Join us  

संत्री खाल्ल्यावर साली फेकून न देता रोपांसाठी 'असा' करा वापर, रोपांना येतील फुलंच फुलं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2024 3:57 PM

Know how orange peels are used to grow flowers gardening tips : काही घरगुती आणि नैसर्गिक उपायांनी ही बाग छान फुलण्यास मदत होते.

हिवाळा म्हणजे फळांचा सिझन, या सिझनमध्ये बाजारात मुबलक प्रमाणात आणि कमी दरांत फळं उपलब्ध असतात. संत्री हे हिवाळ्यात मिळणारे महत्त्वाचे फळ. हिवाळ्यात बद्धकोष्ठता किंवा अन्य आरोग्याच्या समस्यांसाठी संत्री खाणे अतिशय फायदेशीर असते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी आहारात संत्र्याचा अवश्य समावेश करायला हवा. आपण ही संत्री खातो खरी पण त्यानंतर त्यावर असलेले साल कचऱ्यात फेकून देतो. मात्र संत्र्याची ही सालं घरातील रोपांसाठी फायदेशीर असतात (Know how orange peels are used to grow flowers gardening tips). 

बागेतल्या रोपांना अनेकदा फुलं येत नाहीत, रोपांची पानं सुकून जातात किंवा त्यांना कीड लागते. मग आपण आवडीनी फुलवलेल्या बागेचा बहर निघून जातो. मग आपण या रोपांना महागडी खते आणि किटकनाशके वापरुन पुन्हा बहर आणण्यासाठी प्रयत्न करतो. पण काही घरगुती आणि नैसर्गिक उपायांनी ही बाग छान फुलण्यास मदत होते. रोपांना पहिल्यासारखी छान फुलं येण्यासाठी या संत्र्याच्या सालींचा अतिशय चांगला उपयोग होतो. पाहूयात या सालींचा रोपांसाठी नेमका कसा वापर करायचा...

१. संत्र्याच्या सालींमध्ये एग पोटॅशियम नावाचा घटक मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे रोपाला भरपूर फुलं येण्यास त्याची मदत होते. 

२. एका बाऊलमध्ये ही संत्र्याची सालं घेऊन ती पाण्यात पूर्ण बुडतील अशाप्रकारे भिजवायची.

३. या बाऊलवर प्लास्टीक घालून तो बंद करायचा आणि १ ते २ दिवसांसाठी उन्हात ठेवून द्यायचा. 

४. साधारण २ दिवसांत या सालीतील मूल्ये उन्हामुळे पाण्यात उतरतात. ते पाणी एका भांड्यात घ्यायचे आणि साले वेगळी करायची. 

५. हे पाणी रोपांना घातल्यास रोपांची पाने हिरवीगार होण्यास आणि मातीलाही चांगले पोषण मिळण्यास मदत होते. 

६. हा उपाय करण्यासाठी वेगळा कोणताच खर्च येत नसल्याने आणि फारसे कष्टही पडत नसल्याने बागेला बहर येण्यासाठी हा उपाय अतिशय उत्तम ठरतो. 

७. संत्र्याच्या सालांना असणाऱ्या उग्र वासामुळे हे पाणी रोपांवर फवारल्यास किटक, मुंग्या यांपासूनही रोपांचे संरक्षण होण्यास मदत होते. 

८. तसेच रोपांची वाढ खुंटली असेल, फुलं येत नसतील तर या उपायामुळे रोपांना भरपूर फुलं येण्यास मदत होते. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सहोम रेमेडी