बहुतांश भारतीयांच्या घरात किंवा बाल्कनीबाहेर आपण तुळशीचं रोपटे (Tulasi) किंवा झाड लावतोच. तुळशीमुळे घर प्रसन्न तर राहतेच, शिवाय त्याची पानं खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. तुळशीच्या रोपाची जास्त काळजी घ्यावी लागत नाही, हे मान्य आहे. पण तरीही त्या रोपाकडे अजिबात दुर्लक्ष करूनही चालत नाही. तिच्याकडे लक्ष देण्यास आपण कमी पडलो की ती सुकत जाते, पानं गळून जातात. यासह त्याच्या बाजूला काही झाडं ठेवल्याने ती सुकून जाते.
शहरी भागात अनेकांची बाल्कनी लहान असते (Gardening Tips). त्यामुळे काही लोकं एका रांगेत रोपटी लावतात. पण तुळशीच्या बाजूला अशी काही रोपटी ठेवल्याने तिची वाढ खुंटते. शिवाय तुळशीची पानं गळू लागतात. त्यामुळे तुळशीच्या बाजूला कोणते रोपटे ठेवू नये? पाहूयात(How to Save Tulsi Plant from Dying in Winters).
काकडी
तुळशीच्या रोपट्याच्या बाजूला कधीही काकडीचे झाड लावू नये. तुळस आणि काकडी एकमेकांच्या बाजूला असतील तर, काकडीच्या चवीवर परिणाम होतो. शिवाय काकडी आणि तुळशीच्या रोपट्याला पाणी जास्त लागते. काकडी अनेकदा त्याच्या शेजारच्या वनस्पतींची चव घेते. त्यामुळे काकडींसोबत तुळशीचं रोपटे लावू नका.
मनी प्लांट पाण्यात लावावा की मातीत लावणं योग्य? मनी प्लांट भरपूर वाढायचा तर..
बडीशेप
बडीशेप आणि तुळस एकत्र वाढवणे हानिकारक ठरू शकते. कारण बडीशेपचे रोपटे अशा कीटकांना आकर्षित करू शकते, ज्यामुळे तुळशीची पानं गळू शकतात, किंवा खराब होऊ शकतात. ज्यामुळे तुळशीची योग्य वाढ होऊ शकत नाही.
तुळस वाढत नाही, कोमेजली? मातीत मिसळा ही खास पावडर, तुळस होईल डेरेदार
रास्पबेरी
रास्पबेरी एक बेरी वर्गीय फळ आहे. हे लाल रंगाचे फळ असते. त्याच्या झाडाला देखील रास्पबेरी म्हटले जाते. पण तुळशीच्या बाजूला याचे रोपटे वाढवू नये. रास्पबेरीचे झाड लवकर पसरते. हे झाड सूर्यप्रकाश, पाणी आणि पोषक तत्व आपल्याकडे खेचून घेतात. ज्यामुळे तुळशीला वाढ होण्यासाठी हे घटक मिळत नाही. शिवाय तुळसच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होतो.