Join us  

तुळस सुकली- पानं झडून गेली? हिवाळ्यात तुळशीची काळजी घेण्यासाठी ३ टिप्स- तुळस होईल हिरवीगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2023 5:05 PM

How To Take Care Of Tulsi Plant In Winter: हिवाळ्यात थंडीमुळे बऱ्याचदा तुळस सुकते, तिची पानं गळू लागतात. असं होऊ नये म्हणून या ३ गोष्टी लक्षात ठेवा.(How to save holy basil plant in winter)

ठळक मुद्देथंडी आणि जास्त पाण्यामुळे अतिथंड झालेली माती यामुळेही तुळस सुकू शकते.

तुळशीच्या रोपाची खूप काळजी घ्यावी लागत नाही हे मान्य आहे. पण तरीही त्या रोपाकडे अजिबात दुर्लक्ष करूनही चालत नाही. तिच्याकडे लक्ष देण्यास आपण कमी पडलो की ती सुकत जाते, पानं गळून जातात. बऱ्याचदा अतिथंडीमुळे आणि त्या तुलनेत ऊन कमी मिळाल्यामुळे थंडीच्या दिवसांत तुळस सुकून जाते (How to save holy basil plant in winter). असं होत असेल तर लगेचच हे काही सोपे उपाय करून पाहा (How to take care of tulsi plant). यामुळे तुळस पुन्हा बहरेल आणि छान हिरवीगार होईल...(Gardening tips for tulsi)

 

हिवाळ्यात कशी घ्यायची तुळशीच्या रोपाची काळजी?

हिवाळ्यात तुळशीच्या रोपाची काळजी कशी घ्यायची, याविषयीची माहिती myplantsmygarden या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

रोज भात खाल्ला तरी वजन वाढणार नाही- फक्त त्यासाठी 'अशा' पद्धतीने शिजवा भात

१. रात्रीच्या वेळी तुळशीचे रोप झाकणे

दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी वातावरण खूप थंड झालेले असते. या थंडीमध्ये तुळशीच्या रोपाची काळजी घेण्यासाठी तुळशीचे रोप रात्रीच्या वेळी एखाद्या सुती कपड्याने झाकून टाकावे.

डाळ- तांदुळात नेहमीच किडे होतात? ५ उपाय करा, किडे- अळ्या अजिबात होणार नाहीत

किंवा एक मोठी प्लास्टिकची पिशवी घ्यावी. तिला ठिकठिकाणी छिद्रे पाडावी आणि त्याने तुळस झाकून टाकावी.

 

२. तुळशीची छाटणी

तुळशीला मंजिरी आलेल्या दिसल्या की त्याठिकाणी तुळशीची लगेच छाटणी करून टाकावी. कारण मंजिरी खूप आल्या की तुळस सुकत जाते. तिच्या पानांचा रंग बदलत जातो. 

रात्री झोपण्यापुर्वी 'या' जादुई पाण्याने चेहरा पुसा, चेहऱ्यावरचे डाग जातील- त्वचा होईल चमकदार

३. मोजकेच पाणी

थंडीच्या दिवसांत तुळशीला मोजकेच पाणी द्यावे. जर माती सुकली आहे, असे जाणवले तरच थोडे पाणी घालावे. थंडी आणि जास्त पाण्यामुळे अतिथंड झालेली माती यामुळेही तुळस सुकू शकते. शिवाय तुळशीला पुरेसे कडक ऊन मिळतेय की नाही याकडेही लक्ष द्यावे. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सथंडीत त्वचेची काळजीइनडोअर प्लाण्ट्सपाणी