Lokmat Sakhi >Gardening > थंडीच्या दिवसांत रोपट्यांची काळजी कशी घ्यायची? ४ टिप्स... बाग दिसेल फ्रेश हिरवीगार 

थंडीच्या दिवसांत रोपट्यांची काळजी कशी घ्यायची? ४ टिप्स... बाग दिसेल फ्रेश हिरवीगार 

Gardening Tips For Winter: आपल्या अंगणातली रोपटी, झाडं यांची प्रत्येक ऋतूनुसार विशेष काळजी घेतली गेली तरच ती प्रत्येकवेळी फ्रेश आणि हिरवीगार  दिसतात. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2022 06:32 PM2022-12-05T18:32:04+5:302022-12-05T18:33:01+5:30

Gardening Tips For Winter: आपल्या अंगणातली रोपटी, झाडं यांची प्रत्येक ऋतूनुसार विशेष काळजी घेतली गेली तरच ती प्रत्येकवेळी फ्रेश आणि हिरवीगार  दिसतात. 

How to take care of your garden in winter season? 4 Tips for garden care in winter | थंडीच्या दिवसांत रोपट्यांची काळजी कशी घ्यायची? ४ टिप्स... बाग दिसेल फ्रेश हिरवीगार 

थंडीच्या दिवसांत रोपट्यांची काळजी कशी घ्यायची? ४ टिप्स... बाग दिसेल फ्रेश हिरवीगार 

Highlightsप्रत्येक ऋतुनुसार झाडांच्या सवयीही बदलत जातात. त्यामुळे त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष देण्याची गरज पडते.

ऋतू बदलला की आपला आहार, रोजच्या सवयी, खाण्यापिण्यातले पदार्थ यात जसा बदल होतो, तसाच बदल झाडांच्या बाबतीतही  होणे आवश्यक असते. कारण प्रत्येक ऋतुनुसार झाडांच्या सवयीही बदलत जातात. त्यामुळे त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष देण्याची गरज पडते. प्रत्येक ऋतुमध्ये आपण एकसारख्या पद्धतीनेच झाडांची काळजी (How to take care of your garden in winter) घेत गेलो किंवा त्यांना खत- पाणी देत गेलो, तर झाडांची योग्य वाढ होत नाही. त्यामुळेच अगदी पावसाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही तुमची बाग टवटवीत रहावी, असं वाटत असेल तर झाडांची काळजी (garden care in winter) घेण्यासाठी हिवाळ्यात या काही गोष्टींकडे लक्ष द्या. 

 

हिवाळ्यात बागेची काळजी घेताना...
१. पाणी देताना काळजी घ्या

उन्हाळ्यात आपण अगदी रोजच्या रोज किंवा कधी कधी तर दिवसांतून दोन वेळा झाडांना पाणी देतो. पण हिवाळ्यात वातावरण थंड असल्याने जमिनीत पाणी साचून राहते.

तान्ह्या बाळाला पोटाशी धरून आईनं केला अप्रतिम बॅले डान्स, बघा देखणा व्हिडिओ

त्यामुळे हिवाळ्यात झाडांना एक दिवसाआड पाणी दिले तरी चालते. त्यामुळे जमिनीत पाणी साचून राहत नाही आणि झाडं खराब होत नाहीत.

 

२. झाडांना खत देताना
पावसाळ्यात झाडांना खत दिले नाही तरी चालते. कारण पावसाच्या पाण्यातून झाडांना मुबलक प्रमाणात खनिजे मिळतात. पण हिवाळ्यात मात्र झाडांना खत देण्याची गरज असते. यासाठी कुंडीतला जो मातीचा वरचा थर असतो तो खुरप्याने थोडा भुसभुशीत करून घ्या आणि वरच्या भागात कुंडीच्या काठांजवळ झाडांना खत द्या. 

मुंजीसाठी महागडं रुखवत विकत आणण्यापेक्षा या बघा ७ टिप्स, घरीच तयार होईल स्वस्तात मस्त रुखवत

३. माती टाका
पावसामुळे माती कुंडीत दबली जाते किंवा कुंडी अगदी काठोकाठ भरलेली असेल तर पावसाच्या पाण्यासोबत वाहूनही जाते. त्यामुळे बऱ्याचदा हिवाळ्यात कुंडीत मातीचा आणखी एक थर टाकावा लागतो. कुंडीत नवी माती टाकण्यापुर्वी आधीची माती थोडी भुसभुशीत करून घ्या. असं करताना झाडांची मुळे मात्र सांभाळा.

 

४. सकलंट्ससाठी उत्तम हंगाम
सकलंट्स म्हणजे जी रोपटी इनडोअर असतात किंवा ज्यांना खूपच कमी पाणी लागते, अशा रोपट्यांसाठी हिवाळा हा उत्तम सिझन आहे. त्यामुळे या दिवसांत तुम्ही सकलंट्सची खरेदी करून ती बागेत लावा. त्यांच्यावर एखादा तासच कोवळं ऊन येईल, अशा पद्धतीने ती ठेवा. चांगली वाढ होईल. 

 

Web Title: How to take care of your garden in winter season? 4 Tips for garden care in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.