Join us

कलिंगडाची सालं म्हणजे रोपांसाठी 'अमृतच'! फेकू नका, 'या' पद्धतीने करा रोपांसाठी वापर - रोपांना येईल बहर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2025 09:05 IST

how to use watermelon peels for get more flower & fruits from plant : How to Make Compost Using Watermelon Rinds : Make fertilizer from watermelon rind : How to make Watermelon peel liquid fertilizer : Helpful Way to Use Fruit Peels for Your Plants : उन्हाळ्यात आपण कलिंगड खाऊन सालं फेकून देतो, परंतु असे न करता रोपांसाठी तयार करा औषधी खत...

उन्हाळ्यात विकत मिळणाऱ्या सिझनल फळांपैकी, कलिंगड हे सर्वांचेच आवडते फळं आहे. बाहेरुन हिरवेगार आणि आतून लालचुटुक असणारे हे रसाळ फळ खाण्याचा मोह कुणालाच (How to Make Compost Using Watermelon Rinds) आवरत नाही. बाजारांत असे लालचुटुक कलिंगड दिसले की आपण हमखास विकत घेतोच. चवीला गोड, रसाळ आणि पाण्याचे प्रमाण जास्त असणारे हे कलिंगड (how to use watermelon peels for get more flower & fruits from plant) घरोघरी फार मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. कलिंगड खाऊन झाल्यावर आपण त्याची सालं फेकून देतो. परंतु कलिंगडाप्रमाणेच (Helpful Way to Use Fruit Peels for Your Plants) त्याच्या सालींमध्ये देखील (Make fertilizer from watermelon rind) भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात. यामुळे या सालींचा आपण अनेक प्रकारे वापर करु शकतो. शक्यतो, आपल्याला कलिंगडाच्या सालीचे फायदे माहित नसल्याने आपण ती फेकून देतो(How to make Watermelon peel liquid fertilizer).

परंतु कलिंगडाच्या सालींचे अनेक पदार्थ तयार करण्यापासून ते बाल्कनीत रोपांच्या वाढीसाठी आणि मातीची पोषक तत्वे वाढीस मदत करतात. थोडक्यात, कलिंगडाच्या साली या तुमच्या बाल्कनीतील रोपांसाठी एक प्रकारचे वरदानच आहे, असे म्हणावे लागेल. कलिंगडाच्या सालींचा वापर रोपांसाठी कसा करायचा ते पाहूयात. _gardening.with.deepu या इंस्ट्राग्राम पेजवरुन कलिंगडाचे द्रव स्वरूपातील खत कसे तयार करावे याची कृती शेअर करण्यात आली आहे.  

साहित्य :- 

१. कलिंगडाच्या साली २. गायीचे शेण किंवा शेणखत ३. गूळ ४. एक लिटर पाणी 

उन्हामुळे मनी प्लांटची पानं पिवळी पडली ? घरातले ३ पदार्थ करतील जादू - पानांना येईल हिरवागार बहर...

कृती :-

 कलिंगडाच्या सालींचे लहान लहान तुकडे करून घ्यावेत. त्यानंतर एका मोठ्या टबमध्ये पाणी घेऊन त्यात या कलिंगडाच्या सालींचे तुकडे घालावेत. याशिवाय, बादलीत थोडे गूळ आणि शेणखत घाला आणि ते चांगले मिसळा. आता बादली झाकणाने झाकल्यानंतर, ५ ते ७ दिवस असेच राहू द्या. वास येऊ नये म्हणून ते दररोज ढवळत राहा.

तुळशीची पाने इवलीशी, वाढतच नाहीत? करा ८ उपाय, तुळस वाढेल मस्त...

याचा वापर कसा करावा ?

५ ते ७ दिवसानंतर जेव्हा तुम्ही हे झाकण उघडून पाहाल तेव्हा द्रव रुपातील खत तयार झालेले असेल. वापरण्यापूर्वी, ते गाळून त्यात थोडे पाणी मिसळून ते  पातळ करा. तुम्ही ते १० ते १५ दिवसांतून एकदा याचा वापर करु शकता, यातील पोटॅशियमच्या गुणधर्मांमुळे ते फुलांच्या आणि फळ देणाऱ्या वनस्पतींसाठी सर्वोत्तम आहे. जास्त प्रमाणात घालू नका कारण यामुळे मुळांचा कुजण्याचा धोका असतो.

टॅग्स :बागकाम टिप्सफळेसोशल व्हायरलसमर स्पेशलइनडोअर प्लाण्ट्स