Lokmat Sakhi >Gardening > अश्विनी भावेने सुंदर फुलवलंय किचन गार्डन, ती म्हणते कमी जागेतही लावू शकता भरपूर भाज्या

अश्विनी भावेने सुंदर फुलवलंय किचन गार्डन, ती म्हणते कमी जागेतही लावू शकता भरपूर भाज्या

Kitchen Garden Tips: किचन गार्डनिंगचा ट्रेण्ड सध्या सगळीकडेच खूप गाजतो आहे. अभिनेत्री अश्विनी भावे हिने याविषयीची नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. (Post shared by actress Ashwini Bhave)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2022 02:41 PM2022-08-04T14:41:02+5:302022-08-04T15:06:02+5:30

Kitchen Garden Tips: किचन गार्डनिंगचा ट्रेण्ड सध्या सगळीकडेच खूप गाजतो आहे. अभिनेत्री अश्विनी भावे हिने याविषयीची नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. (Post shared by actress Ashwini Bhave)

Kitchen garden tips by actress Ashwini Bhave, How to do kitchen gardening in limited space? | अश्विनी भावेने सुंदर फुलवलंय किचन गार्डन, ती म्हणते कमी जागेतही लावू शकता भरपूर भाज्या

अश्विनी भावेने सुंदर फुलवलंय किचन गार्डन, ती म्हणते कमी जागेतही लावू शकता भरपूर भाज्या

Highlightsअश्विनीचा हा प्रयोग बघून किचन गार्डनिंग करावं वाटत असेल, तर या काही भाज्या तुम्ही घरच्याघरी लावू शकता.

आपण स्वयंपाक घरात ज्या काही भाज्या करतो, त्या भाज्यांपैकी ज्या शक्य होतील, त्या भाज्या घरच्या अंगणातच उगवायच्या, असा किचन गार्डनिंगचा (kitchen gardening) ट्रेण्ड सध्या चांगलाच गाजतो आहे. ज्यांना बागकामाची  (how to grow vegetables at home) आवड आहे आणि त्यांच्याकडे जागाही आहे, अशा व्यक्ती हौशीने असे प्रयोग करत आहेत. हे सगळं करायचं म्हणजे मग खूप मेहनत घ्यावी लागेल, खूप मोठी जागा लागेल, असं वाटणं अगदी साहजिक आहे. नेमक्या याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं अभिनेत्री अश्विनी भावे हिने तिच्या व्हिडिओद्वारे दिली आहेत. A tiny green door in your kitchen! असंच कॅप्शन तिने तिच्या या व्हिडिओला दिलं आहे. (which vegetables can grow easily in pots?)

 

अश्विनीने तिचा एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिची गार्डनिंगची आवड आणि ग्रीन डोअरच्या माध्यमातून ती याविषयात करत असलेलं काम, हे तर तिच्या चाहत्यांना माहितीच आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सुरुवातीलाच ती असं म्हणते आहे की माझ्याकडे खूप मोठी जागा आहे, म्हणून मी भरपूर झाडं लावू शकते, असं वाटणं अगदी साहजिक आहे. पण किचन गार्डनिंग करण्यासाठी तुमच्याकडे मोठीच जागा असायला पाहिजे, असं काही नाही. कुंडीतही तुम्ही हे सगळे प्रयोग करू शकता, असं तिनं आवर्जून नमूद केलं आहे. कशा पद्धतीने भाज्या लावायच्या आणि नंतर त्या कशा वाढवायच्या, याची माहिती तिने या व्हिडिओमध्ये दिली आहे.

 

अश्विनीची किचन गार्डनिंगची खास पद्धत
- या व्हिडिओमध्ये अश्विनीच्या हातात जी भाजी दिसतेय ती कोबीवर्गीय भाजी आहे. तिने या भाजीच्या नावाचा उल्लेख व्हिडिओमध्ये केलेला नाही.
- ती म्हणते की भाज्या निवडून आपण त्यांची देठं फेकून देतो. पण काही भाज्यांचा बाबतीत याच देठांचा उपयोग करून गार्डनिंग करता येतं.
- तिच्या हातात जी भाजी आहे, त्याचा साधारण २ इंच बुंधा कापून तिने तो वाटीभर पाण्यात टाकला. बुंधा बुडेल एवढंच पाणी त्यात ठेवलं. हे पाणी ती दर दिवशी किंवा एक दिवसाआड बदलते आणि ही वाटी ती खिडकीत जिथे भरपूर ऊन येईल तिथे ठेवते.
- साधारण ८ दिवसांत त्या बुंध्यातून नवे कोंब फुटले. त्यानंतर आता हा बुंधा कुंडीत मातीत लावला की काही दिवसांतनी साधारण दोन वेळा तरी भरपूर सलाड होईल, एवढी पानं तिला त्यातून मिळतात, असं ती सांगते.   


 
कोणकोणत्या भाज्या कुंडीत लावता येतात...
अश्विनीचा हा प्रयोग बघून किचन गार्डनिंग करावं वाटत असेल, तर या काही भाज्या तुम्ही घरच्याघरी लावू शकता. या भाज्यांची लागवडही बुंधा कापून अश्विनी करतेय त्याप्रमाणे करता येते.
- कोबीवर्गीय भाज्या
- गाजर
- मुळा
- कांदा
- लसूण
- आलं
- पुदिना
- बटाटे 

 

Web Title: Kitchen garden tips by actress Ashwini Bhave, How to do kitchen gardening in limited space?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.