Join us  

गुलाबाच्या पानांचा रंग बदलला? करा ३ सोपे उपाय, पाने होतील पुन्हा हिरवीगार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2024 9:45 AM

Rose leaves turning brown treatment : बागेतील गुलाबाच्या फुलांच्या रोपट्याच्या पानांचा रंग बदलला असेल तर काही सोप्या ट्रिक्सचा वापर करुया...

प्रत्येकाच्या घराच्या बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये एक तरी गुलाबाच्या फुलांचे रोपटे हे असतेच. बाल्कनीतील गुलाबाच्या फुलांनी बहरलेले रोप पाहायला सगळ्यांचं आवडत. गुलाबाच्या फुलांचे हे रोपटे जर हिरवेगार असेल तर ते दिसायला सुंदर दिसते. वातावरण, हवामानात जसा बदल झालेला आपल्याला सहन होत नाही. तसच बागेतल्या रोपांच देखील असत. वातावरण, हवामानातील बदल देखील या रोपांना सहन होत नाही. यामुळे रोपांमध्ये एकाचवेळी अनेक बदल झालेलं दिसून येतात. सध्या पावसाळा सुरु झाला असलयामुळे सतत पाऊस पडत असतो(Rose leaves turning yellow and brown).

पाऊस पडल्यामुळे काहीवेळा झाडांना गरजेपेक्षा जास्त प्रमाणात पाणी मिळते. या नाजूक रोपांना जर गरजेपेक्षा जास्त पाणी मिळाले तर या रोपात अनेक बदल घडून येतात. काहीवेळा रोपांना फुलंच येणे बंद होते, पाने गळू लागतात, पानांचा हिरवा रंग बदलून पिवळा होऊ लागतो, असे अनेक बदल या रोपात पाहायला मिळतात. रोपांची हिरवळ आणि बहरलेली फुलं बागेला आकर्षक रूप देतात. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात जर तुमच्या बागेतील गुलाबाच्या फुलांच्या रोपट्याच्या पानांचा रंग बदलला असेल तर काही सोप्या ट्रिक्सचा  वापर करुन आपण पुन्हा हे गुलाबाचे रोपटे हिरवेगार करु शकतो(Rose leaves turning yellow and brown).

१. गुलाबाच्या रोपट्यांच्या पानांचा रंग का बदलतो ? 

गुलाबाच्या रोपट्यांच्या पानांचा रंग बदलून पाने पिवळी आणि तपकिरी होण्याची समस्या अनेकदा दिसून येते. तीव्र सूर्यप्रकाश किंवा उष्णतेमुळे ही समस्या दिसून येते. जर रोपाला गरजेपेक्षा जास्त ऊन आणि उष्णता लागत असेल तर या रोपांच्या पानांचा रंग बदलतो. त्यामुळे ही रोप उष्णतेपासून आणि प्रखर सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावीत. 

गुलाबाच्या रोपट्याची पाने तपकिरी झाल्यावर काय करावे ?

१. जर तुमच्या बागेतील गुलाबाच्या रोपट्याची पाने तपकिरी झाली असतील तर सर्वप्रथम ती काढून टाका. आपण असे न केल्यास, उरलेली पाने देखील खराब होऊ शकतात.

२. घरी वापरल्या जाणारी फळे आणि भाज्यांची साले एकत्रित करुन त्यांचे कंपोस्ट खत करा आणि ते झाडांना घाला. यासाठी प्रथम साल सुकवून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. आता ही पावडर रोपट्याच्या कुंडीतल्या मातीत घालून चांगले मिक्स करा. असे केल्याने गुलाबाच्या रोपाला आवश्यक पोषक तत्वे मिळतील.

 ३. चहा बनवल्यानंतर उरलेली चहा पूड एका कापडावर अंथरुन ती थोडीशी कोरडी करुन घ्यावी. ही कोरडी झालेली चहा पावडर गुलाबाच्या रोपाच्या कुंडयातील मातीत मिक्स करावी. असे केल्याने झाडातील नायट्रोजनची कमतरता पूर्ण होते. यामुळे रोपांच्या पानांचा हरवलेला हिरवा रंग पुन्हा येण्यास मदत मिळते.

टॅग्स :बागकाम टिप्स