झाडं घराचं वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. म्हणून लोक अंगणात किंवा गॅलरीत झाडं ठेवतात. (Gardening tips) घराच्या बाल्कनीत ठेवलेली झाडं लगेच सुकतात, फुलांची व्यवस्थित वाढ होत नाही असा प्रोब्लेम अनेकांना येतो. घरात रोपं ठेवली आणि सजावट केली म्हणजे झालं असं नाही. तुम्हाला रोपांच्या वाढींचीही पुरेपूर काळजी घ्यावी लागते. (Why You Should Place Match Sticks in Your Plants)
अन्यथा रोपांची व्यवस्थित वाढ होत नाही. गार्डनिंगच्या काही टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमचं काम सोपं होईल आणि घरातली झाडंही हिरवीगार राहतील. ( Smart Gardening) रोपांच्या वाढीसाठी माचिसच्या काड्या अनेकप्रकारे फायदेशीर ठरतात. (How to Use Matchsticks in plants)
1) माचिसच्या काड्या फॉस्फर, सल्फर, मॅग्नेशियम, क्लोरोफिल वापरून तयार केले जाते. यातील रासायनिक तत्व झाडांसाठी किटकनाशकाच्या स्वरूपात काम करतात.
२) माचिसच्या काड्यांवर असलेल्या पदार्थामुळे रोपांची मुळ मजबूत होतात. याव्यतिरिक्त त्यातील सल्फर आणि मॅग्नेशियम क्लोरोफिल रोपांच्या विकासास मदत करते आणि त्यांना खराब होण्यापासून रोखते.
कुकरमध्ये १० मिनिटांत करा वाटाणा-बटाट्याची भाजी; सोपी चमचमीत रेसिपी-चव एकदम भन्नाट
३) रोपांसाठी मासिच्या काड्या वापरणं फारच सोपं आहे. पण सुरूवातीला थोडी सावधगिरी बाळगा. सगळ्यात आधी कुंडीतील माती ओली करा. त्यांतर ८ ते १० मासिचच्या काड्या कुंडीत घालून ठेवा.
४) लक्षात ठेवा की माचिसच्या काड्या पूर्णपणे मातीत बुडलेल्या असतील असे पाहा. थोड्या थोड्या अंतरावर मासिचच्या काड्या ठेवा. १० पेक्षा जास्त काड्यांचा वापर करू नका.
कोरियन तरूणींच्या नितळ-सुंदर त्वचेचं सिक्रेट; रात्री झोपताना करा १ काम-चेहऱ्यावर ग्लो येईल
५) १० ते १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस मासिच्या काड्या ठेवू नका. ही क्रिया महिन्यातून एकदाच करा. झाडांच्या वाढीसाठी रसायनांची आवश्यकता असते. त्यामुळेच मासिसच्या काड्या कुंडीत ठेवणं ही उत्तम आयडीया आहे. जेव्हाही तुम्ही झाडांना पाणी द्याल तेव्हा कांड्याचा खालचा भाग वितळतो आणि मातीत मिसळतो. यामुळे झाडांना पोषण मिळण्यास मदत होते.