Join us  

हरितालिकेच्या पुजेत रुईचे फुल वाहताय? रुईचे फुल आरोग्यासाठी फार महत्त्वाचे, फायदे वाचून वाहा फुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:18 PM

भाद्रपद महिन्याची सुरुवात होताच सुवासिनींना हरितालिका पुजनाचे वेध लागतात. हरितालिका पुजनात वेगवेगळ्या पत्री वाहण्याचे खूप महत्त्व आहे. यापैकीच एक आहे रुईचे फुल.

ठळक मुद्देज्याप्रमाणे त्वचेसाठी रुईचा चिक गुणकारी आहे, त्याचप्रमाणे तो केसांसाठीही उत्तम आहे.

हरितालिका पुजनाचे महत्त्व म्हणजे या पुजेत हरितालिकेला निरनिराळ्या पत्री म्हणजेच वेगवेगळ्या झाडांची पाने वाहिली जातात. आघाडा, दुर्वा, बेल याप्रमाणेच रुईच्या फुलाचे देखील या पुजनात खूप महत्त्व आहे. रुईचे फुल किंवा रुईचे फळ असे काहीतरी या पुजेत वाहिलेच जाते. हरितालिका पुजनाची जी आख्यायिका सांगितली जाते, त्यामध्येही रुईच्या झाडाचे खूप महत्त्व आहे. असे सांगितले जाते की पार्वती जेव्हा खडतर उपासना करत होती तेव्हा कित्येक वर्षे ती केवळ रुईच्या झाडांची पानेच खात होती. ही दंतकथा असली तरी यातून रुईच्या झाडाचे आरोग्यदायी फायदे अधोरेखित होतात. रुईच्या झाडाला काही भागांमध्ये मंदार असेही म्हटले जाते. 

 

रुईचे फूल आकाराने छोटे असते आणि त्याच्या आतल्या भागात लाल- जांभळ्या रंगांचे ठिपके असतात. या झाडामध्ये असणाऱ्या रसायनांचा उपयोग अनेक व्याधी दूर करण्यासाठी केला जातो. कोरड्या, ओसाड आणि मोकळ्या मैदानात हे झाड उगवते. या झाडाच्या वाढीसाठी कोणतीही विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. या झाडाचा चिक डोळ्यांसाठी घातक असतो. त्यामुळे या झाडाचा कोणताही वापर करायचा असेल तर डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी.

 

रुईच्या झाडाचे आरोग्यदायी उपयोग१. त्वचा होते चमकदाररुईच्या झाडाचा चिक, हळद आणि गुलाबपाणी हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करावे आणि चेहऱ्याला त्याचा लेप लावावा. लेप लावताना डोळा किंवा डोळ्याच्या आजूबाजूच्या भागावर हा लेप लागू देऊ नये. हा लेप लावल्यास त्वचा अतिशय मुलायम आणि नितळ होऊ लागते. रंग उजळण्यासाठीही हा लेप गुणकारी ठरताे. 

२. दाढीदुखीवर प्रभावीरुईच्या चिकात कापूस भिजवायचा आणि त्यावरून थोडे साजूक तूप सोडायचे. हा कापूस दुखणाऱ्या दाढीवर दाबून ठेवायचा. दाढदुखी लगेचच कमी होते. 

 

३. अस्थमा आणि खोकल्यावर उत्तम उपायखूप खोकला झाला असेल किंवा कफ होऊन श्वास घेण्यास त्रास होत असेल तर रुईचे फुल उपयुक्त ठरते. रुईची फुले आणि लवंग हे मिश्रण व्यवस्थित कुटून घ्यावे. त्याच्या लहान- लहान गोळ्या बनवाव्या आणि रोज सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यासोबत या गोळ्या घ्याव्या. यामुळे जुनाट खोकल्याचा त्रास कमी होतो. अस्थमा किंवा दम्याचा त्रास असेल तर रुईची फुले सुकवून त्यांचे चुर्ण तयार करावे आणि दररोज सकाळी गरम पाण्यासोबत घ्यावे. लवकर आराम मिळतो. 

 

४. कोंड्याची समस्या होते कमीज्याप्रमाणे त्वचेसाठी रुईचा चिक गुणकारी आहे, त्याचप्रमाणे तो केसांसाठीही उत्तम आहे. रुईच्या झाडाचा चिक काढा आणि तो केसांच्या मुळाशी लावा. १५ ते २० मिनिटांनी शाम्पू करून केस धुवून टाका. यामुळे कोंड्याचा त्रास कमी होतो. पण केस धुत असताना ते पाणी डोळ्यात जाणार नाही, याची पुरेपुर काळजी घ्यावी. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स