Lokmat Sakhi >Gardening > 'लकी' बांबू प्लांट काही दिवसांतच सुकलं- पानं पिवळी पडली? ४ सोप्या टिप्स, लगेच होईल हिरवंगार

'लकी' बांबू प्लांट काही दिवसांतच सुकलं- पानं पिवळी पडली? ४ सोप्या टिप्स, लगेच होईल हिरवंगार

Why Does Leaves Of Bamboo Plants Get Yellow?: मोठ्या हौशीने घरी आणलेलं बांबू प्लांट नेहमीच छान हिरवंगार, टवटवीत राहण्यासाठी त्याची पुढील पद्धतीने काळजी घ्या..(gardening tips for bamboo plant)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2025 17:02 IST2025-02-10T13:20:00+5:302025-02-11T17:02:26+5:30

Why Does Leaves Of Bamboo Plants Get Yellow?: मोठ्या हौशीने घरी आणलेलं बांबू प्लांट नेहमीच छान हिरवंगार, टवटवीत राहण्यासाठी त्याची पुढील पद्धतीने काळजी घ्या..(gardening tips for bamboo plant)

how to take care of lucky bamboo plant, 4 tips for the best growth of bamboo plant | 'लकी' बांबू प्लांट काही दिवसांतच सुकलं- पानं पिवळी पडली? ४ सोप्या टिप्स, लगेच होईल हिरवंगार

'लकी' बांबू प्लांट काही दिवसांतच सुकलं- पानं पिवळी पडली? ४ सोप्या टिप्स, लगेच होईल हिरवंगार

Highlights बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की घरी आणल्यानंतर नेमकं काही दिवसातच बांबू प्लांट सुकायला लागतं किंवा त्याची पानं गळू लागतात.

आपल्याकडे अशी काही रोपं आहेत जी 'लकी प्लांट' म्हणून ओळखली जातात. त्यापैकीच एक म्हणजे बांबू प्लांट. काचेच्या आकर्षक भांड्यात दिलं जाणारं बांबू प्लांट अनेक जण हौशीने घरी घेऊन येतात. छान सजवून ठेवतात. अगदी हॉलपासून ते स्वयंपाक घरापर्यंत कुठेही ते ठेवलेलं दिसतं. लकी प्लांट आहे म्हणून आपण हौशीने ते घरी आणतो. पण बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की घरी आणल्यानंतर नेमकं काही दिवसातच ते सुकायला लागतं किंवा त्याची पानं गळू लागतात. लकी प्लांटची अशी अवस्था बघवत नाही (how to take care of lucky bamboo plant). म्हणूनच त्याची योग्य ती काळजी घ्यायची असेल तर या काही टिप्स पाहा..(4 tips for the best growth of bamboo plant)

 

बांबू प्लांटची काळजी कशी घ्यावी?

१. बांबू प्लांटला व्यवस्थित उजेड मिळालाच पाहिजे. ज्या ठिकाणी एखाद्या काचेतून किंवा खिडकीतून थेट त्याच्यावर सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी त्याला ठेवा. कमी सूर्यप्रकाश असेल तर हे रोप कोमेजून जातं. 

कणकेमध्ये 'हा' पांढरा पदार्थ मिसळून करा पोळ्या, १ महिन्यात सुटलेलं पोट उतरून वजन घटेल

२. बांबू प्लांट ज्यामध्ये ठेवलेलं आहे ते काचेचं भांडं नेहमी दररोज थोडं थोडं गोलाकार पद्धतीने फिरवा. जेणेकरून त्या रोपाला सगळ्या दिशांनी व्यवस्थित ऊन लागेल. जर तुम्ही ते भांडं फिरवलं नाही तर तुमचं रोप एकाच दिशेने वाढेल. 

 

३. बांबू प्लांटला तुम्ही किती पाण्यात ठेवत आहात ते देखील खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या देठांकडचा ठराविक भागच पाण्यात बुडाला पाहिजे. जर पाणी खूप जास्त झालं किंवा कमी झालं तरीही ते रोप खराब होऊ शकतं आणि त्याची पानं पिवळी पडू शकतात.

हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं? भरपूर लोह देणारी ७ फळं खा, शरीरातील रक्त वाढेल

४. तुम्ही जे पाणी पिता तेच पाणी बांबू प्लांटच्या भांड्यात घाला. जर पाण्यात खूप जास्त खनिजे किंवा क्षार असतील तरीही त्या पाण्याने बांबू प्लांट खराब होऊ शकतं.

 

Web Title: how to take care of lucky bamboo plant, 4 tips for the best growth of bamboo plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.