Join us  

गुलाबाच्या रोपाची वाढच होत नाही? १ चिमूटभर हळदीचा खास उपाय -भरपूर येतील गुलाबाची फुलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2024 2:08 PM

How to Take care Of Rose Plant in Summer : हिवाळ्याच्या दिवसांत फूल येत नाहीत अशी अनेकांची तक्रारर असते. गुलाबाच्या रोपाला फंगस खूपच सहज लागतो.

ऊन्हाळ्याचे  वातारवण अनेक रोपांसाठी पोषक असते पण काही झाडं अशी असतात ती उन्हाळ्याच्या वातावरणात खराब होत जातात.(Gardening Tips) ऊन्हाळ्याच्या  दिवसांत फुल झाडांची एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागते.  त्यातीलच एक म्हणजे गुलाबाचे रोप.  हिवाळ्याच्या दिवसांत फूल येत नाहीत अशी अनेकांची तक्रार असते. गुलाबाच्या रोपाला फंगस खूपच सहज लागतो.  (How to Grow And Care For All The Roses) अशावेळी फंगस येऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. काही छोट्या छोट्या टिप्स  तुमचं काम अधिकच सोपं करू शकतात. (How to Take care Of Rose Plant in Summer)

1) प्रुनिंग

फ्लॉवर्स ओरा च्या रिपोर्टनुसार  गुलाबाचे फुलांना मोठ्या प्रमाणात बुरशी लागते आणि ते खराब होऊ लागतात. गरमीच्या सिजनमध्ये नियमित प्रूनिंग करत राहा. जर रोपाची पानं पिवळी पडली असतील तर ती पानं  आधी काढून टाका. ही पानं खालून जास्त मोठी  नसतील याची काळजी घ्या. या उपायाने रोपाची पानं दाट होतील आणि झाड जास्त दिवस टिकेल.

2) रोपांमध्ये हळद मिसळा

ही ट्रिक घरगुती आहे पण रोपांना बरेच फायदे देते. गुलाबाच्या रोपाला बुरशी लगेच येते. अशा स्थितीत तुम्ही रोप कापून असं ठेवून दिलं तर त्यात फंगस येऊ शकते. म्हणूनच थोडं हळदीचं पाणी घेऊन रोपामध्ये लावून ठेवा. ज्यामुळे रोपाला बुरशी येणार नाही आणि रोप खराबही होणार नाही हे फार महत्वाचे असते. जर पानं गळत असतील तर या गोष्टींची काळजी घ्या.

पाणी जास्त असणं किंवा कमी असणं या दोन्ही गोष्टींमुळे रोप खराब होते. गुलाबाच्या रोपाला जास्त पाण्याची आवश्यकता असते.  जेव्हा माती सुकलेली दिसेल तेव्हाच त्यात पाणी घाला. जर तुम्ही रोज गुलाबाच्या रोपाला पाणी दिले नाही तर पानं  पिवळी पडू लागतील आणि मुळांमध्ये बुरशी येण्याचाही धोका असतो. गुलाबाच्या रोपाची माती सुकली असेल तर रोज पाणी द्या.  गरजेपेक्षा जास्त पाणी द्यायल्याने नुकसानही होऊ शकते. पाणी देताना माती ओली नसेल याची काळजी घ्या.

मोगऱ्याच्या रोपाला फुलंच येत नाही? मातीत १ गोष्ट मिसळा-सुगंधित फुलांनी बहरेल घर; फुलंच फुलं येतील

3) गुलाबाच्या रोपाला फर्टिलायजर

ऑर्गेनिक फर्टिलायजर्सचा उपयोग तुम्ही करू शकता. गुलाबासाठी पील फर्टिलायजर, चहा पावडर गरजेचे आहे. कारण गुलाबाच्या रोपात एसिडीक माती असते. ही दोन्ही खतं तुम्ही घरच्याघरी बनवू शकता. 

4) बनाना पील फर्टिलाायजर

दोन ते तीन दिवस केळ्याची सालं उन्हात सुकवा. त्यानंतर त्याची पावडर दळून मातीत घाला. ही पावडर एक, एक चमचा  या प्रमाणात १५ दिवस गुलाबाच्या रोपात घाला. मातीत थोडं पाणी घालून खोदून त्यात  पाणी घाला.

दही की ताक-वजन कमी करण्यासाठी फायदेशीर काय? डॉक्टर सांगतात दोघांतील फरक व फायदे

5) चहा पावडरचे फर्टिलायजर

ग्रीन  टी किंवा चहा व्यवस्थित उकळवून  घ्या. नंतर थंड होऊ द्या. हे पावडरचे फर्टिलायजर थंड झाल्यानंतर मातीत घाला. गुलाबाच्या रोपाला कमीत कमी ऊन्हाची गरज असते. जास्त ऊन्हात ठेवल्यास कमीत कमी फुलं येतील. २ ते ३ तास ऊन मिळाल्यानंतर पुन्हा रोप सावलीत ठेवा. 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स