झाडं तर आपण हौशीनं लावतो, पण नंतर त्याची काळजी (how to take care of plants) कशी घ्यावी हे लक्षात येत नाही. कधी कधी खूप काळजीपायी तर कधी कधी आपल्या निष्काळजीपणामुळे झाडांची वाढ खुंटते. अमूक एक झाड लावल्यानंतर झाड किती वेळ उन्हात ठेवावं किंवा त्याला किती उन्हाची गरज आहे, पाणी किती टाकावं, याचा अंदाज अनेकांना येत नाही. त्यामुळे मग झाडांवर रोग पडतात, कीड पडते. अतिपाण्यामुळे कधीकधी कुंडीतली मातीही सडते किंवा त्याला बुरशी येते. कधीकधी पाणी खूप कमी होतं आणि मग कुंडीतलं रोपटं सुकून जातं. म्हणूनच तर टेरेस गार्डन (Tips for terrace garden) छान फुलविण्यासाठी झाडांच्या ऊन- पाण्याचं गणित समजावून घेणं गरजेचं असतं.
झाडांना पाणी देताना ही काळजी घ्या..
Correct method of watering plants
१. कोणत्याही झाडाला खूप जास्त पाण्याची गरज नसते. त्यांना फक्त मातीत ओलावा रहावा एवढंच पाणी पुरेसं असतं. त्यामुळे तुम्ही झाडाला पाणी दिल्यानंतर ते कुंडीतून खाली गळून येत असेल, तर तुम्ही झाडांना गरजेपेक्षा जास्त पाणी देत आहात, हे लक्षात घ्या.
२. ऋतुमानानुसार झाडांना पाणी घालण्याचं प्रमाण बदलायला पाहिजे. तर थंडीचे दिवस असतील तर झाडांना दिवसातून एकदाच पाणी घाला. जर झाडाची मुळांजवळची माती हाताला ओलसर लागली तर दररोज पाणी घालू नका. अशा अवस्थेत झाडांना एक दिवसाआड पाणी घातलं तरी चालतं.
३. उन्हाळ्यात मात्र झाडांना दररोज पाणी द्या. पण तेव्हाही खूप जास्त पाणी घालू नका. हिवाळा असो किंवा उन्हाळा, शक्यतो झाडांना रात्रीच्या वेळी पाणी द्या. जेणेकरून झाड ते चांगल्याप्रकारे शोषून घेऊ शकेल आणि ऊन न लागल्याने पाण्याचे बाष्पीभवनही लवकर होणार नाही.
मोगरा रुसतो, फुलता फुलत नाही, कळ्या गळून पडतात? ४ उपाय, मोगऱ्याला फुलंच फुलं
बघा झाडच सांगतेय पाणी कमी हाेतंय की जास्त...
१. जर झाडाची पाने काळपट हिरवी दिसत असतील आणि हात लावल्याबरोबर लगेच गळून जात असतील, तर झाडांना पाणी कमी पडते आहे हे लक्षात घ्या.
२. जर झाडांची पाने पिवळी पडत असतील, तर झाडाला पाणी जास्त होत आहे, असे समजावे.
३. झाडाच्या कुंडीत बुरशी दिसत असेल आणि माती चिकट झाली असेल तर कुंडीत पाणी जास्त झालेले आहे, याचे ते लक्षण आहे.
४. झाडांची पाने हिरवीगार आणि टवटवीत दिसत असतील, तर तुमचे पाण्याचे प्रमाण एकदम जमून आलंय हे लक्षात घ्या.
५. योग्य पाणी घालूनही एखादं झाड सुकत असेल, पानं काळपट हिरवी होऊन गळून जात असतील किंवा फुलांची चांगली वाढ होत नसेल तर त्या झाडांना ऊन कमी पडत आहे, असा त्याचा अर्थ होतो.