Lokmat Sakhi >Gardening > स्वयंपाक घरातल्या ओल्या कचऱ्याचा झाडांसाठी करा 'असा' खास वापर- फळाफुलांनी बहरून जाईल बाग

स्वयंपाक घरातल्या ओल्या कचऱ्याचा झाडांसाठी करा 'असा' खास वापर- फळाफुलांनी बहरून जाईल बाग

How To Use Kitchen Waste For Plants?: स्वयंपाक घरात तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याचा झाडांसाठी एका खास पद्धतीने वापर केला तर मग झाडांना इतर कोणतं खत देण्याची गरजच उरणार नाही....(How to make homemade fertilizers for plants)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2023 01:06 PM2023-12-04T13:06:56+5:302023-12-04T13:07:54+5:30

How To Use Kitchen Waste For Plants?: स्वयंपाक घरात तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याचा झाडांसाठी एका खास पद्धतीने वापर केला तर मग झाडांना इतर कोणतं खत देण्याची गरजच उरणार नाही....(How to make homemade fertilizers for plants)

How to use kitchen waste for plants? Best use of kitchen waste for gardening, How to make homemade fertilizers for plants, plant fertilizer from kitchen waste | स्वयंपाक घरातल्या ओल्या कचऱ्याचा झाडांसाठी करा 'असा' खास वापर- फळाफुलांनी बहरून जाईल बाग

स्वयंपाक घरातल्या ओल्या कचऱ्याचा झाडांसाठी करा 'असा' खास वापर- फळाफुलांनी बहरून जाईल बाग

Highlightsस्वयंपाक घरात रोजच्या रोज ओला कचरा तयार होत असतो. त्याच ओल्या कचऱ्याचा उपयोग करून बागेसाठी खत कसं तयार करायचं, याविषयी.....

टाकाऊपासून टिकाऊ.... ही संकल्पना आपण नेहमीच ऐकलेली, वाचलेली असते. पण काही मोजके लोक सोडले तर बहुतांश लोक हे वाक्य ऐकून सोडून देतात. पण झाडांची, गार्डनिंगची आवड असेल आणि तुमच्या बागेला नेहमीसाठी छान हिरवीगार, टवटवीत ठेवायची असेल तर एकदा हा टाकाऊपासून टिकाऊ तयार करण्याचा सोपा प्रयोग करून पाहा (Best use of kitchen waste for gardening). स्वयंपाक घरातला ओला कचरा झाडांसाठी कसा वापरायचा ते आपण आता पाहूया.. (How To Use Kitchen Waste For Plants?) खताच्या रुपात या कचऱ्याचा खूप चांगला उपयोग तुमच्या बागेसाठी करता येतो (plant fertilizer from kitchen waste). यामुळे तुम्हाला तुमच्या झाडांसाठी मग इतर कोणतं खत वापरण्याची गरजच उरणार नाही.

 

स्वयंपाक घरातल्या ओल्या कचऱ्यापासून खत कसं तयार करायचं?

स्वयंपाक घरात रोजच्या रोज ओला कचरा तयार होत असतो. त्याच ओल्या कचऱ्याचा उपयोग करून बागेसाठी खत कसं तयार करायचं, याविषयीचा व्हिडिओ baagbagicha2 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

आलिया- करिनाची फिटनेस ट्रेनर सांगतेय चमच्याने वरणभात खाण्याची सवय लगेच सोडा, कारण....

भाज्यांच्या साली, टरफलं असे रोज काही ना काही स्वयंपाक घरातल्या कचऱ्यात जात असते. आता खत तयार करायचं असेल तर हा कचरा रोजच्या रोज एका वेगळ्या ठिकाणी जमा करा.

त्याच त्या नेहमीच्या कानटोप्या नकोच, बाळांसाठी बघा कानटोप्यांचे ३ हटके पर्याय- बाळ दिसेल आणखी गोंडस

ज्या काही मोठ्या आकाराच्या भाज्यांच्या काड्या, केळीचे सालं असतील ते बारीक कापून घ्या. 

 

यानंतर तुमच्या बागेतल्या कोपऱ्यात मातीमध्ये एक खड्डा तयार करा. तशी जागा नसेल तर रिकाम्या कुंडीचा किंवा माठाचा वापर केला तरी चालेल. कुंडी किंवा माठ वापरणार असाल तर त्यावर जे झाकण ठेवाल त्याला ३ ते ४ गोलाकार छिद्रं पाडून घ्या. या छिद्रांचा आकार साधारणपणे वाटाण्याएवढा किंवा त्यापेक्षा मोठा असावा. 

एव्हरग्रीन नीतू कपूर ते सारा अली खान- बघा बॉलीवूड अभिनेत्रींचे लग्न- समारंभासाठी परफेक्ट ६ विंटर लूक

खड्ड्यामध्ये सगळ्यात खाली थोडी माती टाका. त्यावर स्वयंपाक घरातला ओला कचरा टाका. झाडांचा पालापाचोळा, नारळाच्या शेंड्या टाका. कोकोपीट घातलं थोडं तरी चालेल. आता या सगळ्यावर ३ ते ४ टेबलस्पून ताक टाका. त्यावरून मातीचा एक पातळ थर द्य आणि खड्ड्याचं झाकण लावून टाका.

आठवड्यातून एकदा काडीचा वापर करून हे मिश्रण खाली- वर करा. २ महिन्यात झाडांसाठी उत्तम खत तयार होईल. 

 

Web Title: How to use kitchen waste for plants? Best use of kitchen waste for gardening, How to make homemade fertilizers for plants, plant fertilizer from kitchen waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.