीतल्या मातीत 'हे' पदार्थ टाका, भराभर वाढतील झाडं, फुलं- फळं येतील भरपूर

Highlightsकुंडीतली माती कशा पद्धतीने रोप लावण्यासाठी तयार करायची, ते आता पाहूया...

बऱ्याचदा असं होतं की आपण नर्सरीतून मोठ्या हौसेने एखादं आपल्या आवडीचं रोप आणतो. ते व्यवस्थित लावतो, त्याची योग्य ती काळजीसुद्धा घेतो. पण तरीही त्या रोपाची वाढ काही आपल्या मनासारखी होत नाही. ते रोप छान बहरत नाही. किंवा बहरलं तरी त्याला फुलं- फळं येत नाहीत. याउलट काही जणांची बाग मात्र कायमच हिरवीगार आणि टवटवीत दिसते.  याचं एकमेव  कारण म्हणजे त्यांच्या झाडांना पाहिजे असणारी सगळी पोषकमुल्ये व्यवस्थित मिळालेली असतात (Ingredients that helps for the fast growth of plants). म्हणूनच आता झाड लावताना कशी काळजी घ्यायची (How to make perfect soil mix for plants in Marathi) किंवा कुंडीतली माती कशा पद्धतीने रोप लावण्यासाठी तयार करायची, ते आता पाहूया...(Gardening tips for plantation)

 

आपल्याला माहिती आहेच की प्रत्येक झाडाची पाण्याची, उन्हाची गरज वेगवेगळी असते. त्यांच्या त्या त्या गरजेनुसार आपल्याला त्यांना ऊन- पाणी- खत द्यावं लागतं. पण बऱ्याच झाडांना माती कशी लागते, यात मात्र बरंच साम्य आहे.

डोक्यात खूप कोंडा झाला? फक्त ३ गोष्टी करा, कधीच कोंडा होणार नाही- केसही वाढतील

आता आपण जे सॉईल मिक्स तयार करणार आहोत ते सकलंट्स वगळता अन्य सगळ्याच झाडांसाठी योग्य ठरणारं आहे. रोप लावताना जर कुंडीतली माती पुढे सांगितलेल्या पद्धतीनुसार तयार केली तर त्या रोपाची वाढ तर भराभर होईलच, पण झाडांना भरभरून फुलं- फळं देखील येतील. 

 

रोप लावताना कुंडीतली माती कशी तयार करावी?

कोणतेही फळझाड किंवा फुलझाड लावताना कुंडीतल्या मातीत कोणकोणते पदार्थ किती प्रमाणात टाकावेत याची माहिती glitters.of.nature या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

तोच खरा मर्द जो स्त्रियांशी वागताना....! शाहरुख खान सांगतो सन्मानानं वागण्याबोलण्याची सोपी रीत

यात असे सांगितले आहे की झाडांसाठी सॉईल मिक्स तयार करताना त्यात ५० टक्के लाल किंवा काळी माती घ्यावी. त्यात २० टक्के कोकोपीट, ३० टक्के कंम्पोस्ट खत, मूठभर वाळू, मुठभर गांडूळ खत, मुठभर परलाईट पावडर, मुठभर नीम पावडर, मुठभर मस्टर्ड केक पावडर टाकावे.

वरील पदार्थ व्यवस्थित एकत्र करून कुंडीत भरावे आणि नंतर झाड लावावे. 

 

 

Web Title: How to make perfect soil mix for plants in Marathi, Gardening tips for plantation, Ingredients that helps for the fast growth of plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.