Lokmat Sakhi >Gardening > झाडांना फुलं येतंच नाहीत? १ सोपा उपाय, येईल रंगबिरंगी फुलांचा बहर अगदी लवकर

झाडांना फुलं येतंच नाहीत? १ सोपा उपाय, येईल रंगबिरंगी फुलांचा बहर अगदी लवकर

Gardening Tips For Getting More Flowers: हा एक सोपा उपाय करा.. अगदी गुलाब, जास्वंदासह सगळ्याच फुलझाडांसाठी हा उपाय म्हणजे एक वरदान ठरेल.. (How to use garlic for flowering plants?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2023 04:24 PM2023-12-15T16:24:44+5:302023-12-15T17:21:52+5:30

Gardening Tips For Getting More Flowers: हा एक सोपा उपाय करा.. अगदी गुलाब, जास्वंदासह सगळ्याच फुलझाडांसाठी हा उपाय म्हणजे एक वरदान ठरेल.. (How to use garlic for flowering plants?)

How to use garlic for flowering plants? home remedies for getting more flowers, How to get more flowers from flowering plants? Benefits of garlic for gardening | झाडांना फुलं येतंच नाहीत? १ सोपा उपाय, येईल रंगबिरंगी फुलांचा बहर अगदी लवकर

झाडांना फुलं येतंच नाहीत? १ सोपा उपाय, येईल रंगबिरंगी फुलांचा बहर अगदी लवकर

Highlightsहा एक सोपा उपाय करून पाहा. बघा ८ दिवसांतच भरपूर कळ्या येऊन कशी बहरून जाईल तुमची बाग.

आपल्या बागेत आपण काही फुलझाडं आवर्जून लावतो. कारण वेगवेगळ्या रंगाची टवटवीत फुलं पाहिली की मन कसं फ्रेश, प्रसन्न होऊन जातं. त्यामुळे थोडी- फार का होईना पण जास्वंद, गुलाब, मोगरा अशी मोजकी फुलझाडं तरी आपल्या बागेत, टेरेसमध्ये असतातच. पण या झाडांना महिनोंमहिने जेव्हा फुलंच येत नाहीत, तेव्हा मात्र आपला पार हिरमोड होऊन जातो ( home remedies for getting more flowers). असं तुमच्याही बागेत होत असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा. (How to get more flowers from flowering plants?) बघा ८ दिवसांतच भरपूर कळ्या येऊन कशी बहरून जाईल तुमची बाग.. (How to use garlic for flowering plants?)

 

झाडांना भरपूर फुलं येण्यासाठी उपाय

झाडांना भरपूर फुलं येण्यासाठी नेमका काय उपाय करावा, याविषयीची माहिती soilphu या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त लसूणाचा वापर करायचा आहे.

थंडीमुळे मूग- मटकीला चांगले मोड येत नाहीत? करा २ सोपे उपाय- कडधान्यांना येतील छान लांबसडक मोड

लसूणमध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. हे दोन्ही घटक झाडांच्या वाढीसाठी आणि त्यांना फुलांचा बहर येण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.

हा उपाय करण्यासाठी ७ ते ८ लसूण पाकळ्या घ्या. त्यांचे काप करा.

गर्ल डिनर, पनीर आईस्क्रीम हे पदार्थ तुम्ही २०२३ मध्ये खाल्ले का? पाहा २०२३ मध्ये कोणते पदार्थ व्हायरल झाले

एका भांड्यामध्ये अर्धा लीटर पाणी घ्या. त्या पाण्यात लसूण पाकळ्या टाका आणि साधारण १ टेबलस्पून व्हिनेगर टाका. 

हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवा. दुसऱ्यादिवशी सकाळी हे पाणी झाडांना घाला. आठवड्यातून ३ ते ४ वेळा हा उपाय करा. बघा यानंतर पुढच्या ८ ते १० दिवसांतच झाडांना भरपूर कळ्या आलेल्या दिसतील.

 

झाडांना लसूणाचे पाणी देण्याचे इतर फायदे
Benefits of garlic for gardening

१. वरीलप्रमाणे जर झाडांना नियमितपणे लसूणाचे पाणी दिले तर झाडांची वाढ खूप जलद होते. 

५ मिनिटांत पातेलंभर मक्याचे दाणे सोलून होतील, बघा स्वीटकॉर्न झटपट सोलण्याच्या २ पद्धती

२. झाडांची पानं पिवळी पडत असतील तर त्यांच्यावर लसूणाचे पाणी फवारा. काही दिवसांतच पिवळी पानं कमी होतील आणि झाडं पुन्हा हिरवीगार दिसतील.

३. झाडांचा रंग गर्द हिरवा होण्यासाठीही झाडांना लसूणाचे पाणी द्यावे. 

 

Web Title: How to use garlic for flowering plants? home remedies for getting more flowers, How to get more flowers from flowering plants? Benefits of garlic for gardening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.