Join us  

सोनचाफा नुसताच वाढला- फुलं येतच नाहीत? ३ सोप्या टिप्स- काही दिवसांतच भरभरून येतील कळ्या... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2024 1:31 PM

Best Homemade Fertilizer For Sonchafa Plant: सोनचाफ्याचे हे बहरण्याचे दिवस. या दिवसांतही तुमच्या सोनचाफ्याला म्हणाव्या तशा कळ्या, फुलं येत नसतील तर हे काही उपाय करून पाहा...(how to make sonchafa plant grow fast)

ठळक मुद्देहे उपाय केल्यानंतर काही दिवसांतच तुमचं घर, अंगण सोनचाफ्याच्या सुगंधाने भरून जाईल.

अतिशय सुगंधित फुलांचं रोप म्हणून सोनचाफा ओळखला जातो. त्याचा मंद, धुंद सुगंध वातावरण आल्हाददायी करून टाकतो. म्हणूनच तर अनेक जण अतिशय हौशीने त्यांच्या अंगणात, टेरेसमध्ये सोनचाफा लावतात. पण बऱ्याचदा असं होतं की ते रोप लावल्यानंतर सुरुवातीला एक- दोन वर्षे त्याला छान कळ्या, फुलं येतात. पण नंतर मात्र तो नुसताच उंच होत जातो. त्याला म्हणाव्या तशा भरभरुन कळ्या, फुलं येतच नाहीत (how to take care of sonchafa plant?). तुमच्याकडच्या सोनचाफ्याचंही असंच झालं असेल तर त्याला पुन्हा फुलविण्यासाठी हे काही उपाय करून पाहा (best homemade fertilizer for sonchafa plant).हे उपाय केल्यानंतर काही दिवसांतच तुमचं घर, अंगण सोनचाफ्याच्या सुगंधाने भरून जाईल. (3 simple tricks and tips to bloom sonchafa)

सोनचाफ्याच्या रोपाची काळजी कशी घ्यावी?

 

१. ऊन

सोनचाफा हे असं एक रोप आहे ज्याला उन्हाळ्याच्या दिवसांत खूप कडक उन्हामुळे त्रास होतो.

वजन झटपट कमी करण्यासाठी नारळपाणी आहे खूप उपयोगी! पण कधी आणि कसं प्यावं? बघा...

पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मात्र त्याला ४ ते ५ तास तरी थेट ऊन पाहिजे असतं. त्यामुळे तुम्ही ते रोप कुंडीत लावलं असेल तर ती थोडी हलवून पाहा. बऱ्याचदा पुरेसं ऊन न मिळाल्यानेही सोनचाफा म्हणावा तसा बहरत नाही.

 

२. पाणी 

सोनचाफ्याच्या रोपाला खूप पाणी देण्याची गरज नसते. त्यामुळे त्याला रोज पाणी घालून त्याची माती थपथप ओली करू नका. अतिशय ओलसर, चिकट मातीमुळे त्याची मुळं कुजतात.

मुलांची नुसतीच उंची वाढते- तब्येत मात्र हडकुळी? 'हा' १ लाडू रोज खायला द्या- धष्टपुष्ट होतील 

त्यामुळे मग रोपाला पुरेसं पोषण न मिळाल्याने त्याची वाढ आणि त्याला फुलं येणं थांबून जातं. त्यामुळे जेव्हा कुंडीतला मातीचा सगळ्यात वरचा थर कोरडा पडलेला दिसेल, तेव्हाच त्याला पाणी द्या.

 

३. सोनचाफ्यासाठी खत

सोनचाफ्याच्या रोपाला भरभरून फुलं येण्यासाठी त्याला ताक नेहमी द्यावे. १ ग्लास ताक १ ते दिड लीटर पाण्यात मिसळून सोनचाफ्याला द्या.

पावसाळ्यात काजळ पसरून डोळ्यांखालचा भाग काळवंडतो? २ टिप्स- काजळ दिवसभर राहील जशास तसं

तसेच केळीचं सालं आणि कांद्याची टरफलं रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्यादिवशी ते पाणी गाळून सोनचाफ्याला द्या. या उपायातून नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस मिळेल आणि सोनचाफ्याची वाढ झपाट्याने होईल. तुम्ही बाजारात मिळणारं खतही दोन महिन्यातून एकदा सोनचाफ्याला देऊ शकता. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणी