घरात स्वंयपाक करताना किंवा खाण्यापिण्याच्या पदार्थांचा जो काही कचरा तयार होईल ते आपण फेकून देतो पण हाच कचरा रोपांसाठी सोनं ठरतो. (Gardening Tips) काळ सोनं एक प्रकारचे खत आहे ज्याचा उपयोग रोपांच्या चांगल्या वाढीसाठी केला जातो. गार्डनमध्ये किंवा घरातही रोपांच्या वाढीसाठी तुम्ही या प्रकारच्या खतांचा वापर करू शकता. (How to make Pure Fertilizer Kitchen Waste) बाजारात शुद्ध खत खूपच महाग मिळतात. घरगुती कंपोस्टच्या माध्यमातून लोक घरच्या वेस्ट मटेरिअलचा वापर करून खत तयार करतात. हे खत तुम्ही गार्डन किंवा रोपांमध्येही वापरू शकता. किचनमधून निघणाऱ्या वेस्ट मटेरियलचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीने खत तयार करू शकता. हे खत तुम्ही गार्डनमध्ये किंवा घरातल्या रोपांच्या कुंड्यांमध्ये वापरू शकता. (How to Turn Food Waste Into Organic Fertilizer)
बिना खर्चाचे खत कसे तयार करावे? (Homemade Fertilizer From Kitchen Waste)
खत तयार करण्यासाठी किचनमधून निघणारा कचरा कचऱ्याच्या गाडीत न टाकता घरीच ओला आणि सुका वेगळा करून ठेवा. हाच कचरा कोणत्याही खर्चाशिवाय तुम्हाला खत तयार करण्यास मदत करेल. हे वेस्ट मटेरिअल फेकण्यापेक्षा खत तयार करण्यासाठी याचा वापर करा.
जास्वंदाला फुलंच येत नाही, मुंग्या लागतात? ३ टिप्स-जास्वंदच्या फुलांनी बहरेल कुंडीतलं छोटसं रोप
खत तयार होण्यासाठी किती वेळ लागतो
घरात खत तयार करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे कम्पोस्टिंग. या माध्यमातून २८ ते ३० दिवसांत घरातच शुद्ध खत तयार होईल. यासाठी तुम्हाला बाजारात जाऊन सामान खरेदी करावे लागणार नाही, याशिवाय अतिरिक्त जागेचीही आवश्यकता लागणार नाही. या खताच्या वापराने फुलांची वाढही भराभर होईल.
खत तयार करण्यासाठी कोणताही जुना मडका घ्या. या मडक्याला ३ ते ४ छिद्र पाडा नंतर घर किंवा बाहेरच्या छतावर अशा ठिकाणी जेव्हा जिथे तुमचा सतत हात लागणार नाही. दर दिवशी आपल्या घरच्या किचनमध्ये ओला कचरा जसं की भाज्यांची सालं, फळांची सालं, चहा पावडर मडक्यात ठेवू शकता.
गुलाबाला लवकर फुलं येत नाही? कांद्याची टरफलं 'या' पद्धतीने वापरा; १५ दिवसांत येतील भरपूर कळ्या
कचरा सडण्यासाठी आणि बॅक्टेरिया तयार होण्यासाठी त्यात २ ते ३ वेळा २ ते ४ चमचे दही मिसळा. जेव्हा मडकं पूर्ण भरेल तेव्हा ते झाकून ठेवून द्या. लाकडाच्या काठीने कचरा उलट सुलट करत राहा. २८ ते ३० दिवसात खत बनून तयार होईल. नंतर तुम्ही याचा वापर झाडांसाठी करू शकता.