जास्वंदीच्या फुलांच रोपं आपल्या सगळ्यांच्याच घरात हमखास असत. जास्वंदीची लाल, पिवळ्या, गुलाबी, पांढरा अशा वेगवेगळ्या रंगातील फुल पाहिली की मन प्रसन्न होते. खरंतर, जास्वंदीच्या रोपाची फारशी (How to Prevent Hibiscus Leaves From Turning Yellow) काळजी घ्यायची गरज नसते. जास्वंदाच्या या रोपाला भरपूर ऊन आणि गरजेपुरतं पाणी मिळालं की त्याची चांगली वाढ होते. जास्वंदाचे रोप बाल्कनी किंवा घरात असेल घर बहरलेलं दिसतं आणि (How To Make Hibiscus Flower Plant Green With Alum) वातावणरणही ताजंतवानं राहतं. परंतु काहीवेळा अनेकांची अशी तक्रार असते की जास्वंदीच्या रोपाची इतकी काळजी घेऊनही त्याची पानं पिवळी पडतात(Hibiscus plant leaves turning yellow How to fix it).
अनेकदा आपण बघतो की जास्वंदीचे रोप खूप छान बहरुन येते त्याची वाढ चांगली होते, फुल देखील भरपूर प्रमाणांत येतात परंतु त्याच्या हिरव्यागार पानांचा रंग हा सतत पिवळा होतो. अशावेळी वारंवार या रोपांची पानं पिवळी पडत असतील तर नेमकं काय करावं हे आपल्याला सुचत नाही. यासाठीच, तुमच्या घरातील किंवा बाल्कनीतील जास्वंदीच्या रोपाची पानं पिवळी पडली असतील तर चिंता करु नका, जास्वंदीच्या रोपांची पानं हिरवीगार करण्यासाठी आपण एक घरगुती स्वस्तात मस्त उपाय काय करता येईल, ते पाहूयात.
जास्वंदीच्या रोपाची पानं पिवळी पडली तर काय करावे ?
१. तुरटीचा स्प्रे :- जास्वंदीच्या पानांचा रंग हिरवागार ठेवण्यासाठी तुम्ही तुरटीचा स्प्रे वापरू शकता. यासाठी, एक लिटर पाण्यात सुमारे एक ग्रॅम पांढरी तुरटी घाला. त्यानंतर तुरटी पाण्यात विरघळवून घ्यावी, हे तुरटीचे तयार पाणी जास्वंदीच्या पानांवर आणि देठावर शिंपडा. असे केल्याने, या रोपाची पिवळी पडलेली पाने पुन्हा हिरवीगार होतात. याचबरोबर रोपावरील बुरशीजन्य संसर्ग देखील दूर ठेवता येतो. तुरटीच्या स्प्रे ची फवारणी रोपावर १५ ते २० दिवसांतून एकदाच करावी.
२. तुरटीची पावडर :- तुरटीच्या स्प्रे प्रमाणेच तुम्ही तुरटीच्या पावडरचा देखील वापर करु शकता. यासाठी तुरटीचा खडा घेऊन त्याची पूड तयार करून घ्या. त्यानंतर ही तयार तुरटीची पूड रोपाच्या मातीत तसेच मुळांजवळील भागात घाला. असे केल्याने मातीला पोषण मिळते, ज्यामुळे रोपांची पानं पुन्हा हिरवीगार होण्यास मदत होते.
तुळशीची पाने इवलीशी, वाढतच नाहीत? करा ८ उपाय, तुळस वाढेल मस्त...
३. तुरटी आणि ताक :- जास्वंदीच्या रोपाची पाने पिवळी पडली असतील तर तुम्ही तुरटी आणि ताक यांच्या एकत्रित मिश्रणाचा वापर करू शकता. यासाठी, प्रथम एक लिटर पाणी घ्या आणि त्यात एक ग्रॅम तुरटी घाला आणि ते चांगले मिसळा. आता तुरटीच्या द्रावणात २ ते ३ चमचे आंबट दही किंवा ताक घाला आणि ते मिसळा. तुरटी आणि ताकापासून तयार केलेले नैसर्गिक द्रावण १५ ते २० दिवस मातीत मिसळा यामुळे जास्वंदीची पिवळी पडलेली पानं हिरवीगार होण्यास मदत मिळते.