Lokmat Sakhi >Gardening > How To Plant Mangos At Home : घरातल्या कुंडीत लावता येईल का आंब्याचं झाड? तज्ज्ञ सांगतात, बघा नक्की कसं ते...

How To Plant Mangos At Home : घरातल्या कुंडीत लावता येईल का आंब्याचं झाड? तज्ज्ञ सांगतात, बघा नक्की कसं ते...

How To Plant Mangos At Home : घरचे आंबे खायचे तर घरात कसं लावायचं आंब्याचं झाड, जाणून घ्या....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 01:53 PM2022-04-20T13:53:47+5:302022-04-20T13:56:27+5:30

How To Plant Mangos At Home : घरचे आंबे खायचे तर घरात कसं लावायचं आंब्याचं झाड, जाणून घ्या....

How To Plant Mangos At Home: Can a Mango Tree Be Planted In A Home Pot? Experts say, look how it is ... | How To Plant Mangos At Home : घरातल्या कुंडीत लावता येईल का आंब्याचं झाड? तज्ज्ञ सांगतात, बघा नक्की कसं ते...

How To Plant Mangos At Home : घरातल्या कुंडीत लावता येईल का आंब्याचं झाड? तज्ज्ञ सांगतात, बघा नक्की कसं ते...

Highlightsखतातील सगळे कंटेंट योग्य रितीने पाहून मगच खत खरेदी करायला हवे. आंब्याला कीड लागणार नाही याची विशेष काळजी घ्यायला हवी.

आंबा म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतं. फळांचा राजा येण्याची आपण सगळेच आवर्जून वाट पाहत असतो. उष्णकटीबंधाच्या प्रदेशात म्हणजेच भारतात आंब्याचे पीक मोठ्या प्रमाणात होत.ो आंबा या फळाला पुरेशी उष्णता लागत असल्याने परदेशात हे फळ म्हणावे तितके चांगले येत नाही. आंबा म्हटला की कोकण हे समीकरणच म्हणावे लागेल. कोकणातील आंब्याच्या बागा आणि तिथून आपल्यापर्यंत हे फळ पोहोचण्यासाठी बघावी लागणारी वाट हे दरवर्षीचेच. पण कोकणात आणि बागेत येणारा हा आंबा आता तुमच्या आणि माझ्या घरातही येऊ शकतो. कसा? How To Plant Mangos At Home तेच आपण आज पाहणार आहोत. घरच्या घरी आंबा लावण्याची आणि त्याची मशागत करण्याची पद्धत आपण आज पाहणार आहोत. 

(Image : Google)
(Image : Google)

१. सामान्य आकारापेक्षा लहान असणारे हे आंब्याचे रोप आपण आपल्या आजुबाजूला असणाऱ्या एखाद्या नर्सरीतून आणू शकता. हा आंबा साधारणपणे ८ फूटांपर्यंत वाढतो. पण आपण त्याची छाटणी करुन तो ५ फूटांपर्यंत ठेऊ शकतो. 

२. घरात जरी आपण या आंब्याची लागवड करत असलो तरी गॅलरी, बाल्कनी किंवा एखाद्या खिडकीत या रोपाची कुंडी ठेवायची. जेणेकरुन ६ तास पूर्ण सूर्यप्रकाश या झाडाला मिळायला हवा. यातही दुपारचे कडक ऊन उपयोगाचे नाही, कारण त्याने झाडाची पाने सुकून जातील आणि मातीतील पाण्याचेही बाष्पीभवन होईल.

३. तुम्हाला नर्सरीतून रोप आणायचे नसेल तर घरच्या घरी बी रोपण करुनही तुम्ही आंब्याचे झाड लावू शकता. यासाठी आंब्याची कोय २४ तास पाण्यात भिजवून ठेवायची. त्यानंतर एखाद्या ओलसर कागदात ही कोय ठेवायची. हवेतील तापमानानुसार या कोयीला कोंब फुटतो. कोयीला कोंब आला की एका थोड्या मोठ्या आकाराच्या कुंडीत ही कोय लावावी. 

४. कोंब आलेली ही कोय पूर्णपणे मातीत न रुजवता अर्धी मातीत आणि अर्धी वर अशी रुजवावी. त्यामुळे त्याला पुरेसा प्रकाश आणि हवा मिळते आणि ती लवकर रुजते. या कुंडीत योग्य अशी माती आणि पाणी झिरपण्यासाठी कुंडीला खालच्या बाजूने होल असेल याची काळजी घ्यावी. 

५. या झाडाला रोजच्या रोज पुरेसे पाणी घालावे. उन्हाळ्याच्या दिवसांत तापमान जास्त असल्याने पाणी जास्त लागू शकते पण पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसांत कमी पाणी घातले तरी पुरते. माती ओलसर होईल इतके पाणी घाला. पण चिखल होईल इतके घालू नका. 

(Image : Google)
(Image : Google)

६. या झाडाला खत घालताना विशेष काळजी घ्यायला हवी. महिन्यातून एकदा बायोझोमसारखे खत झाडाच्या मूळाशी घालावे. तर रोप लहान असताना दर दोन आठवड्यांनी किंवा वर्षातून ४ वेळा तुम्ही खत घालू शकता. हे खत ऑर्गेनिक असलेले आणखी चांगले. एकदा झाडाची वाढ चांगली होत आहे असे दिसल्यावर चांगल्या गुणवत्तेचे खत आवश्यक असते. त्यामुळे झाडाची वाढ चांगली होण्यास मदत होते. खतातील सगळे कंटेंट योग्य रितीने पाहून मगच खत खरेदी करायला हवे. 

७. एकदा आंबा लावला की साधारणपणे ४ ते ५ महिन्यात झाड नीट वाढून त्याला फळे यायाला सुरुवात होऊ शकते. नाम डॉक मै, किंग थाई आणि नीलम या आंब्याच्या जाती घरात लावण्यासाठी चांगल्या असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आंब्याला कीड लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. 

 

Web Title: How To Plant Mangos At Home: Can a Mango Tree Be Planted In A Home Pot? Experts say, look how it is ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.