Join us  

कुंडीतल्या मातीला बुरशी आली- किडे झाले? १ सोपा उपाय, मातीतलं इन्फेक्शन दूर होईल- झाडं जोमात वाढतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2023 9:12 AM

Gardening Tips For Improving Soil Quality: मातीला बुरशी आली असेल किंवा मातीमध्ये छोटे छोटे मातीच्याच रंगाचे किंवा चॉकलेटी रंगाचे किडे दिसू लागले असतील तर हा उपाय करून पाहा (bacterial and fungle infection in soil)....

ठळक मुद्देमहिन्यातून किंवा १५ दिवसांतून एकदा जरी हा उपाय केला तरी मातीतलं बॅक्टेरियल, फंगल इन्फेक्शन दूर होईल.

झाडांची वाढ जोमाने व्हावी, म्हणून आपण झाडांना वेळेवर खत- पाणी देतो. त्यांना पुरेशा सुर्यप्रकाशातही ठेवतो. पण तरीही कधी कधी झाडांची वाढ अपेक्षेनुसार होत नाही. अशावेळी मातीचा दर्जा बघणंही गरजेचं असतं. बऱ्याचदा आपल्याला असं दिसून येतं की कुंडीतल्या मातीमध्ये हिरवट- निळसर चिकट थर आलेला आहे. किंवा मग मातीमध्ये मुंग्यांपेक्षाही अगदी लहान असणारे काही किडे दिसतात. हे किडे झाडांनाही पोखरून टाकतात (How to use turmeric powder for bacterial and fungle infection in soil). अशावेळी त्या मातीमध्ये इतर कोणतं औषध टाकण्याऐवजी हळदीचा हा एक साधा- सोपा उपाय करून पाहा. मातीतलं कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल तरी ते कमी होईल आणि झाडं आणखी जोमाने वाढतील.(home remedies for ants and fungi in soil)

 

कुंडीतल्या मातीतलं बॅक्टेरियल- फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठी उपाय

हा एक अतिशय सोपा आणि स्वस्तात मस्त उपाय असून तो mission_green_mumbai या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

चारचौघांत बोलण्याचा कॉन्फिडन्स नाही- मनातलं कुणाला सांगताच येत नाही? शिल्पा शेट्टीने सांगितलेले ३ व्यायाम करा.... 

आपल्याला माहितीच आहे की हळदीमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. आपल्याला संसर्गजन्य आजारांपासून दूर ठेवण्यासाठी जशी हळद उपयुक्त ठरते, तशीच ती मातीतलं बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठीही उपयुक्त आहे.

आलियाप्रमाणेच आता सारा अली खाननेही घातला जुना ड्रेस- बघा नेमकं काय सांगतोय हा नवा ट्रेण्ड

आता कुंडीतल्या मातीसाठी हळदीचा वापर करायचा असेल तर त्यासाठी साधारण अर्धा लीटर पाणी कोमट करा. त्या पाण्यात १ टेबलस्पून हळद टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. आणि साधारण २४ तासाने हे पाणी झाडांना घाला.

महिन्यातून किंवा १५ दिवसांतून एकदा जरी हा उपाय केला तरी मातीतलं बॅक्टेरियल, फंगल इन्फेक्शन दूर होईल. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सहोम रेमेडीपाणी