आपल्या होम गार्डनमध्ये गुलाब, तुळस, जास्वंद यांच्यासोबत आणखी एक रोप असते ते म्हणजे मोगरा. मोगऱ्याचा सुवास आला की तो मनाला मोहून टाकणारा असतो. त्यामुळेच देवाला वाहण्यासाठी, महिला डोक्यात माळण्यासाठी आणि डेकोरेशनसाठीही मोगऱ्याचा अवश्य वापर केला जातो. अतिशय नाजूक तरीही मोहक अशी ही फुलं घराच्या कुंडीतही मस्त येतात. पण काहीवेळा मात्र मोगऱ्याच्या झाडाला बुरशी लागल्यासारखे होते, पानांच्या खाली पांढरा भुरा येतो (How To Take Care Of Mogra jasmine Plant In Home Garden).
असे झाले की रोपाला फुलंही येणे बंद होते. अशावेळी या मोगऱ्याच्या रोपाची काळजी कशी घ्यायची हे आपल्याला माहित असायला हवे.मोगऱ्यामध्ये साधा मोगरा, डबल मोगरा, बटमोगरा, मदनबाण असे मोगऱ्याचे बरेच प्रकार असतात. मोगऱ्याला केवळ छाटणी करुन किंवा खत घालून उपयोग नाही. तर त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. पाहूयात मोगऱ्याला छान बहर यावा यासाठी काय करायला हवं ...
१. सगळ्यात आधी किड लागलेल्या फांद्या कात्रीने कापायच्या, म्हणजे या फांद्यांना लागलेली कीड इतर सगळीकडे पसरणार नाही.
२. त्यानंतर एका स्प्रे बाटलीमध्ये कोणतेही किटकनाशक किंवा कडुलिंबाचे तेल घ्यायचे.
३. हे किटकनाशक किंवा तेल स्प्रे बाटलीने रोपावर, पानांवर आणि मातीत सगळीकडे मारावे.
४. काही दिवसांतच या मोगऱ्याच्या रोपाचे फंगस निघून जाण्यास मदत होईल आणि रोपाची छान वाढ होईल.
५. अशाप्रकारे किटकनाशक मारल्याने रोपाला भरपूर फुलं येण्यासही मदत होते.