Join us  

पावसाचे पाणी कुंड्यांमध्ये साचून रोपं सडतात ? ५ सोपे उपाय, पावसाळ्यात अशी घ्या रोपांची काळजी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2024 1:36 PM

Protecting Plants Against Heavy Rain : मुसळधार कोसळणाऱ्या पावसांत आपल्या गच्चीत - बाल्कनीत असणाऱ्या रोपांची काळजी कशी घ्यावी ते पाहूयात...

पावसाळा आला की उन्हाच्या तडाख्याने मरगळलेली - सुकून गेलेली रोपं पुन्हा ताजीतवानी होतात. पाऊस आल्याचा आनंद जसा आपल्याला होतो तसाच तो झाडांना देखील होतो. घराच्या गच्चीत - बाल्कनीत ठेवली झाड,रोपं यांना ऊन आणि पाणी या दोघांची तितकीच गरज असते. परंतु कोणत्याही रोपाला ऊन आणि पाणी हे समप्रमाणातच लागते. रोपांना जास्तीचे ऊन आणि पाणी लागले तरीही ती खराब होऊ शकतात. घराच्या गच्चीत - बाल्कनीत ठेवलेल्या रोपांची उन्हाळ्यात व पावसाळ्यात (How To Protect Potted Plants From Heavy Rain) योग्य ती काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात या रोपांना अधिक ऊन लागण्यापासून त्यांचा बचाव करावा लागतो. तसेच पावसाळ्यात रोपांना अधिक पाणी मिळाले की त्यांची मूळ कुजून जातात(Protecting Plants from Heavy Rain).

पावसाळ्यात बरेचदा भरपूर पाऊस पडला तर या रोपांच्या कुंड्यात जास्तीचे पाणी साचून राहते. हे पाणी असेच साचून राहिले तर गरजेपेक्षा जास्त पाणी मिळाल्याने रोपं खराब होऊ शकतात. याचबरोबर धो धो कोसळणाऱ्या (WAYS TO PROTECT PLANTS FROM HEAVY RAIN) पावसाच्या पाण्याच्या माऱ्याने किंवा सोसाट्याच्या वाऱ्याने कुंडीतील मातीचे नुकसान होते. त्याचबरोबर सतत पावसाच्या पाण्याचा फटका बसल्याने देखील रोपांना हानी पोहचू शकते. अशावेळी या मुसळधार कोसळणाऱ्या पावसांत आपल्या गच्चीत - बाल्कनीत असणाऱ्या रोपांची काळजी कशी घ्यावी ते पाहूयात(5 Useful Strategies to Protect Your Plants from Rain Damage).

मुसळधार पावसात रोपांची काळजी घ्यावी ? 

१. कुंड्यांच्या तळाशी असणारा पालापाचोळा काढा :- पावसाचे जास्त पाणी कुंड्यांमध्ये साचून राहिल्याने  मुळे कुजतात आणि झाडे मरतात. पावसाळ्यात असणारे ओले आणि दमट वातावरण जिवाणूंच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे पावसाळ्यात रोपांवर बुरशी येण्याची शक्यता अधिक असते. मुसळधार पावसामुळे झाडाची देट कमकुवत होऊन पडू शकतात. पावसाळा सुरु होण्यापूर्वी रोपांच्या अगदी खालच्या भागात असणारी पाने काढून टाकावी. कुंड्यांमध्ये पावसाचे पाणी भरल्यावर ही पाने गळून जातात. त्याचबरोबर कुंड्यांच्या तळाशी जर पालापाचोळा जमा झाला असेल तर तो काढून टाकावा. हा पालापाचोळा काढून कुंड्यांचा तळ मोकळा करावा. यामुळे कुंड्यांच्या तळाशी असणारी छिद्र मोकळी होऊन कुंड्यांमध्ये जमा झालेले पावसाचे पाणी या छिद्रांवाटे निघून जाईल. जर अधिक पाऊस झाला तर रोपं छत्री किंवा प्लॅस्टिकच्या शिट्सच्या मदतीने काही काळासाठी झाकून ठेवावीत. 

२. कुंड्यातील माती तपासा :- रोपांच्या मुळांना मातीचा भक्कम आधार असतो. यासाठी पावसाच्या माऱ्याने रोपं डगमगू नयेत म्हणून मुळाशी पुरेशा प्रमाणात माती घालावी. मुळाशी असणाऱ्या या मातीच्या थरामुळे रोपांचे मुसळधार पावसांपासून रक्षण केले जाते. 

३. सुक्या गवताच्या असा करा वापर :- कुंड्यांमध्ये मातीच्या थरावर सुक्या गवताच्या पानांचा एक थर अंथरून घ्यावा जेणेकरून पावसाचे पाणी कुंड्यांमध्ये साचून राहणार नाही. पावसाळ्यात अधिकच्या आर्द्रतेमुळे रोपांची मूळ कुजतात किंवा खराब होतात, म्हणून सुक्या गवताचा वापर करावा. सुक्या गवतामुळे मातीची होणारी धूप रोखली जाऊन मातीतील पोषक तत्व कायम तशीच ठेवली जातात.   

४. मातीच्या गुणवत्तेची काळजी घ्या :- पावसाळ्यात मातीच्या गुणवत्तेची काळजी घेण्यासाठी त्यात कोको पीट किंवा शेणखत मिसळून कोरडी माती बनवा. त्यामुळे मुसळधार पाऊस आणि सततच्या पाण्यामुळे कुंड्यांमध्ये पाणी साचण्याची समस्या राहणार नाही. मातीमध्ये कंपोस्ट खत मिसळा, ज्यामुळे मातीचा पोत  सुधारेल. 

५. कुंड्यांमध्ये अशी भरा माती :- पावसाळ्याच्या आधी कुंड्यांमधील माती योग्य पद्धतीने भरा. ३ भाग माती आणि १ भाग शेणखत अशा प्रकारे कुंड्यांमध्ये माती भरून घ्यावी. कुंड्यांच्या काठोकाठ माती भरावी जेणेकरून पावसाचे पाणी कुंड्यांमध्ये साचून राहणार नाही.

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स