Lokmat Sakhi >Gardening > मटारच्या शेंगांची टरफलं फेकून देता? झाडांसाठी खत करण्याचा खास उपाय, झाडं वाढतील जोमाने

मटारच्या शेंगांची टरफलं फेकून देता? झाडांसाठी खत करण्याचा खास उपाय, झाडं वाढतील जोमाने

How To Use Matar Peels For Gardening?: कांद्यांची टरफलं, केळीचे साल जसे झाडांसाठी उपयुक्त ठरते, तसेच मटारच्या शेंगांची टरफलंही झाडांसाठी खूप फायदेशीर आहेत. (Benefits of matar peels fertilizers for plants)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2023 09:08 AM2023-12-30T09:08:07+5:302023-12-30T15:21:58+5:30

How To Use Matar Peels For Gardening?: कांद्यांची टरफलं, केळीचे साल जसे झाडांसाठी उपयुक्त ठरते, तसेच मटारच्या शेंगांची टरफलंही झाडांसाठी खूप फायदेशीर आहेत. (Benefits of matar peels fertilizers for plants)

How to use matar peels for gardening? Uses of matar peels for plants in marathi, Benefits of matar peels fertilizers for plants | मटारच्या शेंगांची टरफलं फेकून देता? झाडांसाठी खत करण्याचा खास उपाय, झाडं वाढतील जोमाने

मटारच्या शेंगांची टरफलं फेकून देता? झाडांसाठी खत करण्याचा खास उपाय, झाडं वाढतील जोमाने

Highlightsमटारच्या शेंगांची टरफलं देखील झाडांसाठी एक मॅजिकल वाॅटर ठरू शकतं

हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात मटारच्या शेंगा खूप जास्त प्रमाणात येत असतात. याच ऋतुमध्ये ताजे मटार मिळतात. त्यामुळे आपणही मग ते भरपूर प्रमाणात घेतो आणि वेगवेगळ्या रेसिपींमध्ये वापरतो. ताजे दाणे आपण खातो आणि शेंगांची टरफलं मात्र सरळ कचऱ्यात टाकून देतो. पण आपल्यासाठी कचरा असणारा हा पदार्थ झाडांसाठी अतिशय उपयुक्त आहे. ज्याप्रमाणे केळीच्या साली, कांद्यांची टरफलं यांचं पाणी झाडांसाठी एक उत्तम टॉनिक असतं, त्याचप्रमाणे मटारच्या शेंगांची टरफलं (How to use matar peels for gardening?) देखील झाडांसाठी एक मॅजिकल वाॅटर ठरू शकतं (Uses of matar peels for plants in marathi). आता मटारच्या शेंगांचा झाडांसाठी कसा वापर करायचा ते पाहूया...(Benefits of matar peels fertilizers for plants)

 

झाडांसाठी मटारच्या शेंगांच्या टरफलांचा उपयोग

झाडांसाठी मटारच्या शेंगांची टरफलं कशी वापरायची याची माहिती passionate_for_creation या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

मायक्रोवेव्ह घाण झाले- कुबट वास येतो? ५ मिनिटांचा सोपा उपाय- होईल नव्यासारखं चकाचक

हा प्रयोग करण्यासाठी मटारच्या शेंगांच्या टरफलांचे बारीक तुकडे करून घ्या आणि हे सगळे तुकडे थोडेसे पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्या.

 

आता या वाटणामध्ये थोडं पाणी घाला आणि ते गाळणीने गाळून घ्या. साधारणपणे हे पाणी जेवढं असेल त्याच्या आणखी तीनपट पाणी त्यात टाका आणि हे पाणी थोडं थोडं करून सगळ्या झाडांना घाला.

घरीच करून बघा अस्सल नागपुरी ऑरेंज बर्फी, चव एकदम भारी- बघा खास रेसिपी

मटारचे वाटण गाळून घेतल्यानंतर गाळणीत जो चोथा उरला असेल तो चोथा वाळवा आणि नंतर कुंडीतल्या मातीत थोडा- थोडा करून टाकून द्या. यामुळेही झाडांना फायदा होईल.

 

Web Title: How to use matar peels for gardening? Uses of matar peels for plants in marathi, Benefits of matar peels fertilizers for plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.