Lokmat Sakhi >Gardening > छान दिसतात म्हणून कुंडीत रंगबिरंगी पेबल्स ठेवता? पण झाडांसाठी ते योग्य आहे का?

छान दिसतात म्हणून कुंडीत रंगबिरंगी पेबल्स ठेवता? पण झाडांसाठी ते योग्य आहे का?

Use of Decorative Pebbles Is Good For Plant?: तुम्हीही कुंडीतलं रोपटं छान दिसावं म्हणून त्यात रंगबेरंगी पेबल्स टाकता का? मग हे एकदा वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2023 03:54 PM2023-10-04T15:54:25+5:302023-10-04T16:11:36+5:30

Use of Decorative Pebbles Is Good For Plant?: तुम्हीही कुंडीतलं रोपटं छान दिसावं म्हणून त्यात रंगबेरंगी पेबल्स टाकता का? मग हे एकदा वाचा

Is it good for plants to Keep pebbles on soil? Use of decorative pebbles, Putting decorative pebbles in the planter hamper a plant's health? | छान दिसतात म्हणून कुंडीत रंगबिरंगी पेबल्स ठेवता? पण झाडांसाठी ते योग्य आहे का?

छान दिसतात म्हणून कुंडीत रंगबिरंगी पेबल्स ठेवता? पण झाडांसाठी ते योग्य आहे का?

Highlightsबाग सजविण्यासाठी किंवा कुंडी सजविण्यासाठी पेबल्स वापरणं चांगलं आहे. पण ते वापरण्याचं प्रमाण किती असावं, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

वेगवेगळी आकर्षक झाडं लावली की आपली बाग नक्कीच छान दिसते. पण ती अधिक आकर्षक व्हावी म्हणून अनेक जण वेगवेगळ्या आकाराच्या कुंड्या आणतात. काहीजण बाग आणखी सुंदर दिसावी म्हणून रंगबेरंगी पेबल्सही वापरतात. कुंडीतल्या मातीत आकर्षक पद्धतीने पेबल्स रचून ठेवतात (Is it good for plants to Keep pebbles on soil?). यामुळे त्यांची बाग खरोखरच देखणी दिसते. पण झाडांच्या आरोग्यासाठी असं करणं चांगलं आहे की नाही (Putting decorative pebbles in the planter), हे एकदा तपासलं पाहिजे....(Use of decorative pebbles)

 

बाग सजविण्यासाठी किंवा कुंडी सजविण्यासाठी पेबल्स वापरणं चांगलं आहे. पण ते वापरण्याचं प्रमाण किती असावं, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

सासरी जाणाऱ्या परिणिती चोप्राला सानिया मिर्झाने दिलं अश्रू पुसणारे गिफ्ट, आहे काय 'ती' खास भेटवस्तू

कारण कुंडीतल्या मातीत जर तुम्ही पूर्णपणे पेबल्सचं अच्छादन दिलं, तर त्यामुळे सूर्यप्रकाश मुळांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे मग मुळांची कार्यक्षमता आपोआपच कमी होते आणि रोपटं सुकू लागतं. त्यामुळे पेबल्सचा योग्य वापर कसा करायचा जेणेकरून झाडांचं नुकसान होणार नाही, ते आता बघूया...

 

बाग सुशोभित करण्यासाठी जमिनीवर तुम्ही वेगवेगळे पेबल्स टाकू शकता. पण कुंडीतल्या मातीत पेबल्स टाकायचे असतील तर पुर्ण माती पेबल्सने झाकून टाकू नका.

मान- पाठ खूपच काळवंडली? टॅनिंग कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातले फक्त ३ पदार्थ वापरा, त्वचा छान उजळेल 

कुंडीच्या कडेने गोलाकार पद्धतीने किंवा झाडाच्या खोडाच्या अगदी जवळ गोलाकार पद्धतीने पेबल्स लावा. सकलंट्ससाठी पेबल्स उपयुक्त ठरतात. पण त्यांच्यासाठीही पेबल्स लावण्याची हीच पद्धत वापरा. जर तुम्हाला कुंडीतली माती पुर्णपणे पेबल्सने झाकूनच टाकायची असेल, तर तसं फक्त एक दोन दिवस करा.

 

नंतर पुन्हा ते काढून टाका. म्हणजेच ज्या ठराविक वेळी बाग सजवायची असेल, त्याच वेळी कुंडीतली सगळी माती पेबल्सने आच्छादून टाकली तरी चालेल.

बटाटे चिरल्यानंतर पाण्यात का भिजवावे? आणि किती वेळ? बघा काय आहे त्यामागचं वैज्ञानिक कारण

काही रोपटी एका बाजुने झुकलेली असतात. ती सरळ रेषेत वाढावीत यासाठी त्यांच्या खोडाला आधार देण्यासाठीही पेबल्स वापरणं उपयोगी ठरतं. 

 

Web Title: Is it good for plants to Keep pebbles on soil? Use of decorative pebbles, Putting decorative pebbles in the planter hamper a plant's health?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.