Join us  

गुलाबाच्या रोपावर बुरशी पडली, पानांवर बारीक छिद्रं दिसू लागली? ५ उपाय करा, गुलाब पुन्हा बहरेल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2024 4:23 PM

Gardening Tips For Rose Plant: पावसाळ्यात गुलाबाच्या रोपावर बुरशी किंवा पांढरी पावडर दिसण्याचे प्रमाण खूप वाढते. म्हणूनच हे काही उपाय लगेच पाहून घ्या. (remedies for white bugs, powdery mildew to rose plant)

ठळक मुद्देगुलाबाच्या रोपाला पुरेसं ऊन मिळालं नाही तर त्यावर बुरशी पडते. किंवा पांढरी पावडर टाकल्याप्रमाणे ते रोप दिसू लागतं.

वातावरणात झालेला बदल जसा काही वेळा आपल्याला सहन होत नाही, तसंच आपल्या बागेतल्या रोपांचंही असतं. त्यांनाही बऱ्याचदा वातावरणातला बदल सहन होत नाही. आता उन्हाळा संपून पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे झाडांना मिळणारं ऊन, पाणी यात बदल झाला आहेच. त्यामुळे या दिवसांत रोपांवरही किड पडण्याची समस्या वाढतेच. गुलाबाच्या रोपाला पुरेसं ऊन मिळालं नाही तर त्यावर बुरशी पडते (how to take care of rose plant in rainy days). किंवा पांढरी पावडर टाकल्याप्रमाणे ते रोप दिसू लागतं. या दिवसांत ही समस्या खूप ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे तुमच्या रोपाच्याही बाबतीत असंच काहीसं झालं असेल तर लगेचच हे काही उपाय करून पाहा. (remedies for white bugs, powdery mildew to rose plant)

गुलाबाच्या रोपावर बुरशी पडल्यास उपाय 

 

१. कापणी करा

गुलाबाच्या ज्या भागावर बुरशी पडली आहे, तो भाग जर वेळीच काढून टाकला नाही तर रोपांवरही ही कीड पसरत जाते. पानांवर बारीक बारीक छिद्रं दिसू लागतात आणि रोपाची वाढ खुंटते. हा रोग जास्त वाढला तर गुलाब पुर्णपणे कोमेजून जातात. त्यामुळे असं काही रोपावर दिसलं तर तो भाग लगेचच कापून टाका आणि गुलाबाची व्यवस्थित कटींग करून घ्या.

योगा- व्यायाम करायला वेळच नाही? फक्त ५ मिनिटांचे 'असे' स्ट्रेचिंग करा, वजन मुळीच वाढणार नाही

२. कुंडीची जागा बदला

पुरेसं ऊन मिळालं नाही तर गुलाबावर बुरशी किंवा रोग पडतो. त्यामुळे रोपाची कापणी केल्यानंतर कुंडीची जागा एकदा बदलून पाहा. पुरेसं ऊन मिळाल्याने आजार कमी होईल.

 

३. हळदीचं पाणी

जंतूसंसर्ग कमी करण्यासाठी हळद वनस्पतींसाठीही उपयुक्त ठरते. त्यामुळे एखाद्या लीटर पाण्यात दिड ते दोन चमचे हळद घाला आणि ते पाणी रोपावर तसेच मातीवर शिंपडा. रोग कमी होईल.

गॅसही न पेटवता २ मिनिटांत करा कडीपत्त्याचा चटकदार ठेचा, बघा झटपट होणारी सोपी रेसिपी

४. केळीच्या सालींचं पाणी

केळीच्या सालींंमध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हे दोन्ही घटक कोणत्याही फुलझाडांना बहर येण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. त्यामुळे केळीची सालं रात्रभर पाण्यात भिजत घाला आणि दुसऱ्यादिवशी गाळून घेऊन हे पाणी झाडांना द्या. रोपाची छान वाढ होईल. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सगच्चीतली बागमोसमी पाऊस