इनडोअर प्लांट्स इतर रोपट्यांच्या तुलनेत नाजूक असतात. त्यामुळे त्यांची काळजी थोडी वेगळ्या पद्धतीने घ्यावी लागते. या झाडांना जसं खूप ऊन सहन होत नाही, तशी खूप सावलीही चालत नाही. पाणीही अगदीच मोजून मापून घालावं लागतं. एरवी पावसाळा आला की इतर रोपटी मात्र भरपूर पाणी पिऊन सुखावून जातात. पण त्याच्या अगदी उलट इनडोअर प्लांट्सचं होतं. त्यांना थोडं जरी पाणी जास्त झालं, तरी ते लगेच कोमेजून जातात (How to take care of indoor plants in monsoon?). म्हणूनच ऊन कमी, पाऊस जास्त अशा ढगाळ वातावरणात इनडोअर प्लांट्सला कसं जपायचं, यासाठी बघा या काही खास टिप्स...(3 Gardening tips for indoor plants)
पावसाळ्यात इनडोअर प्लांट्सची कशी काळजी घ्यावी
१. जागा बदला
इनडोअर प्लांट्स असली तरी ती आपण नेहमीच घरात ठेवू शकत नाही. सुर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी सावलीत ठेवणं त्यांना गरजेचं असतं.
त्यामुळे तुम्ही जर थोडासा आडोसा पाहून अंगणात, बाल्कनीत इनडोअर प्लान्ट सावलीत ठेवलं असेल तर पावसाळ्यात त्यांना थेट पाऊस लागत तर नाही ना, हे बघा. पाऊस लागत असेल तर लगेचच त्यांची जागा बदला.
२. माती ओलसर ठेवा
आपण पावसाळ्यात इनडोअर प्लांट्स अनेकदा सावलीत ठेवून देतो आणि नंतर मात्र त्यांना पाणी घालायचंच विसरून जातो. त्यामुळे मग ते सुकायला सुरुवात होते.
‘वाटलं होतं मी कधीच आईच होऊ शकणार नाही!’ शिल्पा शेट्टीला असा कोणता दुर्मिळ आजार झाला होता?
त्यामुळे त्यांची माती थोडीशी ओलसर राहील एवढी फक्त काळजी घ्या. ३ ते ४ दिवसांनी २ टेबलस्पून पाणी घातलं तरी त्यांना ते पुरेसं आहे.
३. शक्यतो घरात ठेवू नका
पावसाळ्यात घरातही स्वच्छ सुर्यप्रकाश येत नाही. घरातही दमट वातावरण असतं.
सतत अर्ध डोकं ठणकतं, मायग्रेनचा त्रास? ६ आयुर्वेदिक उपाय, डॉक्टर सांगतात..
त्यामुळे पावसाळ्यात सहसा इनडोअर प्लान्ट घरात ठेवूच नये. अंगणात, टेरेसमध्ये आडोसा बघूनच त्यांना ठेवा.