Join us

कुंडीतल्या रोपांसाठी केमिकल्सयुक्त कीटकनाशक नको, करा १ घरगुती उपाय, कीड होईल गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2024 08:48 IST

How To Protect Plants From Bugs With Buttermilk & Neem Oil By Gardener Trick : Buttermilk Spray for Pest control and Plant growth : How to Protect Plants & Trees From Bugs & Insects using Neem Oil & Buttermilk Spray : Natural Insecticide for Plants : बहुदा रोपांना कीड लागली की आपण कीटकनाशक फवारतो, त्यापेक्षा किचनमधील पदार्थ वापरुन करा नॅचरल किटकनाशक...

आपल्या घराच्या बाल्कनीत, खिडकीमध्ये किंवा छोट्याशा गार्डनमध्ये आपण रोपं लावतो. घराची शोभा आणि वातावरण सुंदर आणि फ्रेश ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडं, रोपं मोठ्या (Natural Insecticide for Plants) हौसेने लावतो. या सगळ्या रोपांची आपण तितकीच मन लावून काळजी देखील घेतो. परंतु काहीवेळा या रोपांची योग्य ती वेळच्यावेळी काळजी घेऊन देखील या रोपांना कीड लागते. रोपांना कीड लागली की रोपांचे फार नुकसान होते. रोपांवरील ही कीड (Buttermilk & Neem Oil Spray for Pest control and Plant growth) रोपांची मूळ, पान, फळं, फुलं या सगळ्या गोष्टींची नासधूस करते. परिणामी, रोपं कोमेजून जाते किंवा सुकते. अशावेळी या सुकलेल्या रोपाला पुन्हा हिरवेगार करण्यासाठी आणि त्यावरील कीड समूळ नष्ट करण्यासाठी आपण बाजारात विकत मिळणाऱ्या कीटकनाशकांचा वापर करतो(How to Protect Plants & Trees From Bugs & Insects using Neem Oil & Buttermilk Spray).

या विकतच्या कीटकनाशकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची हानिकारक केमिकल्स असतात, या केमिकल्समुळे रोपांचे नुकसान होऊ शकते. ही केमिकल्सयुक्त कीटकनाशक वापरुन आपण तेवढ्यापुरता ही रोपं पुन्हा हिरवीगार करूच शकतो. परंतु यातील केमिकल्समुळे रोपांची वाढ खुंटणे, पानगळती, रोपांना फळं - फुलं न येणे अशा इतर समस्या वाढू शकतात. यासाठीच रोपांवरील लागलेली कीड नष्ट करण्यासाठी अशा केमिकल्सयुक्त कीटकनाशकांचा वापर करण्यापेक्षा आपण किचनमधील काही नैसर्गिक पदार्थांचा वापर नक्कीच करू शकतो. किचनमधील कोणत्या पदार्थाचा वापर करुन आपण नॅचरल घरगुती कीटकनाशक तयार करू शकतो ते पाहूयात. 

साहित्य :- 

१. लस्सी किंवा ताक - १ संपूर्ण बाटली भरुन    २. पाणी - १० लिटर ३. कडुलिंबाचे तेल - २ ते ४ टेबलस्पून 

कावळे-कबुतर कुंडीतील रोपांची नासधूस करतात? करा एक भन्नाट घरगुती युक्ती, रोपं राहतील सुरक्षित...

तुळशीच्या रोपावर शिंपडा हे ‘पिवळं’ पाणी, तुळस कधीच कोमेजणार नाही- हिरवीगार तुळस वाढवेल प्रसन्नता...

कृती :- 

१. एका मोठ्या काचेच्या बाटलीत लस्सी किंवा ताक यापैकी कोणताही एक पदार्थ भरुन ती काचेची बाटली १० ते १५ दिवस उन्हांत ठेवा. २. काही ठराविक काळाने ही बाटली रोज थोडी हलवून घ्यावी. जेव्हा या बाटलीत १० ते १५ दिवसांनी बॅक्टेरिया तयार होतील त्यानंतर बाटली उघडून आतील सगळे मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढून घ्यावे. ३. आता या भांड्यात १० लिटर पाणी आणि २ ते ४ टेबलस्पून कडुलिंबाच्या पानांचे तेल घालावे. आता हे सगळे मिश्रण एकत्रित हलवून घ्यावे. 

या घरगुती कीटकनाशकाचा वापर कसा करावा... 

आपले घरगुती कीटकनाशक बनवून तयार झाल्यानंतर ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरुन घ्यावे. त्यानंतर रोपांच्या ज्या भागांवर कीड लागली आहे त्या भागावर हे घरगुती नॅचरल कीटकनाशक स्प्रे करुन घ्यावे. जर कीड फार मोठ्या प्रमाणांत असेल तर आठवड्यातून सलग २ ते ३ दिवस रोपांवर या स्प्रेची फवारणी करावी. तसेच इतरवेळी किंवा जर कीड लागली नसेल तर किडींचा प्रादुर्भाव लागू नये यासाठी आठवड्यातून फक्त एकदा या स्प्रेची फवारणी करावी. या सोप्या उपायाचा वापर केल्यास आपण घरगुती नॅचरल कीटकनाशक घरच्याघरीच तयार करु शकतो. सोबतच रोपांना केमिकसलयुक्त फवारणी करण्यापासून वाचवू शकतो. या केमिकल्स फ्री घरगुती उपायाने रोपांवरील कीड अगदी सहज पद्धतीने काढता येते.   

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स