Lokmat Sakhi >Gardening > रोपांवर बुरशीसारखा पांढरट थर आला? 'हा' पदार्थ लगेच शिंपडा- रोप होईल निरोगी वाढेल भराभर

रोपांवर बुरशीसारखा पांढरट थर आला? 'हा' पदार्थ लगेच शिंपडा- रोप होईल निरोगी वाढेल भराभर

Gardening Tips: हिवाळ्यात थंडीमुळे रोपांवर बऱ्याचदा रोग पडतो. त्यामुळे रोपांचं नुकसान होऊ नये म्हणून हा एक उपाय लगेचच करून पाहा..(best gardening tips to save plants from mealybugs attack)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2024 01:46 PM2024-10-23T13:46:12+5:302024-10-23T13:47:26+5:30

Gardening Tips: हिवाळ्यात थंडीमुळे रोपांवर बऱ्याचदा रोग पडतो. त्यामुळे रोपांचं नुकसान होऊ नये म्हणून हा एक उपाय लगेचच करून पाहा..(best gardening tips to save plants from mealybugs attack)

how to Remove Mealybugs from Plants, best gardening tips to save plants from mealybugs attack | रोपांवर बुरशीसारखा पांढरट थर आला? 'हा' पदार्थ लगेच शिंपडा- रोप होईल निरोगी वाढेल भराभर

रोपांवर बुरशीसारखा पांढरट थर आला? 'हा' पदार्थ लगेच शिंपडा- रोप होईल निरोगी वाढेल भराभर

Highlightsयावर वेळीच उपाय केला नाही, तर सगळं रोप जळून जाऊ शकतं. म्हणूनच त्यावर काय उपाय तातडीने केला पाहिजे ते पाहा...

आपण आपल्या बागेची व्यवस्थित काळजी घेतो. बागेतल्या रोपांना वेळोवेळी पाणी, खत देतो. पण तरीही कधी कधी काही रोपांवर रोग पडतोच. याचं एक कारण म्हणजे हवेतून किंवा मातीतून रोपांना कसलातरी संसर्ग होतो आणि त्यांच्यावर रोग पडतो. किंवा मग वातावरणात झालेला बदल रोपांना सहन न झाल्यामुळे त्यांच्यावर रोग पडतो. हिवाळ्यात हवेतील गारवा वाढला की अनेक रोपांवर बुरशी आल्यासारखा पांढरट थर दिसू लागतो. यालाच रोपांवर मावा पडणे असं देखील म्हटलं जातं (how to Remove Mealybugs from Plants?). यावर वेळीच उपाय केला नाही, तर सगळं रोप जळून जाऊ शकतं. म्हणूनच त्यावर काय उपाय तातडीने केला पाहिजे ते पाहा...(best gardening tips to save plants from mealybugs attack)

 

रोपांवर बुरशी किंवा मावा पडल्यास उपाय

रोपांवर बुरशी किंवा मावा पडल्यास काय उपाय करावा, याविषयीची माहिती baagbagicha2 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

डोक्यावर नवे केस उगवायला सुरुवात होईल! 'हे' खास तेल लावा, केस गळणं बंद होऊन जाईल

जर रोपांवर रोग पडला असेल तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे रोपाच्या ज्या भागात रोग दिसतो आहे ती फांदी कापून टाका. यामुळे हा रोग इतर फांद्यांपर्यंत पसरत नाही आणि रोपांचं जास्त नुकसान होत नाही.

 

जर तुम्ही रोग असणारी फांदी कापून टाकली आणि तरीही पुढच्या काही दिवसांत इतर फांद्यावरही तसाच रोग दिसू लागला तर एका बाटलीमध्ये अर्धा लीटर पाणी घ्या. त्यामध्ये साधारण अर्धा टीस्पून डिटर्जंट किंवा लिक्विड डिशवॉश आणि दोन चमचे नीम ऑईल टाका. 

फक्त ६० रुपयांचं व्हिनेगर चमकवेल तुमचं घर! बघा दिवाळीत स्वच्छतेसाठी व्हिनेगरचे ८ अफलातून उपयोग...

हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि रोपावर जिथे रोग पडला आहे त्या भागात भरपूर प्रमाणात शिंपडा. तसेच रोपाच्या इतर भागावरही शिंपडा. हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा. रोपांवर पडलेला रोग निघून जाईल आणि रोप पुर्णपणे निरोगी होऊन पुन्हा जोमाने वाढेल. 


 

Web Title: how to Remove Mealybugs from Plants, best gardening tips to save plants from mealybugs attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.