Join us  

मनी प्लांटची पानं कुजतात? पिवळी होतात? ४ टिप्स; हिवाळ्यातही मनी प्लांट हिरव्यागार पानांनी बहरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2024 12:09 AM

How to Prevent Yellowing of Money Plant Leaves? 4 tips : मनी प्लांट जर पाण्यात लावत असाल तर, पाणी नेमकं किती दिवसांनी बदलावं? पाहा..

घर सुशोभित आणि सकारात्मक वातावरण (Positive Vibes) निर्माण व्हावं यासाठी आपण झाडं लावतो (Gardening). त्यात मनी प्लांटचाही समावेश आहे (Money Plant). मनी प्लांटच्या वेलीची लटकणारी पानं गॅलरी, हॉलची भिंत अशा अनेक ठिकाणांची शोभा वाढवतात. मनी प्लांटची योग्य काळजी घेतल्यास त्याची पानं भरभर वाढतात. शिवाय पानंही पिवळीही होत नाही. पण अनेकदा मनी प्लांटची योग्य काळजी घेऊनही लवकर खराब होतात, वाढ खुंटते, यासह पानंही पिवळी होतात.

मनी प्लांटची वाढ व्हावी यासाठी आपण विविध खतांचा वापर करतो. कुंडीतल्या मातीत खत घातल्याने झाडाची वाढ योग्यरित्या होते. पण जर आपण पाण्यात मनी प्लांट लावत असाल तर, त्याचं पाणी कधी बदलावं? पाण्यात काय मिसळल्याने मनी प्लांटची योग्य वाढ होते? हे देखील पाहणं तितकेच गरजेचं आहे. मनी प्लांटची काळजी घेताना कोणत्या चुका टाळाव्या?(How to Prevent Yellowing of Money Plant Leaves? 4 tips).

ना डाएट - ना व्यायाम; फक्त दिवभारात 'एवढे' लिटर पाणी प्या; बघा वजनातला फरक झ्टपट

मनी प्लांटची काळजी घेताना कोणत्या चुका टाळाव्या?

- मनी प्लांटची वेल आणि पानं हिरवीगार राहावी म्हणून आपण घरगुती उपायांचीही मदत घेऊ शकता.

- जर आपण मनी प्लांट पाण्यात लावत असाल तर, बॉटल किंवा भांड्यातील पाणी दर १० ते १५ दिवसांनी बदलत राहा. कारण पाण्यातील गोष्टी झाड शोषून घेते. त्यामुळे बाटलीतील पाणी बदलत राहा.

- जर आपण कुंडीत मनी प्लांट लावलं असेल तर, त्यात कुंडीत पाण्याचा निचरा होण्याची चांगली व्यवस्था करा. असे न केल्याने झाडाची मुळे कुजतात. ज्यामुळे झाडाची वाढ खुंटते.

हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी

- मनी प्लांटच्या उत्तम वाढीसाठी आपण व्हिटॅमिन ई आणि सी कॅप्स्युलची मदत घेऊ शकता. कुंडीतल्या मातीत किंवा बाटलीतील पाण्यात  व्हिटॅमिन ई आणि सी कॅप्स्युल घालून मिक्स करा. यामुळे मनी प्लांटची उत्तम वाढ होईल.

- मनी प्लांटची पानं पिवळी होत असतील तर, पाण्यात ऑलिव्ह ऑईल,  मोहरीचे तेल, किंवा बदाम तेल घालून मिक्स करा. तयार तेल कुंडीतल्या मातीत घाला. या तेलामुळे मनी प्लांटची पानं पिवळी होणार नाही.

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल व्हायरल