Join us  

गुलाबाला लवकर फुलं येत नाही? कांद्याची टरफलं 'या' पद्धतीने वापरा; १५ दिवसांत येतील भरपूर कळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 12:48 PM

How to Make Rose Plant Grow Faster (Gulabala ful yenyasathi upay): कांद्याची टरफलं फेकून देण्यासापेक्षा याचा वापर करून तुम्ही गॅलरीतील रोपं फुलवू शकता.

घरात लहान लहान फुलांची रोपं असतील तर घर उठून-आकर्षक दिसतं. (Five Ways to Grow Better Roses) खासकरून जेव्हा गुलाब टेरेस किंवा बाल्कनीमध्ये लावलं जातं तेव्हा फुलांनी बहरेलं असेल तर खूपच सुंदर दिसते. काही सोप्या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही गुलाबाच्या झाडाला अधिक फुलवू शकता. (Homemade Onion Peel Fertilizer For Rose Plant) कांदा प्रत्येकाच्याच घरी असतो कांद्याची टरफलं फेकून देण्यासापेक्षा याचा वापर करून तुम्ही गॅलरीतील रोपं फुलवू शकता (Gardening Tips)

कांद्याचे पाणी

एका मग मध्ये कांद्याचे साल आणि पाणी भरून ठेवा २ ते ३ दिवसांसाठी तसेच सोडून द्या. नंतर गाळून  हे पाणी गुलाबाच्या मुळांना घाला. यामुळे रोपाला फुलं यायला सुरूवात होईल.

कांदयाची टरफलं

कांद्याच्या टरफलांपासून तयार केलेल्या फर्टिलायजरचे अनेक फायदे आहे. जसं की गुलाबाच्या झाडाला फुलं येत नसतील किंवा झाड लवकर सुकून जात असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता. कारण हे फर्टिलायजर मातीतील पोषक तत्वांना टिकवून ठेवते.

यामुळे गुलाबाच्या रोपात  मॉईश्चर राहील आणि झाड सुकणार नाही. याचा वापर केल्याने चांगली वाढ होईल आणि झाड अधिक आकर्षक दिसेल.याव्यतिरिक्त तुम्ही गुलाबाच्या झाडात खतही घालू शकता. यासाठी लिक्विड फर्टिलायजरचा वापर करा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करा. 

जास्वंदाला फुलंच येत नाही, मुंग्या लागतात? ३ टिप्स-जास्वंदच्या फुलांनी बहरेल कुंडीतलं छोटसं रोप

शेणाचा वापर करा

तुम्ही गुलाबाच्या मुळांमध्ये सुकलेल्या शेणाचा वापर करू शकता.  शेण घातल्यानंतर मातीला पाणी देत राहा. यामुळे झाडाची वेगाने वाढ होईल आणि किड सुद्धा लागणार नाही. झाडात काही दिवसांतच कळ्या यायला सुरूवात होईल. 

मातीचा वापर

गुलाबाच्या रोपात तर तुम्ही ५ ते ८ पीएचच्या मातीचा वापर केला तर त्यात चांगली फुलं येतील. याव्यतिरिक्त तुम्ही मातीमध्ये  शेणं, वॉर्म कम्पोस्ट, कोकोपीटही वापरू शकता.

कॉफी

गुलाब आणि मोगऱ्याच्या फुलासाठी कॉफी एक उत्तम फर्टिलायजर आहे. ज्यामुळे झाडांमध्ये नायट्रोनजनची कमतरता दूर होते यासाठी १ चमचा कॉफी ग्राऊंड्स मातीत मिसळा आणि १५ दिवसांच्या अंतराने हा प्रयोग पुन्हा करा. यामुळे गुलाबाची वाढ चांगली होईल. 

टॅग्स :बागकाम टिप्ससुंदर गृहनियोजन