Lokmat Sakhi >Gardening > भाजलेल्या शेंगदाण्याची टरफलं फेकून देण्यापेक्षा बाल्कनीतील रोपांसाठी करा खास खत, रोपं येतील बहरुन...

भाजलेल्या शेंगदाण्याची टरफलं फेकून देण्यापेक्षा बाल्कनीतील रोपांसाठी करा खास खत, रोपं येतील बहरुन...

How To Make Groundnut Fertilizer At Home : 1 Simple Way To Make Groundnut Fertilizer At Home : How To Make Powerful Organic Groundnut Fertilizer At Home : शेंगदाणे खाऊन त्याच्या टरफलांपासून रोपांसाठी खत तयार करण्याची सोपी पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2024 08:18 AM2024-09-21T08:18:23+5:302024-09-21T08:36:07+5:30

How To Make Groundnut Fertilizer At Home : 1 Simple Way To Make Groundnut Fertilizer At Home : How To Make Powerful Organic Groundnut Fertilizer At Home : शेंगदाणे खाऊन त्याच्या टरफलांपासून रोपांसाठी खत तयार करण्याची सोपी पद्धत...

How To Make Powerful Organic Groundnut Fertilizer At Home How To Make Groundnut Fertilizer At Home 1 Simple Way To Make Groundnut Fertilizer At Home | भाजलेल्या शेंगदाण्याची टरफलं फेकून देण्यापेक्षा बाल्कनीतील रोपांसाठी करा खास खत, रोपं येतील बहरुन...

भाजलेल्या शेंगदाण्याची टरफलं फेकून देण्यापेक्षा बाल्कनीतील रोपांसाठी करा खास खत, रोपं येतील बहरुन...

जमिनीखाली उगवणाऱ्या भुईमुगाच्या शेंगांचा आपण रोजच्या आहारात समावेश करतो. या शेंगा सोलून त्यातील शेंगदाण्यांपासून आपण वेगवेगळे पदार्थ तयार करतो. शेंगा सोलून झाल्यानंतर त्यांची जी टरफलं उरतात ती आपण कचरा समजून फेकून देतो. याउलट असे न करता याच टरफलांचा वापर करुन आपण आपल्या बाल्कनी किंवा गार्डनमधील रोपांसाठी खत तयार करु शकतो(1 Simple Way To Make Groundnut Fertilizer At Home).

शेंगदाणा खाल्ल्याने जसे आपल्याला आरोग्याला त्याचे फायदे मिळतात तसेच या टरफलांपासून आपण रोपांसाठी सेंद्रिय खत तयार करू शकतो. शेंगदाण्यांच्या टरफलांपासून तयार केलेले हे सेंद्रिय खत वनस्पतींच्या वाढीसाठी फायदेशीर पोषक तत्वांनी समृद्ध असते. या सेंद्रिय खतामध्ये नायट्रोजन, फायबर, प्रथिने, फॉस्फरस आणि पोटॅशियमसारखे आवश्यक घटक असतात. यासाठीच भुईमुगाच्या शेंगा सोलून झाल्यावर त्याची टरफलं न फेकता त्यापासून सेंद्रिय खत कसे तयार करायचे ते पाहूयात(How To Make Powerful Organic Groundnut Fertilizer At Home).

शेंगदाण्याच्या टरफलांपासून खत कसे तयार करायचे ?
 
खत तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :- 

१. शेंगदाण्याची टरफले
२. पाणी
३. शेणखत
४. चहा पावडर 

तुळशीच्या पानांला किड लागली करा ५ सोपे उपाय, तुळस पुन्हा येईल नव्यासारखी बहरुन... 

खत तयार करण्याची पद्धत :- 

१. शेंगदाण्याची टरफलं व्यवस्थित उन्हांत सुकवून त्यांचा सेंद्रिय खत तयार करण्यासाठी वापर करु शकता. 
२. शेंगदाण्याची वाळकी टरफलं आता मिक्सरमध्ये घालून ती पूड होईपर्यंत बारीक वाटून घ्या. 
३. आता टरफलांची पूड करून घेतल्यानंतर एका मोठ्या कंटेनरमध्ये पाणी घेऊन त्यात ही पूड घालावी. त्यानंतर किमान २४ ते ४८ तास ही पूड फरमेंटेड होण्यासाठी तशीच पाण्यात ठेवावी. 

मनी प्लांट्ससाठी लागणारी मॉस स्टिक तयार करा घरच्या घरी, महागडी मॉस स्टिक मिळेल स्वस्तात...  

४. आता या फरमेंटेड करुन घेतलेल्या मिश्रणात शेणखत व चहा पावडर मिक्स करुन घ्यावी. 
५. आता एक आठ्वड्यासाठी हे मिश्रण झाकून ठेवावे. रोज हे मिश्रण थोडे ढवळत राहावे जेणेकरुन सगळे जिन्नस एकजीव होण्यास मदत मिळेल. 
६. एक आठवड्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित गाळून दुसऱ्या एका भांड्यात ठेवावे. त्यानंतर थोडे थोडे मिश्रण घेऊन त्यात पाणी मिक्स करुन हे खत रोपांना घालावे.

Web Title: How To Make Powerful Organic Groundnut Fertilizer At Home How To Make Groundnut Fertilizer At Home 1 Simple Way To Make Groundnut Fertilizer At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.