Lokmat Sakhi >Gardening > जास्वंदाला फुलं कमी पानंच ढीगभर येतात? १० रूपयांचा १ पदार्थ रोपात मिसळा, भरपूर फुलं येतील

जास्वंदाला फुलं कमी पानंच ढीगभर येतात? १० रूपयांचा १ पदार्थ रोपात मिसळा, भरपूर फुलं येतील

How to Make Your Hibiscus Bloom (Jawswandache Full Kase Vadhvave) : जास्वंदाची फुलं घरात लावली तरी व्यवस्थित फुलत नाहीत. फक्त पानचं वाढतात अशी अनेकांची तक्रार असते.  जास्वंदाच्या रोपांच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही सोपे उपाय करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 11:56 AM2024-02-08T11:56:42+5:302024-02-08T15:42:59+5:30

How to Make Your Hibiscus Bloom (Jawswandache Full Kase Vadhvave) : जास्वंदाची फुलं घरात लावली तरी व्यवस्थित फुलत नाहीत. फक्त पानचं वाढतात अशी अनेकांची तक्रार असते.  जास्वंदाच्या रोपांच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही सोपे उपाय करू शकता.

How to Make Your Hibiscus Bloom : 10 Rupees Hacks To Get More Hibiscus Flowers | जास्वंदाला फुलं कमी पानंच ढीगभर येतात? १० रूपयांचा १ पदार्थ रोपात मिसळा, भरपूर फुलं येतील

जास्वंदाला फुलं कमी पानंच ढीगभर येतात? १० रूपयांचा १ पदार्थ रोपात मिसळा, भरपूर फुलं येतील

जास्वंदाची फुलं पाहिल्यानंतर प्रत्येकालाच हवीहवीशी वाटतात. (Gardening Tips) जास्वंदाची फुलं पुजेसाठी आणि सौंदर्याच्या उत्पादनांसाठी वापरली जातात.  जास्वंदाच्या फुलाच्या वापर अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये केला जातो. (How Grow Hibiscus Flowers At Home) जास्वंदाच्या फुलांचा वापर केसांवर केल्यास केसांची चांगली वाढ होते आणि केस गळणंही नियंत्रणात राहतं. जास्वंदाचे फुल घरात असेल घर बहरलेलं दिसतं आणि वातावणरणही ताजंतवानं राहतं. (How to Make Your Hibiscus Bloom) जास्वंदाच्या फुलं घरात लावली तरी व्यवस्थित फुलत नाहीत. फक्त पानचं वाढतात अशी अनेकांची तक्रार असते.  जास्वंदाच्या रोपांच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही सोपे उपाय करू शकता. (How to Take care Of Hibiscus Plant)

प्लांट नेचर रिसर्च.कॉमच्या रिपोर्टनुसार प्रत्येक वनस्पतीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. जास्वंद चांगला वाढण्यासाठी चांगल्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. खूप जास्त किंवा कमी पाणी घातल्याने एकतर झाडं वाढत नाहीत किंवा त्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि फुलांची वाढ कमी होते. 

झाडाची पाने पिवळी असल्यास, त्यात लोह आणि मॅग्नेशियम सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अभाव असल्याचे ते लक्षण आहे. जास्वंद रोज सौम्य सुर्यप्रकाशात ४ ते ५ तासांसाठी ठेवा. तीन दिवसांतून एकदा पाण्याचा स्प्रे करा. त्यावर जर तुम्हाला किड लागल्यासारखे दिसत असेल तर लगेच रासायनिक स्प्रे मारून किड दूर करा.

पोट खूप सुटलंय-कंबरेचा शेप जाड दिसतो? गरम पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या, महिन्याभरात पोट कमी होईल

जास्वंदाची फुलं वाढवण्यासाठी कोणता उपाय करावा?

एका भांड्यात  ५०० मिलीलिटर पाणी आणि २ चमचे चहा पावडर घ्या. उकळी येईपर्यंत हे पाणी गॅसवर ठेवा. हे पाणी थंड झाल्यानंतर त्यात १ लिटर पाणी घाला. हे पाणी जमीनित घाला. हा सोपे उपाय वनस्पती लवकर वाढवण्यास मदत करेल. जर तुमच्याकडे  जास्वंदाची छोटी वनस्पती असेल तर हे मिश्रण तयार करताना त्यात १ चमचा चहा पावडर घालू शकता. 

जर माती ओली राहिली असेल तर पाणी जास्त देऊ नका. माती पूर्णपणे कोरडी होऊ द्या.  तज्ज्ञांच्यामते  ६ महिन्यांनी माती बदलणं गरजेचं असतं. ज्यामुळे फुलांची वाढ चांगली होते नर्सरीतून पौष्टीक माती आणण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे  झाडांची वाढ चांगली होण्यास मदत होईल. जास्वंदाला हवा आणि सुर्यप्रकाश पुरेसा मिळेल अशा ठिकाणी ठेवा.

गुलाब भरकन वाढतो-पण फुलंच येत नाही? १० रूपयांचे ३ पदार्थ मिसळा, गुलाबाने बहरेल बाल्कनी

झाडांवर किटक नाशकांचा स्प्रे करा.  तज्ज्ञांच्यामते  जास्वंदाची माती दर ६ महिन्यांनी बदलणं गरजेचं असतं. यामुळे फुलांची वाढ चांगली होते. नर्सरीतून तुम्ही तुम्ही पौष्टीक माती आणू शकता. तुम्ही रोपांसाठी जे खत वापरता ज्यात पोटॅशियम आणि फॉस्फरेसचे प्रमाण जास्त असते. अन्यथा ते खत रोपाच्या वाढीत अडथळा आणू शकते.  सूक्ष्म पोषकांसह खत मिसळा. 

Web Title: How to Make Your Hibiscus Bloom : 10 Rupees Hacks To Get More Hibiscus Flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.