Join us

कुंडीतील मातीत मिसळा मूठभर गूळ, रोपांची वाढ होईल दुप्पट वेगाने- फळाफुलांचा येईल बहर.... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2024 18:49 IST

How To Use Jaggery Or Gud For Plant & Soil Know Process & Benifits : Jaggery a Natural Fertilizer & Growth Booster For Plants : Jaggery Benefits for Plants : Best Liquid To fertile soil : कुंडीतील मातीची गुणवत्ता वाढवून ती अधिक पोषक करण्यासाठी करुन पाहा हा खास सिक्रेट उपाय...  

गार्डनिंग करणे ही एक कला आहे. आपल्यापैकी अनेकजणांना गार्डनिंग करायला फार आवडत. गार्डनिंग किंवा बागकाम आवडणारे बरेचजण आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा (How To Use Jaggery Or Gud For Plant) छोटाशा गार्डनमध्ये, आजूबाजूच्या परिसरात छान झाड, रोपं, वेली लावतात. गार्डनिंग करताना (Jaggery a Natural Fertilizer & Growth Booster For Plants) फक्त रोपं नुसती लावूनच चालत नाही तर त्यांची तितकीच काळजी देखील घ्यावी लागते. गार्डनिंग करताना एकूणच सगळ्याच गोष्टींकडे काटेकोरपणे व्यवस्थित लक्ष द्यावे लागते. रोपांसाठी लागणाऱ्या माती पासून ते रोपांची नीट वाढ होईपर्यंत सगळ्याच गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते( Jaggery Benefits for Plants).

रोपांच्या चांगल्या वाढीसाठी माती चांगल्या प्रतीची असणे फार गरजेचे असते. काहीवेळा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रोपांच्या गरजेनुसार ओली माती - किंवा सुकी माती अशा प्रकारे मातीची निवड करतो. खरंतर, रोपांची मूळ मातीतच असतात. याचबरोबर मातीतूनच त्यांना वाढीसाठी पोषक घटक मिळत असतात, त्यामुळे रोपांच्या कुंडीतील माती चांगल्या दर्जाची असणे आवश्यक असते. एवढंच नव्हे तर आपण देखील काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन या मातीची गुणवत्ता अधिक वाढवू शकतो. मातीतील पोषक तत्वे अधिक वाढावीत तसेच माती रोपांच्या वाढीसाठी अनुकूल व्हावी यासाठी आपण मातीत गूळ मिसळू शकतो. rooftop_organics या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन मातीची गुणवत्ता अधिक वाढवण्यासाठी गुळाचा वापर कसा करावा याबद्दल अधिक माहिती दिली आहे.      

१. गुळाचा वापर कसा आणि किती प्रमाणात करावा ? 

कुंडीतील मातीची गुणवत्ता अधिक वाढवण्यासाठी आपण मातीत गूळ मिसळू शकतो. जेव्हा तुम्ही मातीत गूळ मिसळाल तेव्हा गूळ अगदी मोजक्याच प्रमाणांत घ्यावा. गूळ घेताना आपण १५ ते २० ग्रॅम गूळ घ्यावा. १ लिटर पाण्यांत हा गूळ बारीक करुन घालावा, त्यानंतर हा गूळ त्या पाण्यांत संपूर्णपणे विरघळवून घ्यावा. आता हे गुळाचे पाणी महिन्यातून एकदा १०० ml प्रत्येक रोपाच्या कुंडीत घालावे. काही लोकांना असे वाटते की गुळामुळे मातीला मुंग्या येऊ शकतात. पण गूळ नीट घातला तर तो मातीसाठी अमृतसारखं काम करतो.

कुंडीतील रोपांसाठी शेणखत वापरण्याची योग्य पद्धत, रोपं फळाफुलांनी येतील बहरून...

२. या उपायामुळे मातीची गुणवत्ता कशी सुधारते ? 

१. गूळ हे मातीसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते.२. गुळामुळे जमिनीचा पोत सुधारतो.३. गुळातील सूक्ष्म घटक जमिनीची सुपीकता वाढवतात. 

कुंडीत दुर्वा लावण्याची पाहा सोपी ट्रिक, छोट्याशा कुंडीतही वाढेल दाट हिरवळ-देवाला वाहा ताज्या दुर्वा!

४. शेणखत आणि कंपोस्टखतामध्ये देखील आपण गुळ घालू शकता. ५. गुळामध्ये लोह आणि पोटॅशियम असल्यामुळे रोपाला अधिक फायदा होतो.६. कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, जस्त, तांबे, फॉलिक ॲसिड यांसारखे घटक गुळात असतात, जे मातीची गुणवत्ता आणि दर्जा सुधारण्यास अधिक मदत करतात. 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स