Join us  

मनी प्लांटची वेल वाढतच नाही? चमचाभर 'ही' पांढरी गोष्ट करेल जादू; भराभर वाढेल झाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2024 5:51 PM

How to Take care of Money plant during Monsoon : मनी प्लांटची पानं पिवळी पडत असतील तर, ४ गोष्टींची काळजी घ्या..

आपल्या घराची आणि अंगणाची शोभा वाढवण्यासाठी मनी प्लांट लावण्यात येते (Monsoon). आजकाल प्रत्येक घरात मनी प्लांट असतेच. मनी प्लांटची चांगली वाढ झाली तर, घराची शोभा वाढते, शिवाय बाल्कनी देखील सुरेख दिसते (Money Plant). पण अनेकांची तक्रार असते, की घरातला मनी प्लांट व्यवस्थित वाढत नाही (Gardening Tips). पानं लगेच पिवळी पडतात.

शिवाय मनी प्लांटची वेल व्यवस्थित वाढत नाही. जर मनी प्लांटची पानं पिवळी आणि व्यवस्थित वाढ होत नसेल तर, मनी प्लांटची विशेष काळजी घ्या. त्यात एक पांढरी गोष्ट घाला. झाडांच्या पानांमध्ये पुन्हा जिवंतपणा येईल. शिवाय प्लांट एअर प्युरिफायर म्हणूनही काम करेल(How to Take care of Money plant during Monsoon).

पाण्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवा

मनी प्लांटची विशेष काळजी घ्यावी लागत नाही. शिवाय या प्लांटला जास्त पाणी देण्याचीही गरज भासत नाही. दररोज पाणी दिल्याने मनी प्लांटची मुळे कुजतात. त्यामुळे प्लांटच्या मुळांकडे विशेष लक्ष द्या. माती ओले होईल इतकेच पाणी घाला.

पावसाळ्यात बाथरुम-टॉयलेटमध्ये दुर्गंधी येते? ४ टिप्स, गांडूळ-डासही राहतील दूर-वाटेल स्वच्छ

पाणी बदला

मनी प्लांटला स्वच्छ पाण्याची गरज असते. जर आपण पाण्यात मनी प्लांट लावलं असेल तर, पाणी नियमित बदलत राहा.  बाटली किंवा भांड्यात मनी प्लांट लावला असेल तर दर २ ते३ दिवसांनी नियमितपणे त्याचे पाणी बदला.

खत मिसळा

मनी प्लांट जर कुंडीत लावलं असेल तर, मातीत नैसर्गिक खत मिसळा. नैसर्गिक खत म्हणजेच गायीचे किंवा म्हशीचे शेण टाका. आपण त्यात एप्सम मीठ देखील घालू शकता. यामुळे मनी प्लांटची योग्य वाढ होईल. दर ३ ते ४ महिन्यांनी मनी प्लांटच्या मातीत नैसर्गिक खत मिसळा.

वाढीच्या वयात मुलं फिट व्हावी असं वाटत असेल तर खाऊ घाला ५ पदार्थ, आजीपणजीच्या काळातला सोपा उपाय

थेट सूर्यप्रकाशाजवळ ठेवू नका

मनी प्लांट थेट सूर्यप्रकाशाजवळ ठेवू नका. सुरक्षित सावलीच्या ठिकाणी ठेवा. मनी प्लांटला निरोगी ठेवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी प्रकाश सूर्यप्रकाश दाखवा. मात्र कडक उन्हापासून लांब ठेवा. 

टॅग्स :बागकाम टिप्समोसमी पाऊससोशल व्हायरल