हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे (Winter Season). भारतात तुळशीचे रोप अनेक घरांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल (Tulsi). तुळशीची अनेक आरोग्यदायी फायदे आहेत (Gardening Tips). तुळशीमुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. तुळशीच्या पानांमध्ये पोटॅशिअम आणि फॉलेट यासारखी पोषक तत्वे असतात, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. यासह रिकाम्या पोटी तुळशीची पानं खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
तुळशीचे अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत. हिवाळ्यात तुळशीचे रोप सुकते. त्याची पानं पिवळी होतात. तुळशीच्या कुंडीत नियमित पाणी घालूनही, तुळशीच्या रोपाची वाढ खुंटते. अशावेळी तुळशीच्या रोपाची नेमकी काळजी घ्यावी? असा प्रश्न निर्माण होतो. हिवाळ्यात रोप सुकत असेल तर, रोपाची नीट वाढ होत नसेल तर, काही गार्डनिंग टिप्स फॉलो करून पाहा. तुळशीच्या रोपाची वाढ कधीच खुंटणार नाही(Is Tulsi plant drying during winter? Follow THESE 4 TIPS).
हिवाळ्यात तुळशीच्या रोपाची वाढ खुंटते?
- हिवाळ्यात तुळशीच्या कुंडीत वेळोवेळी पाणी घालूनही पानं पिवळी होतात. यावर उपाय म्हणून आपण कुंडीतल्या मातीत कडूलिंबाचे पाणी घालू शकता. यामुळे पानं सुकणार नाहीत. शिवाय तुळशीचे रोप पूर्णपणे हिरवे राहील.
कितीही घासले तरी दातांवरचा पिवळा थर जाता जात नाही? ५ रुपये खर्च, पाहा हा चमकदार उपाय
- तुळशीच्या कुंडीत आपण वेळोवेळी पाणी घालतो. पण जास्त पाणी घालून झाड कुजायला लागते. त्यामुळे पाणी घालण्याचं योग्य प्रमाण जाणून घेणं तितकेच गरजेचं आहे. जर आपण दररोज कुंडीत पाणी घालत असाल तर, कमी प्रमाणात घालावे. यामुळे मुळे कुजणार नाहीत.
- काही लोक तुळशीच्या रोपामध्ये ओले शेणखत घालतात. यामुळे तुळशीच्या रोपाचे नुकसान होऊ शकते. गांडूळ खत किंवा कोरडे शेणखत तुळशीच्या रोपामध्ये घालता येते. पण जास्त प्रमाणात खत घालणे टाळावे.
- मातीत शक्यतो वाळू मिसळा. मातीत ओलावा असेल तर, तुळशीची वाढ योग्य होते. शिवाय पानंही हिरवीगार राहतात.
हाय बीपीचा त्रास? रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना ‘या’ तेलानं करा मसाज-झोपही लागेल गाढ
- तुळशीच्या रोपाची वेळोवेळी कापणी करत राहा. शिवाय कडक उन्हात ठेवू नका. शिवाय भर थंडीत झाड उघड्यावर ठेवू नका. यामुळे तुळशीच्या रोपाची पानं खराब होऊ शकतात.