Lokmat Sakhi >Gardening > केळीच्या सालींसोबत रोपांना द्या १ खास पदार्थ, टपोऱ्या फुलांनी बहरून जाईल बाग 

केळीच्या सालींसोबत रोपांना द्या १ खास पदार्थ, टपोऱ्या फुलांनी बहरून जाईल बाग 

Gardening Tips For Flowering Plants: केळीच्या सालींसोबत हा १ खास पदार्थ पाण्यात टाकून रोपट्यांना द्या.. बघता बघता भरगच्च फुलांनी बहरून जाईल बाग... (How to use banana peels for gardening)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2024 03:37 PM2024-01-16T15:37:38+5:302024-01-16T15:39:00+5:30

Gardening Tips For Flowering Plants: केळीच्या सालींसोबत हा १ खास पदार्थ पाण्यात टाकून रोपट्यांना द्या.. बघता बघता भरगच्च फुलांनी बहरून जाईल बाग... (How to use banana peels for gardening)

How to use banana peels for gardening, Use of banana peel for getting more flowers, best homemade fertilizer for flowering plants | केळीच्या सालींसोबत रोपांना द्या १ खास पदार्थ, टपोऱ्या फुलांनी बहरून जाईल बाग 

केळीच्या सालींसोबत रोपांना द्या १ खास पदार्थ, टपोऱ्या फुलांनी बहरून जाईल बाग 

Highlightsकेळीच्या सालींचा बागेसाठी अगदी अचूक वापर कसा करायचा आणि झाडांची आणखी जोमाने वाढ होण्यासाठी त्याच्यासोबतच अजून एक कोणता पदार्थ झाडांना द्यायचा, ते आता पाहूया..

आपल्या बागेतल्या छोट्या छोट्या झाडांसाठीचं उत्तम खत आपल्या स्वयंपाक घरातूनच मिळून जातं. स्वयंपाक घरातल्या पदार्थांचा योग्य पद्धतीने वापर केला तर मग झाडांना दुसरं कोणतंही खत घालण्याची गरजच राहात नाही. आता स्वयंपाक घरातून निघणाऱ्या ओल्या कचऱ्याचा उपयोग झाडांसाठी कसा करायचा, ते आपण जाणतोच. त्यातल्या त्यात केळीचे साल तर रोपट्यांसाठी अतिशय उत्तम टॉनिक मानलं जातं (How to use banana peels for gardening). आता या केळीच्या सालींचा तुमच्या बागेसाठी अगदी अचूक वापर कसा करायचा (Use of banana peel for getting more flowers) आणि झाडांची आणखी जोमाने वाढ होण्यासाठी त्याच्यासोबतच अजून एक कोणता पदार्थ झाडांना द्यायचा, ते आता पाहूया..(best homemade fertilizer for flowering plants)

 

बागेत भरपूर फुलं येण्यासाठी केळीच्या सालींचा उपाय

बागेत भरपूर फुलं यावीत, तसेच बाग नेहमी हिरवीगार राहावी, यासाठी केळीच्या सालींचा कशा पद्धतीने वापर करायचा, याविषयीचा एक व्हिडिओ garden_hacks_tips या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

आयरा खानच्या भरजरी लेहेंग्यावर होते सुंदर कर्दाना वर्क, बघा एम्ब्रॉयडरीचा हा प्रकार कोणता

या व्हिडिओनुसार जर एका केळीचं सालं घेतलं तर सुरुवातीला त्याचे बारीक बारीक तुकडे करा. नंतर अर्धा लीटर पाणी गरम करा. त्या पाण्यात केळीच्या सालांचे तुकडे टाका आणि हे मिश्रण २४ तास थंड जागी झाकून ठेवा.

 

२४ तास झाल्यानंतर पाणी गाळून घ्या. या पाण्यामध्ये आता १० मिली व्हाईट व्हिनेगर टाका. व्हाईट व्हिनेगरमुळे या पाण्यातल्या साखरेच्या अंशाचं ब्रेकडाऊन लवकर होतं आणि त्याचा फायदा झाडांच्या, फुलांच्या वाढीसाठी होतो.

शाम्पू केल्यावर केस खूप गळतात? 'हा' शाम्पू वापरून पाहा, केस गळणं थांबून वाढतील भराभर

सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि प्रत्येक फुलझाडाला थोडं थोडं करून हे पाणी टाका.

१० ते १२ दिवसांतून एकदा हा उपाय केला तरी चालेल.  


 

Web Title: How to use banana peels for gardening, Use of banana peel for getting more flowers, best homemade fertilizer for flowering plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.