गुलाबाचं टपोरं फुल पाहिलं की मन कसं प्रसन्न, आनंदी होऊन जातं. आणि त्यातही ते फुल जर आपल्या छोट्याशा बागेत फुललेलं असेल तर त्यांचा आनंद तर आणखीनच वेगळा. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्या गुलाबाच्या रोपाला भरपूर फुलं येतच नाहीत. अगदीच एखादी कळी महिनाभरातून कधीतरी दिसते. शिवाय रोपाची चांगली वाढही होत नाही (How to remove bugs attack and fungal infection from rose plant). बऱ्याचदा तर गुलाबाच्या रोपावर कीड पडलेली दिसते. पानांना बारीक छिद्र पडतात आणि रोपांवर बारीकशा अळ्या दिसतात (how to take care of rose plant). असं तुमच्याही गुलाबाच्या बाबतीत झालं असेल तर काय उपाय करावा ते बघा.. (home remedies for the fastest growth and bloom of rose plant)
गुलाबाच्या रोपावर कीड पडली असल्यास उपाय
गुलाबाच्या रोपावर कीड पडली आहे असं आपल्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा सगळ्यात आधी त्या रोपाची व्यवस्थित पाहणी करा आणि कीड लागलेल्या भागाची छाटणी करून टाका.
पालक लवकर खराब होतो, २- ३ दिवसांतच सडतो? बघा सोपा उपाय- आठवडाभर राहील फ्रेश
जेव्हा गुलाबाला कीड लागते तेव्हा त्याच्यावर पांढरट, हिरव्या रंगाच्या अळ्या होतात. या अळ्या चटकन दिसून येत नाहीत. त्यामुळे अगदी बारकाईने रोपाचं निरिक्षण करा आणि त्याची व्यवस्थित छाटणी करा.
आपण चांगले पालक आहोत हे आईबाबांनी कसे ओळखायचे? सद्गुरू सांगतात एक खास गोष्ट...
आता आपण गुलाबाच्या कीड लागलेल्या भागाची छाटणी तर केली. पण आता हे रोप पुन्हा व्यवस्थित वाढावं आणि भरपूर फुलं येऊन ते बहरुन जावं, यासाठी काय उपाय करायचा ते पाहा. हा उपाय theunlimitedgreens या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
त्यामध्ये असं सांगितलं आहे की बेकिंग सोडा गुलाबाच्या रोपाच्या वाढीसाठी आणि त्याला भरपूर फुलं येण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यासाठी १ चमचा बेकिंग सोडा कुंडीतल्या मातीमध्ये मिसळून टाका.
पोटावरची चरबी वाढू नये म्हणून करिना कपूर करते 'हा' उपाय, बघा तिचं फिटनेस सिक्रेट
किंवा १ चमचा बेकिंग सोडा २ लीटर पाण्यात टाका आणि हे पाणी गुलाबावर शिंपडा. यामुळेही रोपांवर असलेलं फंगल इन्फेक्शन निघून जाईल आणि रोपांची चांगली वाढ होऊन त्याला भरपूर फुलं येतील.