Join us  

हिवाळ्यात कुंडीतल्या कोणत्या रोपांना नेमकं कधी आणि किती पाणी घालायचे? चुकले तर रोप सुकले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2024 2:55 PM

How to Water Your Plants in the Winter Season : थंडीमुळे आणि पहाटेच्या धुक्यामुळे झाडे कोमेजून जातात, अशावेळी झाडांना पाणी घालण्याची योग्य वेळ कोणती?

वातावरणात बदल झाले की, आपल्या तब्येतीतही बदल दिसून येतात. शिवाय आरोग्यावरही लगेच परिणाम होतो. हिवाळा असो किंवा पावसाळा आपण प्रत्येक जण आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतो. त्याच प्रमाणे वातावरण बदलाचा फटका झाडांनाही बसतो. अंगणातील रोपटे असुदेत, किंवा झाडं त्यांच्यावर विपरीत परिणाम होतोच. या काळात झाडं कोमेजून जातात, शिवाय झाडं सुकायला लागतात.

आपण झाडांची रोजच्या प्रमाणे काळजी घेतो, शिवाय त्यांना वेळेवर पाणीही घालतो. पण झाडांची हवी तशी वाढ होत नाही (Gardening Tips). बरेच जण सकाळच्या वेळेस झाडांना पाणी देतात. पण तरीही झाडे कोमेजून जातात. हिवाळ्यात झाडांची योग्य वाढ व्हावी यासाठी काय करावे? झाडांवर कधी आणि किती पाणी घालावे? हिवाळ्यात झाडांची कशी काळजी घ्यावी? पाहा(How to Water Your Plants in the Winter Season).

हिवाळ्यात झाडांना कधी पाणी घालावे?

सायंकाळी झाडांना द्या पाणी

हिवाळ्यात आपण झाडांना सायंकाळच्या वेळेस पाणी देऊ शकता. थंड वातावरणात योग्य वाढ व्हावी यासाठी सकाळ ऐवजी सायंकाळी पाणी घाला. वातावरणातील तापमान कमी झाले की, जमीन गोठ्ण्यास सुरुवात होते. त्यामुळे जमीन गोठण्यापूर्वी झाडांना पुरेसे पाणी द्या. यामुळे झाडांना हायड्रेटेड राहण्यास मदत होईल.

जास्वंदाचे रोपटे नुसतेच वाढते, पण फुलंच येत नाहीत? मातीत मिसळा एक खास गोष्ट; फुलांनी बहरेल रोप

गुलाबाच्या झाडांना २ दिवसाआड घाला पाणी

जर आपल्याकडे गुलाबाचे झाड असेल तर, हिवाळ्यात रोपट्याला दररोज पाणी घालू नका. रोपट्याला रोज पाणी घालण्याऐवजी दोन ते तीन दिवसांतून एकदा पाणी द्या. गुलाबाची मुळे जाड असतात, त्यामुळे जास्त पाणी लागते. अशा स्थितीत त्यांना किमान दोन दिवसांच्या अंतराने पाणी द्या.

या झाडांना लागते कमी पाणी

जर आपल्याकडे मिरची, पुदिना, लिंबू इत्यादी झाडे असतील तर त्यांना ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्या. या झाडांची मुळे लहान आणि बारीक असतात. जास्त पाणी घातल्यास ते खराब होऊ शकतात. त्यामुळे अंतराने पाणी घाला.

तुळस सुकेल-पानं गळतील, तुळशीच्या बाजूला लावू नयेत ३ रोपं, कारण..

कुंडीत लावलेल्या रोपांची कशी काळजी घ्याल?

कुंडीत ड्रेनेज छिद्र असेल तरच त्यात रोपटे लावा. माती पूर्णपणे कोरडी झाल्यावरच पाणी द्या. अन्यथा रोपट्याची मुळे कुजतात, आणि खराब होतात.

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल