Join us  

कुंडीतल्या रोपांवर सतत बुरशी पडते, झाडं मरतात ? स्वयंपाकघरातला १ मसाला करेल जादू, बुरशी गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2023 6:40 PM

How To Use Cinnamon Powder To Repel Pests In Gardens & Flowerbeds : आपण निगूतीने झाडं लावतो आणि त्यावर बुरशी पडून झाडं मरतात, पानं पिवळी पडतात, हा एक उपाय करुन पाहा..

गार्डनिंग करायचं म्हटलं की ते काही वाटत तितकं सोपं काम नसत. घरात किंवा घराबाहेर गार्डनमध्ये नुसती झाड लावून उपयोग नाही. त्या झाडांची तितकीच काळजी देखील घ्यावी लागते. या झाडांची वेळोवेळी योग्य ती काळजी घेतली नाही की त्यावर रोग येण्याची शक्यता असते. याचबरोबर काहीवेळा झाडांवर एखादा संसर्गजन्य आजार देखील होऊ शकतो. अशावेळी एका झाडाला झालेली लागण दुसऱ्या रोपांवर किंवा झाडांवर देखील पसरु शकते. यासोबत आपल्याला भीती असते ती किटकांची व अळ्यांची. काहीवेळा झाडांची योग्य ती देखभाल न केल्यास त्यांवर अळ्या व किटकांचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. कधी कधी तर हे किटक किंवा बुरशी संपूर्ण झाड पोखरुन काढते. एवढेच नाही तर काहीवेळा झाडांची पान, फुल यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होते(How do you use cinnamon Powder to get rid of insects?).

आपल्या घरातील या रोपांना व झाडांना किटकांपासून वाचवण्यासाठी (3 Ways to Use Cinnamon in the Garden to Prevent Disease and Increase Yields) आपण अनेक प्रकाचे उपाय करून पाहतो. यात आपण काहीवेळा केमिकल्सयुक्त औषधांचा किंवा खतांचा वापर करतो. या केमिकल्सयुक्त औषधांचा सतत वापर केल्याने झाडांची मूळ कमकुवत होतात. त्यामुळे झाडांचा किटकांपासून बचाव करण्यासाठी काही घरगुती नैसर्गिक पदार्थांचा (CREATIVE WAYS TO USE CINNAMON IN YOUR GARDEN) देखील आपण वापर करू शकतो. यात जेवणाचा स्वाद वाढवणाऱ्या मसाल्यांचासुद्धा आपण उपयोग करु शकतो. किटकांपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी दालचिनीचा वापर कसा करावा ते पाहूयात (Gardening Tips : 3 Unbelievable Cinnamon Powder Uses in Your Garden Plants).

दालचिनीचा वापर नेमका कसा करावा ? 

१. खतांमध्ये याचा वापर करावा :- झाडांमधील किटक, अळ्या काढायच्या असतील तर आधी शेणखत घ्या आणि त्यात दालचिनी पावडर मिसळा. चांगले मिक्स केल्यानंतर एक दिवस ते तसेच झाकून ठेवा. यानंतर दुसऱ्या दिवशी ते झाडाच्या मातीत घालून मिसळून घ्यावे. दालचिनी घातलेले खत चांगले मिसळले की झाडाला पोषक तत्वे मिळतील आणि किडेही निघून जातील. याशिवाय, लागवडीपूर्वी आपण दालचिनी पावडर जमिनीत चांगले मिसळू शकता  कारण यामुळे झाडांच्या मुळांमध्ये होणारा संसर्गही कमी होईल. 

जास्वंदीच्या झाडावर फुलंच उमलत नाहीत ? ४ सोपे उपाय, लालचुटुक फुलांनी बहरुन जाईल झाड...

२. फवारणी करताना वापरा :- पाणी हा झाडांच्या वाढीसाठीचा आवश्यक घटक आहे. जेव्ह आपण झाडांना पाणी घालाल तेव्हा त्या पाण्यात दालचिनी पावडर मिसळून घ्यावी. या दालचिनी पावडर मिसळून घेतलेल्या पाण्याने झाडांवर फवारणी करावी. असे केल्याने झाडाला बुरशीजन्य रोगांपासून वाचवता येते आणि मुंग्या व इतर किटक आजूबाजूला दिसणार नाहीत. आपण कोमट पाण्यात दालचिनी पावडर मिसळून झाडांच्या मुळांवर फवारणी करु शकता.    

प्राजक्ताच्या फुलांचा अंगणात पडेल सडा, वापरा फक्त ३ नैसर्गिक खतं ! प्राजक्ताचं झाड घराजवळ असणे आनंददायी !

३. दालचिनी व कडुलिंबाची पावडर :- झाडाच्या मुळाशी असणाऱ्या किटकांना घालवण्यासाठी आपण दालचिनी व कडुलिंबाच्या पावडरचा वापर करु शकता. एक कप पाण्यांत दालचिनी व कडुलिंबाची पावडर समप्रमाणात मिक्स करून घ्यावी. हे पाणी झाडाच्या मुळाशी सोडावे किंवा जिथे किटक दिसत आहेत त्या भागावर हे पाणी ओतून घ्यावे.

टॅग्स :बागकाम टिप्स