ताक फक्त आरोग्यासाठीच नाही तर रोपांच्या वाढीसाठीही फायदेशीर ठरते. (Gardening Tips) घरातील झाडांच्या वाढीसाठी तुम्ही केमिकल्सयुक्त खतांचा वापर करण्यापेक्षा तुम्ही ताकाचा वापर करू शकता. ताकाचा वापर गार्डन किंवा इतर रोपांमध्येही करू शकता. गार्डनची शोभा वाढवण्यासाठी आणि फुलांच्या वाढीसाठी ताकाचा वापर महत्वाचा असतो. (How To Use Buttermilk For Plants) बाल्कनीतील फुलांची वाढ व्हावी यासाठी तुम्ही ग्लासभर ताकाचा वापर करू शकता. ताक रोपांच्या वाढीसाठी चमत्कारीक ठरू शकते. ताकाचा वापर झाडांमध्ये कसा करायचा ते पाहूया. (Tips and Tricks To Use Buttermilk For Good Growth of Plants)
एग्री कल्चर मॅग्झीनच्या रिपोर्टनुसार आंबवलेल्या ताकाचा वापर रोपांसाठी अधिक फायदेशीर ठरतो. एका ग्लास ताक घेऊन २ ते ३ दिवस रूम टेम्परेचरवर ठेवा लॅक्टोबासिली बॅक्टेरिया ताकात तयार होईल. ताक अधिक आंबट आणि घट्ट होईल जे पाण्यात मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि झाडांवर फवारा. (Tips And Tricks to Use Buttermilk For Good Growth Of Plant supply)
ताकाची फवारणी करताना या गोष्टींची काळजी घ्या.
१) ताक आंबवण्यासाठी काचेच्या भांड्याचा वापर करा.
२) प्लास्टीकचा ग्लास घेतल्यास खराब वास येऊ शकतो.
३) सकाळी आणि संध्याकाळी हे पाणी झाडांवर फवारणी करा.
४) वापरात नसल्यास तुम्ही हे ताक फ्रिजमध्ये कमीत कमी २ आठवड्यांसाठी ठेवू शकता.
१) पोषण मिळते
ताकात पोषक तत्वांचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे तब्येतीला फायदे होतात. या झाडांमुळे नवीन उर्जा मिळते आणि झाडांना पोषणही मिळते. ताकात कॅल्शियम, फॉस्फरेस, पोटॅशियम असते ज्यामुळे रोपांनाही पोषण मिळते.
गुलाबाच्या झाडाला फुलं येत नाहीत? कचऱ्यातले 'हे' पदार्थ मातीत मिसळा, येतील फुलंच फुलं
२) भराभर वाढ होते
ताक मातीत मिसळल्याने रोपांची वेगाने वाढ होते. पानांबरोबरच फुलं आणि फळंही वेगाने येतात. कोमेजलेली झाडं पुन्हा जिवंत होतात. ताकातील बॅक्टेरिया किटकांपासून उद्भवणारा धोका टाळतात. यामुळे झाडं वेगाने वाढतात.
घरातला बांबू प्लांट वाढवण्यासाठी ३ सोप्या टिप्स, एकही पान पिवळं पडणार नाही- प्लांट राहील हिरवेगार
३) रोगप्रतिकारकशक्ती वाढते
ताकाच्या सेवनाने प्रतिकार क्षमता मजबूत होते. यामुळे रोपांचा आजार आणि किटकांपासून बचाव होण्यास मदत होते. झाडांची चांगली वाढ होते. झाडांच्या वाढीमध्ये बाधा येत नाही. झाडांची मुळं व्यवस्थित होतात आणि पोषणही मिळते. ताकाच्या उपयोगाने मातीतील पोषक तत्व व्यवस्थित एब्जॉर्ब केली जातात. ज्यामुळे मुळं मजबूत होतात.
रोपांसाठी ताकाचा वापर कसा करावा?
ताकाचा उपयोग करणं एकदम सोपं आहे. एका भांड्यात ताक आणि पाणी मिसळा आणि झाडांच्या चारही बाजूंनी घाला. २ आठवड्यानी एकदा हा उपाय करा. यामुळे रोपांची वाढ चांगली होईल. १ ग्लास पाण्यात ५ ग्लास पाणी मिसळा जास्त प्रमाणात ताक मिसळू नका. या उपायामुळे झाडांना नवीन उर्जा मिळेल.