घरासमोर मोठं अंगण असो किंवा मग फ्लॅटची छोटीशी बाल्कनी असो.. त्या अंगणात किंवा त्या बाल्कनीमध्ये इतर कोणतीही रोपं असो किंवा नसो पण एक रोप मात्र हमखास असतंच आणि ते म्हणजे तुळशीचं. तुळशीला आपल्याकडे खूप महत्त्व आहे. एक पवित्र रोप म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. शिवाय तिचे औषधी उपयोगही खूप आहेत. अशी ही तुळस प्रत्येकजण आपल्या घरासमोर लावतो. पण काही घरांमध्ये ती खूप छान बहरून येते तर काही घरांमध्ये अजिबातच वाढत नाही (how to take care of tulsi or holy basil plant?). मग इतर सगळ्या ठिकाणच्या तुळस छान बहरत असताना आपल्या घरचीच तुळस अशी नेहमी का सुकते ती का बरं छान बहरत नसावी, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर या काही गोष्टी एकदा तपासून पाहा..(3 important tips for the fast growth of tulsi plant)
तुळशीच्या रोपाची वाढ होत नसल्यास काय उपाय करावे?
तुळशीचे रोप चांगले वाढत नसल्यास काय उपाय करावे, त्याची कशी काळजी घ्यावी, याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडीओ nisargamitra_farm या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
१. ऊन
तुळशीच्या रोपाला भरपूर ऊन मिळणे खूप गरजेचे आहे. स्वच्छ, मोकळ्या सुर्यप्रकाशात ती अधिक जोमाने वाढते. पण हल्ली फ्लॅटमधल्या बाल्कनी अशा पद्धतीने असतात की तिथे मुळीच ऊन येत नाही.
सकाळी उपाशीपोटी जिऱ्याचं पाणी पिण्याचे ६ जबरदस्त फायदे! उत्तम आरोग्य मिळेल- सौंदर्यही खुलेल
किंवा अंगणातही आजुबाजुला वाढलेल्या उंचच उंच इमारतींमुळे ऊन येत नाही. अशा ठिकाणी तुळस लावली तर ती अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे व्यवस्थित वाढत नाही. त्यामुळे तुळशीला अशा ठिकाणी ठेवा जिथे दिवसातला जास्तीत जास्त वेळ तिला थेट सुर्यप्रकाश मिळेल.
२. पाणी
काही घरांमध्ये तुळशीला भरपूर पाणी घातले जाते. पण तुळशीला खूप जास्त पाणी घालू नये. तुळशीच्या कुंडीतून पाणी बाहेर येणार नाही, एवढ्याच प्रमाणात तिला पाणी घालावे.
वांगाच्या डागांमुळे चेहरा खराब दिसू लागला? ३ फळं चेहऱ्याला लावा, काही दिवसांतच डाग गायब
कमी ऊन आणि अतिजास्त पाणी या दोन गोष्टींमुळे तुळशीची चांगली वाढ होत नाही. तसेच ऋतुनुसार तुळशीला पाणी घालण्याचे प्रमाण कमी- जास्त करावे.
३. मंजिरी
तुळशीला छान भरगच्च होऊ द्यायची असेल तर तुळशीच्या मंजिरी कापल्या पाहिजेत. मंजिरी आल्यानंतर तुळशीची वाढ होत नाही. त्यामुळे त्या नियमितपणे कापा. तुळस छान बहरून डेरेदार होईल.