साध्य सगळीकडेच हळूहळू पावसाला सुरुवात झाली आहे. वाढती गरमी आणि उन्हाळा सगळ्यांचं नकोसा वाटत होता. कधी एकदा पाऊस पडेल याची सगळेचजण वाट बघत होते. महाराष्ट्रातील काही भागात अजून पाहिजे तसा नाही, पण हलकेच पावसाची सुरुवात झाल्याने वातावरण थंड झाले आहे. आपल्याप्रमाणेच झाडांना देखील हा उन्हाळा नकोसा वाटतो. बहुतांश झाड, वेली, रोपं ही उन्हाळ्यात सुकून जातात. इतकेच नाही तर काहीवेळा या झाडांना फुल, फळं देखील येणं बंद होत( home remedies to revive dry dying plants in summer).
या वाढत्या उन्हामुळे झाडं, वेली, रोपं देखील ऊन लागून सुकून जातात, रोपांची पान गळून पडतात. परिणामी, सूर्यप्रकाशामुळे झाडे सुकतात आणि निर्जीव दिसू लागतात. या उष्णतेमुळे जर आपल्या बगीच्यातील रोपं देखील सुकून गेली असतील तर त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. अशा परिस्थिती आपण किचनमधील काही पदार्थांचा वापर करून ही रोपं पुन्हा पहिल्यासारखी हिरवीगार करु शकतो. वाढत्या उष्णतेमुळे रोपं निर्जीव दिसू नये म्हणून काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करु शकतो(HOW TO REVIVE AND RESTORE A DYING PLANT).
उन्हाच्या तडाख्याने रोपं निर्जीव दिसू नये म्हणून काय करावे ?
१. दालचिनी पावडर :- दालचिनी पावडरचा वापर करुन आपण रोपांची मूळ अधिक मजबूत करु शकतो. उन्हामुळे रोपं कोमेजून जाऊन निर्जीव दिसू लागतात. अशा रोपांच्या मुळाशी दालचिनी पावडर घालावी. याचबरोबर जर आपण कोणते नवीन रोपं किंवा झाड लावत असाल तेव्हा देखील रोपाच्या मुळाशी दालचिनी पूड घालावी. यामुळे झाडांची मूळ मजबूत होऊन त्यांची वाढ चांगली व जलद गतीने होते.
२. तांदुळाचे पाणी :- तांदुळाच्या पाण्याचा वापर करुन देखील आपण रोपांना निर्जीव दिसण्यापासून वाचवू शकतो. उन्हामुळे कोरड्या झालेल्या रोपांना पुन्हा हिरवेगार करण्यासाठी तांदुळाचे पाणी वापरू शकता. यासाठी एक लिटर गरम पाण्यांत मूठभर तांदूळ घालून प्रत्येकी एक टेबलस्पून व्हिनेगर व सोडा घालावा. या मिश्रणाचे पाणी रोपांच्या मुळाशी घालावे.
३. बेकिंग सोडा स्प्रे :- झाडे हिरवीगार राहावीत व किटकांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी बेकिंग सोडा देखील उपयुक्त ठरू शकतो. बेकिंग सोडा स्प्रे हे एक नैसर्गिक किटकनाशक आहे, जे झाडे आणि वनस्पतींसाठी रामबाण उपाय म्हणून काम करेल. यासाठी ३ लिटर पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळा आणि हे पाणी एका बाटलीत भरून ठेवा. आता काही दिवसांनी प्रभावित झाडांवर याची फवारणी करत राहा.
४. लसूण पाणी :- उन्हाळ्यात झाडांना लहान आणि धोकादायक किटकांचाही प्रादुर्भाव होऊ शकतो. यांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही लसूण वापरू शकता. अशा परिस्थितीत, लसूण पाकळ्या गरम पाण्यात ३० मिनिटे भिजवून ठेवाव्यात. नंतर हे पाणी गाळून घ्या आणि हे पाणी रोपांना थोडे थोडे करून घाला. तसेच आपण हे पाणी एका बॉटलमध्ये भरुन ठेवून रोज त्याची फवारणी रोपांवर करु शकता.