Join us  

झाडांसाठी घरीच तयार करा १ खास औषध, रोपांवर कोणताच रोग पडणार नाही- झाडे वाढतीलही जोमात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2023 6:02 PM

Gardening Tips For Plant Growth: झाडांची चांगली वाढ होण्यासाठी शिवाय त्यांच्यावर रोग पडू नये यासाठी स्वयंपाक घरातले टाकाऊ पदार्थ वापरून एक खास औषध कसं तयार करायचं ते आता पाहूया...

ठळक मुद्देआपण जो पदार्थ तयार करणार आहोत, तो झाडांसाठी खत आणि झाडांवर रोग पडल्यास औषध म्हणून काम करणार आहे.

आपल्या शरीर तंदुरुस्त रहावं, आपल्याला कोणतेही आजार होऊ नयेत, यासाठी आपण पौष्टिक पदार्थ खातो. व्हिटॅमिन्स- कॅल्शियमच्या गोळ्या घेतो. पौष्टिक आहार नाही मिळाला तर आपलीही तब्येत ढासळते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. असंच काहीसं झाडांचंही असतं. झाडांवर कोणताही रोग पडू नये, तसेच त्यांची वाढही चांगली व्हावी, यासाठी झाडांनाही वेळोवेळी खत घालण्याची गरज असते. आता आपण असं एक खत घरीच कसं तयार करायचं ते पाहूया (How to prepare bio enzymes for plants at home). आपण जो पदार्थ तयार करणार आहोत, तो झाडांसाठी खत आणि झाडांवर रोग पडल्यास औषध म्हणून काम करणार आहे.

 

झाडांसाठी घरीच कसं खत तयार करायचं?

झाडांसाठी घरीच खत किंवा बायो एन्झाईम कसं तयार करायचं, याविषयीची माहिती nita_singhs_dil_ki_baat या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. bio enzymes तयार करण्यासाठी जे प्रमुख पदार्थ लागणार आहेत ते म्हणजे कडुलिंबाची पाने, झेडुंची फुले, मोसंबीची साली, लिंबाची साले आणि केळीच्या साली.

दसऱ्यासाठी घर सजविण्याच्या ३ सोप्या झटपट टिप्स, १५ मिनिटांत बदलून जाईल तुमच्या घराचं रुप

याशिवाय गूळ आणि पाणी देखील  लागणार आहे. यासाठी त्यांनी ३: १: १० हे सूत्र सांगितलं आहे. यासाठी सगळ्यात आधी झेंडुची फुलं, मोसंबीच्या साली, लिंबाची साले किंवा केळीच्या साली यांच्यापैकी जे पदार्थ तुमच्याकडे उलब्ध असतील ते सगळे पदार्थ एकत्रितपणे ३०० ग्रॅम एवढे घ्या. त्यात १०० ग्रॅम गूळ आणि १ हजार मिली पाणी टाका.

दसऱ्याला हवाच नथीचा नखरा! बघा १ ग्रॅम सोन्याच्या नथींचे सुंदर डिझाईन्स, पाहा कोणती घालायची?

सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून एकत्र करून घ्या आणि प्लास्टिकच्या बाटलीत भरून ठेवा. जवळपास अडीच ते तीन महिने ते त्या बाटलीत तसेच राहू द्या. ही बाटली जिथे थेट सुर्यप्रकाश येणार नाही, अशा जागी ठेवावी. तीन महिन्यानंतर हे औषध किंवा bio enzyme तयार होईल.

 

बायोएन्झाईम कसे वापरावे?

तुम्ही बाटलीत भरून ठेवलेले bio enzyme तुम्हाला अडीच ते तीन महिन्यांनी वापरता येईल. त्यावेळी त्याचा वास व्हिनेगरसारखा येईल. १ ते २ मिली एन्झाईम १ लीटर पाण्यात मिसळावे आणि हे पाणी झाडांवर शिंपडावे.

डाएट- व्यायाम नेहमी करूनही वजन अचानकच वाढायला लागतं? त्याची ६ कारणं, बघा 'असे' होते का?

झाडांची स्थिती पाहून महिन्यातून एकदा किंवा दोनदा त्या एन्झाईमचा वापर करावा. हे एन्झाईम तुम्ही पुढे कितीही वर्षे वापरू शकता. झेंडूमुळे फुले भरपूर येतात. मोसंबी- लिंबाच्या सालींमुळे झाडे जोमात वाढतात तर कडुलिंबामुळे झाडांवर रोग पडत नाही. असा या एन्झाईमचा उपयोग आहे. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सहोम रेमेडीइनडोअर प्लाण्ट्सपाणीखते