Lokmat Sakhi >Gardening > गोकर्णाला भरपूर फुलं येण्यासाठी ५ टिप्स- निळ्याशार फुलांनी बहरून जाईल बाल्कनीतली कुंडी

गोकर्णाला भरपूर फुलं येण्यासाठी ५ टिप्स- निळ्याशार फुलांनी बहरून जाईल बाल्कनीतली कुंडी

Gardening Tips For Gokarn Flower: कमीतकमी काळजी घेऊनही भरपूर फुलं देणारा एक वेल म्हणजे गोकर्ण. बघा तिची भरभरून वाढ होण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची...(simple and easy tips to get more flowers from aparajita or gokarn)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2025 15:52 IST2025-02-18T15:51:30+5:302025-02-18T15:52:13+5:30

Gardening Tips For Gokarn Flower: कमीतकमी काळजी घेऊनही भरपूर फुलं देणारा एक वेल म्हणजे गोकर्ण. बघा तिची भरभरून वाढ होण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची...(simple and easy tips to get more flowers from aparajita or gokarn)

how to take care of aparajita or gokarna plant, simple and easy tips to get more flowers from aparajita or gokarn plant | गोकर्णाला भरपूर फुलं येण्यासाठी ५ टिप्स- निळ्याशार फुलांनी बहरून जाईल बाल्कनीतली कुंडी

गोकर्णाला भरपूर फुलं येण्यासाठी ५ टिप्स- निळ्याशार फुलांनी बहरून जाईल बाल्कनीतली कुंडी

Highlightsगोकर्णाचा वेल तुमच्या कुंडीमध्ये कसा लावायचा आणि त्याला भरपूर फुलं येण्यासाठी कशी काळजी घ्यायची ते पाहूया..

काही फुलं एवढी मोहक असतात की बघताक्षणीच ती आपल्याला आकर्षून घेतात. या फुलांकडे डोळे भरून पाहिलं तरी मन कसं प्रसन्न होऊन जातं. मनावरची मरगळ दूर होते. असंच एक फूल आहे गोकर्णाचं. निळ्या आणि पांढऱ्या या दोन्ही रंगांमध्ये गाेकर्णाचं फुल येतं. पण त्यापैकी निळ्याशार रंगाची फुलं अतिशय आकर्षक दिसतात. या फुलांचा वेल जर तुम्ही बाल्कनीमध्ये लावला तर रोजच या फुलांचा देखणा नजारा तुम्हाला पाहायला मिळू शकतो (how to take care of aparajita or gokarna Flower?). त्यासाठी गोकर्णाचा वेल तुमच्या कुंडीमध्ये कसा लावायचा आणि त्याला भरपूर फुलं येण्यासाठी कशी काळजी घ्यायची ते आता पाहूया..(simple and easy tips to get more flowers from aparajita or gokarn plant)

 

गाेकर्णाच्या वेलाची काळजी कशी घ्यायची?

१. गाेकर्णाचा वेल ज्यांच्या कोणाच्या अंगणात असेल त्यांच्याकडून तुम्ही त्या वेलीला येणारी एखादी वाळलेली शेंग आणा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात ज्या कुंडीमध्ये गोकर्ण लावायचा असेल त्या कुंडीमध्ये त्याच्या बिया टाकून द्या. काही आठवड्यात तिथे हिरवी कोवळी पानं फुटलेली दिसतील.

राधिका मर्चंटचे सुंदर 'बटरफ्लाय' ब्रेसलेट, पाहा बटरफ्लाय मंगळसूत्राचा नवा ट्रेण्ड- ७ सुंदर डिझाईन्स

२. गोकर्णाचा वेल जर खूप वर चढवणार नसाल तर त्यासाठी १० इंच खोल कुंडीही पुरेशी ठरते. या कुंडीतली माती खूप चिकट नसावी. त्यामुळे माती, थोडीशी वाळू आणि गांडूळखत यांचं मिश्रण असणाऱ्या कुंडीमध्ये गोकर्ण छान फुलतो.

 

३. गोकर्णाच्या फुलाला खूप जास्त पाणी घालू नका. माती ओलसर राहील एवढंच पाणी त्यासाठी पुरेसं असतं.

शिवजयंती स्पेशल रांगोळी: झटपट काढता येणाऱ्या सोप्या रांगोळ्यांनी सजवा तुमचं घर आणि अंगण

४. गोकर्णाच्या वेलाच्या वाढीसाठी त्याला पुरेसं ऊन मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे ती कुंडी अशाच ठिकाणी ठेवा जिथे ३ ते ४ तास तरी भरपूर सुर्यप्रकाश येतो. 

५. गोकर्णाला जेव्हा फुलं येतात तेव्हा ती सायंकाळी तोडून टाकावी. कारण या फुलांपासून नंतर शेंगा तयार होतात आणि जास्त शेंगा आल्या की वेलाची वाढ खुंटते..
 

Web Title: how to take care of aparajita or gokarna plant, simple and easy tips to get more flowers from aparajita or gokarn plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.